Anarase (अनरसे) – Maharashtrian Specialty Sweet Crispy Indian Pastry

Anarase (अनरसे)

Anarase (अनरसे) – Maharashtrian Specialty Sweet Crispy Indian Pastry

अनरसे मराठी

Anarase is a Maharashtrian specialty made from fermented rice and Jaggery (or sugar). It is a lengthy process to make Anarase flour as rice needs to be soaked for a few days. I find it easier to buy the ready made flour and make Anarase at home. A perfect Anarasa is light, crispy and porous. To make good Anarase, quality of the flour is as important as the right process of making Anarase. Since it is little different process for frying Anarase, I’ll try to attach a video for it. If you can manage this step, you will be able to get perfect Anarase. Note – you need two spatulas to fry Anarase.

Ingredients

Anarase ready made flour (I used K-Pra) 1 packet 500 gms

Milk 4-5 tablespoons

Khuskhus (Poppy Seeds) 4 tablespoon

Ghee (Thick Vegetable Oil) to deep fry

Instructions

1. Take out the contents of Anarase flour in a plate. If there are any lumps, break them with your fingers.

2. Mix milk 1 tablespoon at a time and bind dough. Be careful while adding milk. This dough requires very less milk. For 500 gms flour, I used only 4 tablespoon of milk. If you add too much milk, you will not be able to make Anarase. Dough should not be very soft.

3. Dry roast Khuskhus till light brown.

4. Knead the dough. Make small balls of the dough (dough balls similar to the ones that you make for Puri)

5. On a plastic sheet, apply little Ghee.

6. Place the dough ball on the sheet and gently pat to make a thin round shape Puri

7. Heat Ghee in a pan. You need to fry on low flame.

8. You need 2 spatulas to deep fry Anarase. Place one spatula half dipped in ghee

9. Gently place Anarasa on this spatula. Anarasa will start spreading. Use second spatula to control the shape on Anarasa

10. After a minute or so, Anarasa will stop spreading. Now take it on one spatula and splash ghee on it using second spatula till Anarasa is brown (or light brown if you like it that way)

11. Anarasa should not be flipped while frying.

12. Once it is brown, take the spatula out of ghee. Using both spatulas press Anarasa gently to remove excess ghee.

13. Keep a plate ready with kitchen tissue paper spread on it.

14. Transfer Anarasa to the plate and sprinkle khuskhus on it. Anarasa will be soft at this stage.

15. Fry all Anarase using the above process.

16. Once Anarasa is cold, it gets crispy. Transfer to an air tight container.

17. You can enjoy this delicious sweet for 3-4 weeks. No need to store in refrigerator.

Anarase

 

 

 

 

 

 

 

===================================================================================

अनरसे महाराष्ट्रीयन स्पेशालिटी

अनरसे हा दिवाळीच्या फराळातला स्वादिष्ट पदार्थ आहे पण करायला कठीण आणि वेळखाऊ आहे. अनरशाचं पीठ करण्यासाठी तांदूळ भिजवून ठेवावे लागतात. मग तांदूळ वाळवून, दळून आवडीप्रमाणे गूळ, साखर घालून पीठ आंबवावं लागतं. अर्धा किलो तयार पिठासाठी एवढी खटपट करणं मला नकोसं वाटतं. म्हणून मी तयार पीठ विकत आणते. केप्र चं अनरसे पीठ छान असतं. पीठ चांगलं मिळालं की अनरशाची पहिली पायरी पार पडली. पुढची कठीण पायरी म्हणजे अनरसे तळणे. हे जरा कौशल्याचं काम आहे. परफेक्ट अनरसे हलके, जाळीदार आणि कुरकुरीत असतात. तळताना ते पुरीप्रमाणे फुगू नयेत म्हणून अनरसे थापताना पातळ थापावे. गरम तुपात अनरसा घातल्यावर पसरतो. तेव्हा दोन झाऱ्यांच्या साहाय्याने त्याला पसरण्यापासून थांबवावे लागते. एखाद्या मिनिटांनी अनरसा पसरायचा थांबतो. तेव्हा तो एका झाऱ्यावर घेऊन दुसऱ्या झाऱ्याने त्यावर तूप उडवायचं. म्हणजे छान जाळी पडते. अनरसा तळताना परतायचा नाही. तळणीतून बाहेर काढून त्यावर खसखस पेरायची. अनरसा तळण्याचा मी बनवलेला व्हिडीओ देतेय म्हणजे कृती कळेल

टिप्स

. मी आधी सांगितल्याप्रमाणे अनरश्याचे पीठ चांगलं असणं खूप महत्त्वाचं असतंअनरसे कडकडीत झाले म्हणजे पीठ चांगलं नाही.

. अनरसे मऊ पडले तर तुमचा तुम्ही अनरसे बरोबर तळले नाहीत (मोठ्या आचेवर तळले) किंवा पीठ चांगलं नाही.

. काही वेळा अनरसे तुपात टाकल्यावर विरघळतात. तेव्हा जरा जाड अनरसे थापून बघा. तेही विरघळले तर अनरसे करण्याचा नाद सोडून द्या आणि थोडी कणिक घालून पुऱ्या करा आणि अनरश्याच्या पुऱ्या असा नवीन पदार्थ बनवून पीठ संपवा. माझ्या बाबतीत २ वेळा असं झालंय. अगदी नावाजलेल्या दुकानातून पीठ आणलं आणि मग पुऱ्या करून संपवलं. त्यानंतर केप्र चं पीठ आणायला सुरुवात केली.

. अनरश्याचा रंग त्यात साखर आहे की गूळ यावर ठरतो. गुळाचे अनरसे ब्राऊन होतात. आणि सेंद्रिय गूळ घातला असेल तर अनरसे जास्त ब्राऊन होतात. यात चूक / बरोबर असं काही नाही. म्हणजे तिचा अनरसा माझ्या अनरश्यापेक्षा गोरा कसा हा प्रश्न पडू देऊ नका.

. खसखस नेहमी अनरसे तळल्यावर घाला. आधी घातली तर ती तुपात उतरून तूप खराब होतं

. अनरसे बिघडले तर दुरुस्त करता येत नाहीत हे लक्षात ठेवा आणि फार वाईट वाटू देऊ नका

साहित्य (पाकिटावर २५३० अनरसे लिहिलंय पण ३५३८ होतात )

अनरश्याचं तयार पीठ अर्धा किलो (मी केप्र वापरते)

दूध ४५ टेबलस्पून

खसखस ४ टेबलस्पून

तूप तळण्यासाठी

कृती

. अनरश्याचं पीठ एका परातीत काढून घ्या. गुठळ्या असतील तर हाताने मोडून घ्या.  

. एकएक टेबलस्पून दूध घालून मध्यम सैल पीठ भिजवा. जास्त दूध घातलं तर पीठ सैल होईल आणि अनरसे थापता येणार नाहीत.

. खसखस सुकी भाजून वेगळी ठेवा.

. पिठाचे पुरीच्या गोळ्यासारखे गोळे करून घ्या.

. एका प्लास्टिकच्या कागदाला / बटर पेपर ला थोडं तूप लावून घ्याएकेक गोळा कागदावर ठेवून हलक्या हाताने पातळ थापून घ्या.

. कढईत तूप गरम करून घ्या. अनरसे मंद आचेवर तळायचे असतात. दोन झारे तयार ठेवा.

. तुपात अनरसा सोडा.

. गरम तुपात अनरसा घातल्यावर पसरतो. तेव्हा दोन झाऱ्यांच्या साहाय्याने त्याला पसरण्यापासून थांबवावे लागते. एखाद्या मिनिटांनी अनरसा पसरायचा थांबतो.

. तेव्हा तो एका झाऱ्यावर घेऊन दुसऱ्या झाऱ्याने त्यावर तूप उडवा. म्हणजे छान जाळी पडते.

. अनरसा तळताना परतायचा नाही. तळणीतून बाहेर काढून त्यावर खसखस पेरा. तळलेला अनरसा टिश्यू पेपर वर ठेवा किंवा ताटलीत ठेवून ताटली जरा कलती ठेवा. म्हणजे जास्तीचं तूप ताटलीच्या कडेला जमा होईल. हे तूप तुम्ही पोळ्यांची कणिक भिजवताना वापरू शकता

१०. अनरसे गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा

Anarase (अनरसे)
Anarase (अनरसे)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*