Bhopalyache Gharge / Puri (भोपळ्याचे घारगे) – Sweet Puri made from Red Pumpkin

Bhopalyache Gharge / Puri (भोपळ्याचे घारगे)

Bhopalyache Gharge / Puri (भोपळ्याचे घारगे) – Sweet Puri made from Red Pumpkin

भोपळ्याचे घारगे मराठी

This is a traditional Maharashtrian dish made from Red Pumpkin (Kadu). There are different recipes of Gharge. This one is using wheat flour. This is mild sweet preparation generally eaten as main course (along with the meal). But you can have it as tea time snack as well.

It’s an easy recipe. Only one point to be paid attention to is not to cook Pumpkin mixture after adding Jaggery. Just cook till Jaggery melts. It you cook further, Puri will be hard.

Some call this Bhopalyachi Puri.

Ingredients (Makes 20-22 Puri) (1 cup = 250 ml)

Red Pumpkin Peeled and Grated 1 cup

Wheat flour 1.5 cup (approx)

Jaggary crushed ½ cup

Cardamom Powder ¼ teaspoon

Cinnamon Powder ¼ teaspoon

Salt ¼ teaspoon

Oil 1 teaspoon

Oil for frying

Instructions

1. Peel and grate red pumpkin

2. In a pan, add 1 teaspoon of oil and grated red pumpkin, sauté on low flame for 2 minutes and cook covered on low flame for 2-3 minutes

3. Add Crushed Jaggery, salt, mix and cook till Jaggery melts. Keep stirring all the time. If you cook longer then Puris will be hard.

4. Transfer the mixture to a plate in which you will mix flour and bind the dough

5. When the mixture is warm, add about a cup of wheat flour each and mix. Add Cardamom powder and Cinnamon powder. Keep adding a spoonful of wheat flour till you bind a medium stiff dough. Do not add water. Sometimes pumpkin releases more water, in that case you may need more flour. Keep the dough for 15-20 minutes.

6. Roll puris – thicker than normal puris and deep fry in oil. Puri should puff well else Puri will be hard upon cooling.

7. These puris can be eaten hot or cold. Serve with desi ghee / clarified butter.

Bhopalyache Gharge / Puri (भोपळ्याचे घारगे)
Bhopalyache Gharge / Puri (भोपळ्याचे घारगे)
         ===================================================================================

भोपळ्याचे घारगे

भोपळ्याचे घारगे गोड पुऱ्या हा महाराष्ट्रातला पारंपारिक पदार्थ आहे. घारग्यांना काही ठिकाणी भोपळ्याच्या पुऱ्या ही म्हणतात. जेवणात खाल्ला तर पक्वान्न म्हणून किंवा चहाबरोबर नाश्ता म्हणून ही हे घारगे दिले जातात. घारगे बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. ह्या रेसिपी त गव्हाची कणिक वापरली आहे. दुसऱ्या प्रकारांमध्ये रवा, तांदुळाचे पीठ आणि कणिक वेगवेगळ्या प्रमाणात वापरतात. रेसिपी अगदी सोपी आहे. आणि घारगे मस्त खुसखुशीत आणि स्वादिष्ट बनतात. दुसऱ्या दिवशीही छान लागतात. परफेक्ट  घारगे बनवण्यासाठी माझ्या टीप्स :

. भोपळ्याच्या किसात गूळ घातल्यावर फक्त गूळ वितळेपर्यंत मिश्रण शिजवा. जास्त वेळ शिजवले तर घारगे खुसखुशीत न होता कडक होतात.

. घारगे जरा जाडसर लाटा / थापा. पातळ घारगे कडक होतात.

साहित्य (२०२२ घारग्यांसाठी) (१ कप = २५० मिली)

लाल भोपळ्याचा कीस १ कप

चिरलेला गूळ अर्धा कप

कणिक अंदाजे दीड कप

मीठ पाव चमचा

वेलची पूड पाव चमचा

दालचिनी पूड पाव चमचा

तेल १ चमचा

तेल / तूप घारगे तळण्यासाठी

कृती

. लाल भोपळा सोलून किसून घ्या.

. एका कढईत तेल घालून त्यात भोपळ्याचा कीस घाला. मंद गॅसवर २ मिनिटं परता. पाणी न घालता २ मिनिटं झाकण ठेवून वाफ काढा.

. आता चिरलेला गूळ, मीठ  घालून ढवळा. गूळ वितळला की गॅस बंद करा. जास्त शिजवू नका नाहीतर घारगे कडक होतात.

. मिश्रण एका परातीत काढून घ्या.

. मिश्रण कोमट असताना १ कप कणिक घाला. वेलची पूड आणि दालचिनी पूड घाला. मिश्रण मळून घ्या. आता ११ चमचा कणिक घालत पुऱ्यांसारखं घट्ट पीठ भिजवा. पाणी अजिबात घालू नका. कधी कधी भोपळ्याला जास्त पाणी सुटतं. त्यामुळे जास्त कणिक लागू शकते.

. पीठ १५२० मिनिटं झाकून ठेवा.

. पीठ जरा मळून घ्या आणि लिंबाच्या आकाराचे गोळे करा. गोळे लाटून / थापून जाडसर पुऱ्या बनवा आणि मध्यम आचेवर गरम तेलात / तुपात तळून घ्या.

. स्वादिष्ट खमंग खुसखुशीत घारगे साजूक तुपाबरोबर आणखी छान लागतात. तूप नको असेल तर असेच ही खाऊ शकता. घारगे शिळे पण छान लागतात

Bhopalyache Gharge / Puri (भोपळ्याचे घारगे)
Bhopalyache Gharge / Puri (भोपळ्याचे घारगे)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes