Corn Cheese Puffs with home made Pastry Sheets (कॉर्न चीज पफ्स)

Corn Cheese Puffs with home made Pastry Sheets (कॉर्न चीज पफ्स)

Corn Cheese Puffs with home made Pastry Sheets (कॉर्न चीज पफ्स)

कॉर्न चीज पफ्स मराठी

We all love crispy, layered, delicious Puffs. Making these Puffs at home was in my ‘Bucket list’ for a while. But the amount of Butter used in making these pastries made my stay away from these for a while. Recently I came across a recipe that used about half the quantity of Margarine as compared with earlier recipes. So I decided to try these. These Puffs came out really well. They were crispy, fluffy and layered. So one item in my ‘Bucket list’ has been ticked off.

The process of making pastry sheets is tedious but you can make the sheets upfront and make the pastries when you want. Try it out. It really comes out very well.

Ingredients (for about 10-12 puffs)

All purpose flour (Maida) 250 grams + about 75 grams for dusting

Margarine 125 grams

Oil 1.5 tablespoon

Salt 1 teaspoon

Milk 2 teaspoon (for milk wash before baking)

For Filling

Sweet corn 2 cups

Chat Masala ½ teaspoon

Chilly Powder ½ teaspoon

Chopped coriander 1 tablespoon

Lemon Juice ½ teaspoon

Sugar ½ to 1 teaspoon (adjust as per taste)

Salt to taste

Oil 1 teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Asafoetida a pinch

Turmeric Powder a pinch

Cheese Cubes 2 grated

Instructions

1. In a bowl, mix 250 grams All purpose flour, Salt and Oil. Add water and bind a medium consistency dough. Cover it and rest for 15 minutes.

2. Knead the dough for 5 minutes.

3. Make 3 equal parts of Margarine.

4. Roll the dough ball into a big circular / rectangle sheet as thin as possible. Use dry All purpose flour for dusting.

5. Take one part of Margarine. Loosen it with the help of a fork.

6. Spread it evenly on the dough sheet evenly. Sprinkle dry flour over it. Fold the sheet 4 times to form a rectangle (check attached photos).

Roll a sheet, apply Margarine and sprinkle some All purpose flour (मैद्याच्या पोळीवर मार्गरिन लावून मैदा भुरभुरवा)
Fold the sheet four times and make a rectangular sheet (पोळीला चार घड्या घालून चौकोन बनवा)
 
Fold the sheet four times and make a rectangular sheet (पोळीला चार घड्या घालून चौकोन बनवा)
Fold the sheet four times and make a rectangular sheet (पोळीला चार घड्या घालून चौकोन बनवा)

7. Cover the dough sheet and keep it in refrigerator (not freezer) for 20 minutes.

8. Take out the dough from refrigerator; apply dry flour on both sides and roll it into a rectangle shaped sheet of medium thickness.

9. Repeat steps 6 to 8 two times. You will use all the Margarine when you roll the dough third time.

10. Keep the dough in refrigerator while you make the filling.

11. For filling, boil sweet corn in microwave or using any other method.

12. Drain water and leave corn to cool. Upon cooling, grind into a coarse paste.

13. In a pan, heat oil. Add cumin seeds, wait for splutter. Add Asafoetida.

14. Add corn paste and turmeric powder. Mix.

15. Sauté till the excess water from the mixture dries.

16. Add Chat Masala, Chilly powder, Salt, Sugar, Lemon Juice, chopped coriander. Mix.

17. Take it out to a bowl and leave it to cool.

Corn Filling (मक्याचे सारण)

18. Now take out the dough from refrigerator. Apply dry flour on both sides. Roll the dough into rectangle sheet of medium thickness.

19. Trim the edges from all sides (this is an important step. Without this the pastry will not have layers).

Trim the edges and cut rectangular pieces (कडा कापून टाका आणि पोळीचे चौकोनी तुकडे करा)

20. Cut rectangular or square pieces of the dough sheet. Place a tablespoon of filling in the centre of each piece, place some grated cheese on the top and fold the sheet in a triangular shape. Using a drop of milk gently press the lose angle of the triangle so that it does not open while baking. Do not seal the sides.

Place the filling in the centre and spread some cheese (मधोमध सारण ठेवून त्यावर चीज घाला)
Gently seal the lose angle of the triangle (त्रिकोणाचं टोक हलकेच बंद करा)

21. After preparing all the puffs this way, place them on a butter paper in a baking tray. Gently spread milk on the top of puffs (milk wash). Bake in preheated oven on 200 degrees for about 25 minutes.

22. Crispy, Layered, delicious puffs are ready. Serve hot with tomato sauce.

23. You can also bake the edges of the dough sheet that you have cut in step 19. Place them in the baking tray after milk wash. Be watchful, they get baked faster than puffs.

Corn Cheese Puffs with home made Pastry Sheets (कॉर्न चीज पफ्स)
Corn Cheese Puffs with home made Pastry Sheets (कॉर्न चीज पफ्स)
        

Note

1. If you want to store the Pastry sheet to make puffs later, there are 2 ways to store it. You can either store it in refrigerator

a. after step 9. Take it out of refrigerator just when you want to make puffs and roll the sheet.

Or

b. after step 19. Place the rolled dough sheet between 2 butter papers and make a lose roll of the sheet and store it. Take it out of refrigerator just when you want to make puffs; cut into desired shaped pieces and proceed.

2. You can use any other filling of you choice.

3. You can bake these puffs in cooker. For this spread salt / sand in cooker. Place a stand on salt / sand and place a plate on the stand. Heat the cooker. Grease the plate and Place puffs on it. Cover the cooker and bake on medium heat for 15-20 minutes. When the crust is brown, flip the puffs and bake the other side.

===================================================================================

कॉर्न चीज पफ्स पेस्ट्री शीट्स बनवून

आपल्या सर्वांना खुसखुशीत, खूप पापुद्रे असलेले पफ्स खायला आवडतात. हे पफ्स बनवणे हे माझ्या बकेट लिस्टमध्ये बरेच दिवसांपासून होतं. पण ह्यात घातलं जाणारं बटर चं प्रमाण बघून माझी हिम्मत होत नव्हती पफ्स बनवण्याची. पण हल्लीच मला एक रेसिपी मिळाली ज्यात मार्गरिन घातलं होतं आणि मार्गरिन चं प्रमाण बाकीच्या रेसिपी मधल्या बटर पेक्षा अर्ध होतं. मग हिम्मत केली. आणि खूप छान खुसखुशीत, खूप पापुद्रे असलेले पफ्स बनले की! माझ्या बकेट लिस्टमधला एक पदार्थ टिक झाला !!

पफ्स शीट बनवायची कृती जरा वेळकाढू आहे पण तुम्ही ह्या शीट आधी बनवून फ्रिज मध्ये ठेवू शकता. आणि पाहिजे तेव्हा पफ्स बनवू शकता. नक्की करून बघा.

साहित्य (अंदाजे १०१२ पफ्स साठी)

मैदा पाव  किलो + ७५ ग्राम डस्टिंग साठी

मार्गरिन १२५ ग्राम (वापरायच्या वेळीच फ्रिज मधून काढा)

मीठ १ चमचा

तेल दीड टेबलस्पून  

दूध २ टीस्पून

सारणासाठी 

मक्याचे दाणे २ कप

चाट मसाला अर्धा चमचा

लाल तिखट अर्धा चमचा

लिंबाचा रस अर्धा चमचा

साखर अर्धा ते एक चमचा

चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून

मीठ चवीनुसार

तेल १ चमचा

जिरं पाव चमचा

हिंग चिमूटभर

हळद चिमूटभर

चीज क्युब्स २ किसून

कृती

. पाव किलो मैद्यामध्ये तेल, मीठ घालून मिक्स करा. पाणी घालून मध्यम घट्ट पीठ भिजवा१५ मिनिटं झाकून ठेवा.

. ५ मिनिटं पीठ चांगलं मळून घ्या.

. मार्गरिन चे ३ सारखे भाग करा. हे सुरीने कापता येतं.

. मैद्याची पातळ पोळी लाटून घ्या. लाटताना जसा लागेल तसा सुका मैदा वरून लावा. पोळी गोल किंवा चौकोनी लाटा.

. एक भाग मार्गरिन काट्याने नरम करून घ्यालाटलेल्या पोळीवर मार्गरीन एकसारखं पसरा. आता त्यावर थोडा मैदा भुरभुरवा. पोळीच्या ४ घड्या घालून चौकोन बनवा. (फोटो दिलेला आहे). 

Roll a sheet, apply Margarine and sprinkle some All purpose flour (मैद्याच्या पोळीवर मार्गरिन लावून मैदा भुरभुरवा)
Fold the sheet four times and make a rectangular sheet (पोळीला चार घड्या घालून चौकोन बनवा)
Fold the sheet four times and make a rectangular sheet (पोळीला चार घड्या घालून चौकोन बनवा)
Fold the sheet four times and make a rectangular sheet (पोळीला चार घड्या घालून चौकोन बनवा)

. पिठाची  चौकोनी घडी झाकून २० मिनिटं फ्रिज मध्ये ठेवा (फ्रिजर मध्ये नाही).

. फ्रिज मधून पीठ बाहेर काढून दोन्ही बाजूला मैदा लावा. आणि परत चौकोनी पोळी लाटा फार पातळ नाही आणि फार जाड नाही.

. स्टेप्स ५ ते ७ दोन वेळा रिपीट करा. तिसऱ्या वेळेला तुम्ही सर्व मार्गरिन वापरलं असेल.

. सारण बनवेपर्यंत पिठाची  चौकोनी घडी फ्रिज मधेच ठेवा.  

१०. सारणासाठी मक्याचे दाणे शिजवून घ्या. पाणी काढून टाका आणि मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.

११. एका कढईत तेल गरम करून जिरं आणि हिंग घाला. वाटलेला मका, हळद  घाला. मिक्स करा.

१२. पाणी सुकेपर्यंत मंद आचेवर परता.

१३. लाल तिखट, चाट मसाला, मीठ, साखर, लिंबू आणि चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा.

१४. एका बाउल मध्ये काढून गार करा.

Corn Filling (मक्याचे सारण)

१५. आता पिठाची चौकोनी घडी फ्रिजमधून काढून लाटून घ्या फार पातळ नाही आणि फार जाड नाही.

१६. कडा सर्व बाजूनी कापून घ्या (कडा काढल्या नाहीत तर पापुद्रे सुटणार नाहीत )

१७. पोळीचे चौकोनी तुकडे कापून घ्या.

Trim the edges and cut rectangular pieces (कडा कापून टाका आणि पोळीचे चौकोनी तुकडे करा)

१८. प्रत्येक तुकड्यावर मधोमध १ चमचा सारण ठेवून त्यावर चीज घाला. तुकडा घडी करून त्रिकोणी आकार द्या. त्रिकोणाच्या मधल्या टोकावर थोडं दूध लावून हलक्या हाताने दाबून बंद करा. बाजूने बंद करू नका.

Place the filling in the centre and spread some cheese (मधोमध सारण ठेवून त्यावर चीज घाला)
Gently seal the lose angle of the triangle (त्रिकोणाचं टोक हलकेच बंद करा )

१९. सगळे पफ्स असे बनवून घ्या. बेकिंग ट्रे मध्ये बटर पेपर घालून त्यावर पफ्स ठेवा. पफ्स च्या वर हलक्या हाताने दूध पसरा.

२०. प्री हीटेड ओव्हन मध्ये २०० डिग्री वर २५ मिनिटं बेक करा.

२१. खुसखुशीत, खूप पापुद्रे असलेले चविष्ट पफ्स तयार आहेत. गरमागरम पफ्स टोमॅटो सॉस बरोबर खायला द्या.

२२. कापलेल्या कडा पण वरून दूध लावून पफ्स बरोबर बेक करा. ह्या कडा लवकर भाजल्या जातात.

Corn Cheese Puffs with home made Pastry Sheets (कॉर्न चीज पफ्स)
Corn Cheese Puffs with home made Pastry Sheets (कॉर्न चीज पफ्स)

टीप

. पफ्स शीट्स तुम्ही आधी बनवून ठेवू शकता.

. स्टेप ८ नंतर बनलेली पिठाची चौकोनी घडी फ्रिज मध्ये ठेवा. पफ्स करायच्या आधी फ्रिजमधून काढून पोळी लाटून पुढची कृती करा.

. स्टेप १५ नंतर बनलेली पिठाची पोळी दोन्ही बटर पेपर मध्ये ठेवा आणि गुंडाळी बनवून फ्रिज मध्ये ठेवापफ्स बनवताना फ्रिजमधून काढून सारण भरून पफ्स बनवा.

. सारण तुमच्या आवडीचे जिन्नस घालून बनवू शकता.

. पफ्स कुकर मध्ये / पातेल्यात भाजू शकता. त्यासाठी पातेल्यात मिठाचा / वाळूचा थर देऊन स्टॅन्ड ठेवून ताटली ठेवा. पातेलं गरम करून घ्या. ताटलीला तूप / तेल लावून पफ्स ठेवा. झाकण ठेवून १५२० मिनिटं भाजा. आणि नंतर पफ्स पलटून दुसरी बाजू भाजून घ्या

2 Comments

  1. खूपच छान \r\nमला विचारायचे आहे कि जर मी हे otg मध्ये बेक केले तर खाली आणि वर दोन्ही कडून बेक करू न ??

    • धन्यवाद जयश्री. OTG मध्ये दोन्ही बाजूनी भाजायची जरुरी नाही. \n\nSudha

Leave a Reply to Jayshree bhawalkar Cancel reply