Matar Usal (मटार उसळ) – Green Peas Subji

Matar Usal (मटार उसळ) – Green Peas Subji

Matar Usal (मटार उसळ) – Green Peas Subji

मटार उसळ मराठी

This is an easy, quick, non spicy yet tasty recipe of Matar (Green Peas). This recipe is followed in Maharashtrian Brahmin families. This is no onion, garlic recipe that requires very few ingredients.

Ingredients (serves 4)

Green Peas (Matar) Pods 1 kilogram

Medium size Potato 2

Green Chilly Paste ¾ teaspoon

Sugar ½ – 1 teaspoon (adjust as per taste)

Scraped Fresh Coconut 1 tablespoon

Chopped Coriander 1 tablespoon

Salt to taste

For Tempering (Tadka)

Oil 1 teaspoon

Mustard Seeds ¼ teaspoon

Cumin Seeds (Jeera) ¼ teaspoon

Turmeric Powder ¼ teaspoon

Asafoetida a pinch

Instructions

1. Remove peas from Green Peas pods and wash them.

2. Wash & Cut Potato into medium size pieces. I’ve not peeled it. If you want, you can peel it before cutting

3. Heat oil in a pan on medium flame.

4. Add mustard seeds, wait for splutter; add cumin seeds, wait for sputters; add Turmeric Powder.

5. Add Asafoetida and Green Chilly Paste.

6. Turn Gas to low. Add Potato pieces, sauté for 2 minutes; cover and cook for 2 minutes.

7. Add peas, sauté and cook covered for 2-3 minutes.

8. Add hot water enough to cover half the peas; bring it to boil.

9. Cook covered till peas and potatoes are soft.

10. While cooking add small quantity of water if required.

11. Add scraped coconut, chopped coriander, Sugar and Salt; bring it to boil. Boil till small amount of water is left in the subji.

12. Serve hot. Goes well with Roti / Rice. I like it with Rice. Mix Matar Usal with Rice; add a spoonful of curd and enjoy. It’s very very yummy.

Matar Usal (मटार उसळ) – Green Peas Subji
Matar Usal (मटार उसळ) – Green Peas Subji

 

 

 

 

 

 

 

 

 

 

=================================================================================

मटार उसळ

मटार चा सिझन चालू झालाय. आता मटार ची उसळ बनवायलाच पाहिजे. ब्राह्मणी पद्धतीची मटार उसळ अतिशय टेस्टी लागते. फक्त हिरवी मिरची आणि तेलाची फोडणी घालून भाजीला मस्त चव येते. मटार उसळ आणि दही भात !! अहाहा !! अप्रतिम कॉम्बिनेशन !! लिहितानाच तोंडाला पाणी सुटतंय.

काही जणी ह्या उसळीत तांदुळाच्या पिठाचं आळण लावतात. पण मी नाही लावत. मला वाटतं उसळीची चव बदलते त्याने

साहित्य (४ जणांसाठी)

मटार च्या शेंगा १ किलो

बटाटे २ मध्यम

वाटलेली हिरवी मिरची पाऊण चमचा

ताजा खवलेला नारळ १ टेबलस्पून

चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून

साखर अर्धा ते एक चमचा (चवीनुसार कमी / जास्त करा)

मीठ चवीनुसार

फोडणीसाठी

तेल १ चमचा

मोहरी पाव चमचा

जिरं पाव चमचा

हळद पाव  चमचा

हिंग चिमूटभर

कृती

. मटारचे दाणे काढून धुवून घ्या.

. बटाटे धुवून मध्यम आकाराचे तुकडे करामी बटाट्याची सालं काढत नाही. तुम्हाला हवं असेल तर बटाटे सोलून तुकडे करा.

. एका पातेल्यात तेल घालून मोहरी, जिरं, हळद, हिंगाची फोडणी करा. हिरवी मिरची घाला.

.गॅस बारीक करा. बटाट्याचे तुकडे घालून २ मिनिटं परतून घ्या. झाकण ठेवून २ मिनिटं  वाफ काढा. पाणी घालू नका

. मटारचे दाणे घाला. परतून घ्या. झाकण ठेवून २३ मिनिटं  वाफ काढा.

. मटार चे दाणे अर्धे बुडतील एवढं गरम पाणी घाला. मंद आचेवर मटार आणि बटाटे मऊ होईपर्यंत झाकण ठेवून शिजवा. अति  शिजवू नका. लागल्यास थोडे पाणी घाला.

. नारळ, कोथिंबीर, मीठ, साखर घालून एक उकळी आणा. रस जेवढा हवा असेल त्यानुसार पाणी आटवून घ्या.

. गरमागरम मटार उसळ खायला द्या. भात, पोळी कशाबरोबर ही छान लागते.

Matar Usal (मटार उसळ) – Green Peas Subji
Matar Usal (मटार उसळ) – Green Peas Subji

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*