Bisi Bele Huli Anna (बिशी बेळये भात ) – Bisi Bele Rice / Sambar Rice– Popular One Pot Meal

Bisi Bele Huli Anna (बिशी बेळये भात )
Bisi Bele Huli Anna (बिशी बेळये भात )

Bisi Bele Huli Anna (बिशी बेळये भात ) – Bisi Bele Rice / Sambar Rice– Popular One Pot Meal

बिशी बेळये भात मराठी

This is a popular Rice dish from southern India. It is Rice and Sambar (South Indian Dal / Curry) cooked together. It is one pot meal. In our family everyone likes it. So sometimes this is cooked instead of standard meal. Bisi Bele Rice served with generously added pure Ghee along with fried Papad makes a lovely meal. It’s an easy recipe if you use ready made Sambar Masala. Else it is a lengthy process. I generally use ready made Sambar Masala.

Ingredients (Serves 4) (1 cup = 250 ml)

Raw Rice ¾ cup

Tuvar Dal / Split Pigeon Peas ½ cup

Onion 2 medium

Tomato 1 medium

Boiled Potato 2 medium

Tamarind Pulp 1.5 to 2 tablespoon

Sambar Masala / Curry Masala About 4 teaspoon

Oil 3 tablespoon

Mustard Seeds ¼ teaspoon

Cumin seeds ¼ teaspoon

Turmeric powder ½ teaspoon

Asafoetida ¼ teaspoon

Curry leaves 18-20

Chopped Coriander 2 teaspoon

Chopped Cashew Nuts 2 tablespoon

Salt to taste

Instructions

1. Wash and pressure cook Rice and Tuvar Dal separately. Add 2 pinch of turmeric powder and 2 drops of oil to Dal before you pressure cook it.

2. Peel and chop onion into thin slices.

3. Chop tomato into medium size pieces.

4. Peel boiled potato and make long medium size pieces.

5. In a thick bottom pan, heat 2 tablespoon of oil. Add Potato pieces and fry till colour changes. Take them out in a plate. In the same oil add Cumin seeds; wait for sputter. Add turmeric powder and half of curry leaves.

6. Add sliced onions. Saute for 3-4 minutes on low flame. Add tomatoes. Saute for 2-3 minutes on low flame. Add 1 tablespoon of tamarind paste. Add 1 cup of water. Cook covered on low flame till onions are cooked.

7. Add cooked Rice, cooked Dal and Mix properly. Add remaining tamarind pulp, Sambar Masala, salt. Because of Sambar Masala, Rice thickens. Add water to make porridge like consistency; mix well.

8. Cook covered  on low flame for 5-6 minutes. Adjust Sambar Masala, tamarind pulp and salt to your taste.

9. Finally add fried potato and mix.

10. In a ladle, heat 1 tablespon of oil. Add mustard seeds; wait for splutter. Add Asafoetida, curry leaves. Switch off the gas. Add cashew nuts and fry slightly. Pour this on rice mixture. Gently mix together. Add chopped coriander.

11. Bisi Bele Huli Anna is ready. Serve hot with a spoonful of Pure Ghee and some fried Papad.

Note

1. Bisi Bele Rice thickens as it gets cold. Add water to adjust the consistency accordingly.

2. You can add any vegetables of your choice. Cook them along with onion and tomatoes. But note that number of servings of cooked dish will increase. So accordingly adjust the measure of Rice and Dal.

3. Amount of Sambar Masala you need for this rice depends on the quality of Masala. It is better to add less quantity to start with and then add more if required.

4. If you like more pungent Rice, add 2-3 dry chilies in the oil in step 10.

Bisi Bele Huli Anna (बिशी बेळये भात )
Bisi Bele Huli Anna (बिशी बेळये भात )

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

बिशी बेळये भात लोकप्रिय दक्षिण भारतीय पदार्थ

बिशी बेळये भात हा दक्षिण भारतात सगळीकडे केला जातो. थोडक्यात सांगायचं तर हा एकत्र शिजवलेला सांबार भात. हा चविष्ट आणि पोटभरीचा One Pot Meal पदार्थ आमच्याकडे फार आवडतो. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी दुपारच्या जेवणात हा पदार्थ केला की सगळे आवडीने खातात. गरमगरम बिशी बेळये भात, त्यावर सढळ हाताने घातलेलं साजूक तूप आणि सोबत तळलेला पापड म्हणजे आमची मेजवानीच असते.
सांबार मसाला तयार असेल (घरी केलेला किंवा विकतचा) तर हा भात पटकन होतो. मी विकतचा सांबार मसाला वापरते.

साहित्य (१ कप = २५० मिली)

तांदूळ पाऊण कप

तूर डाळ अर्धा कप

कांदे २ मध्यम आकाराचे

टोमॅटो १ मध्यम आकाराचा

उकडलेले बटाटे २ मध्यम आकाराचे

चिंचेचा कोळ दीड ते दोन टेबलस्पून

सांबार मसाला ४ टीस्पून

तेल ३ टेबलस्पून

मोहरी पाव टीस्पून

जिरं पाव टीस्पून

हिंग पाव टीस्पून

कढीपत्ता १८२० पानं

काजूचे तुकडे २ टेबलस्पून

मीठ चवीनुसार

कृती

. तांदूळ आणि डाळ धुवून प्रेशर कुकर मध्ये वेगवेगळी शिजवून घ्या. डाळ शिजवताना त्यात २ चिमूट हळद आणि २ थेम्ब तेल घाला.

. कांदे सोलून उभे पातळ चिरून घ्या.

. टोमॅटोचे मध्यम आकाराचे पातळ तुकडे करून घ्या.

. उकडलेले बटाटे सोलून मध्यम आकाराचे लांबट तुकडे करून घ्या.

. एका जाड बुडाच्या पातेल्यात दोन टेबलस्पून तेल गरम करून त्यात बटाट्याचे तुकडे घालून रंग बदलेपर्यंत टाळून घ्या. बटाटे ताटलीत काढून घ्या. त्याच तेलात जिरं, हळद आणि अर्धी कढीपत्त्याची पानं घालून खमंग फोडणी करा.

. चिरलेला कांदा घालून ३४ मिनिटं मंद आचेवर परतून घ्या. चिरलेला टोमॅटो घाला. ३ मिनिटं मंद आचेवर परतून घ्या.१ टेबलस्पून चिंचेचा कोळ घाला. १ कप पाणी घाला. पातेल्यावर झाकण ठेवून मंद आचेवर कांदा शिजेपर्यंत मिश्रण शिजवून घ्या.

. शिजलेला भात मोकळा करून पातेल्यात घाला. शिजलेली डाळ घाला. मिश्रण ढवळून घ्या. उरलेला चिंचेचा कोळ, सांबार मसाला आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करा. सांबार मसाल्यामुळे मिश्रण दाट होतं. जरुरीनुसार पाणी घालून मिश्रण दाट पिठल्याएवढं पातळ असू द्या.

. झाकण ठेवून ५६ मिनिटं मंद आचेवर शिजवा. चव बघून जरूर असल्यास चिंच, सांबार मसाला, मीठ घाला.

. आता बटाटे घालून मिश्रण ढवळून घ्या.

१०. एका कढल्यात १ टेबलस्पून तेल गरम करून मोहरी, हिंग आणि कढीपत्त्याची खमंग फोडणी करा. गॅस बंद करा. काढल्यात काजूचे तुकडे घालून रंग बदलेपर्यंत ठेवा आणि ही फोडणी पातेल्यात ओता. हलक्या हाताने मिश्रण ढवळून घ्या. शेवटी कोथिंबीर घाला.

११. चविष्ट बिशी बेळये भात तयार आहे. गरम गरम भातावर चमचाभर साजूक तूप घालून तळलेल्या पापडासोबत खायला घ्या.

टीप

. हा भात थंड झाल्यावर आळतो. त्यामुळे करताना जरा पातळच करावा.

. ह्यात तुम्ही तुमच्या आवडत्या भाज्या घालू शकता. पण त्यामुळे तयार भात जास्त होईल हे लक्षात ठेवून त्या प्रमाणात डाळ, तांदूळ घ्या.

. सांबार मसाला किती स्ट्रॉन्ग आहे त्यावर किती घालायचा ते ठरेल. आधी थोडा मसाला घालून नंतर चव बघून आणखी घालतेला बरा.

. तुम्हाला भात तिखट हवा असेल तर शेवटी फोडणी करताना त्यात २३ सुक्या मिरच्या घाला.

Bisi Bele Huli Anna (बिशी बेळये भात )
Bisi Bele Huli Anna (बिशी बेळये भात )

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes