Fanasachi Bhaaji (कच्च्या फणसाची भाजी) – Raw Jackfruit Subji – Kathal Subji

Fanasachi Bhaaji (कच्च्या फणसाची भाजी) - Raw Jackfruit Subji – Kathal Subji

Fanasachi Bhaaji (कच्च्या फणसाची भाजी) – Raw Jackfruit Subji – Kathal Subji – No Onion Garlic Recipe

कच्च्या फणसाची भाजी मराठी

This is a Maharashtrian Delicacy. In India, raw Jackfruit is available in the market only for a few months. This is a Brahmani Style recipe without any spices – no Onion, Garlic. I add soaked and boiled Peanuts and Cashew Nuts to this subji. But one can add Black Peas or Fresh Field beans also. Cleaning and cutting Jackfruit is a tedious job. I cut it in traditional way and cook the subji without using a pressure cooker. But some people use an easier way for this. Cut Jackfruit in 4 pieces, wipe out sap and pressure cook these pieces. With this removing the hard skin and centre is very easy. You can use this method if you want to save time. The taste if the subji will be little different because of pressure cooking.

Ingredients (Serves 5) (1 cup = 250 ml)

Raw Jackfruit 1 small

Raw Peanut ¼ cup

Cashew Nuts 15-20

Jaggery 2-3 teaspoons

Dried Red Chilies 5 slit

Red Chili Powder ½ – 1 teaspoon

Fresh Scraped Coconut 2 tablespoon

Buttermilk 3 tablespoon

Chopped Coriander 1 tablespoon

Salt to taste

For Tempering/ Tadka

Oil 1 tablespoon

Mustard Seeds ¼ teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Asafoetida (Hing) 2 pinch

Instructions

1. Soak Peanuts and Cashew Nuts separately for 4-6 hours.

2. Wash Jackfruit. Chopping Jackfruit is tedious job. Spread newspaper and then keep your cutting board or plate on it so that the white sticky sap won’t spoil your kitchen platform or floor. Apply generous amount of oil on the cutting board and knife (or any chopping device you plan to use) as well as on your palms. Keep a bowl ready half filled with water and buttermilk mixture. This water will be used for immersing Jackfruit pieces. Cut Jackfruit into 4 pieces. White sticky juice (sap) will start dripping off. Wipe it out using tissue papers. Discard the hard skin as well as the hard part in the centre. Raw Jackfruit does not have hard seeds. So no need to discard them. Chop the remaining part of Jackfruit along with seeds into small pieces about 1 X 1 cm. Immerse these pieces in water, buttermilk mixture. This will prevent Jackfruit pieces from turning black.

3. Pressure cook Cashew Nuts. Add ½ cup water to Cashew Nuts while steaming.

4. Pressure cook Peanuts till soft. Add ¾ to 1 cup of water to Peanuts while steaming. It takes long for Peanuts to cook.

5. Heat oil in a pan on medium flame.

6. Add mustard seeds , wait till sputter. Add Turmeric Powder , Asafoetida (Hing) and slit red chilies.

7. Add chopped Jackfruit. Do not add water. Saute for 3-4 minutes and cook covered for 7-8 minutes. Stir in between after 3-4 minutes.

8. Add water little more than what is required to cover Jackfruit. Cook covered till Jackfruit is soft. Keep stirring at regular intervals. Add water if required.

9. Add Salt, Jaggery, Chili Powder, Steamed Peanuts and Cashew Nuts. Mix.

10. Add Scraped coconut and coriander. Add water to get required consistency. This subji does not have too much juice / gravy.

11. Bring the mixture to boil. Cook for 2-3 minutes.

12. Delicious Jackfruit Bhaji is ready. Serve hot with Roti.

Fanasachi Bhaaji (कच्च्या फणसाची भाजी) – Raw Jackfruit Subji – Kathal Subji
Fanasachi Bhaaji (कच्च्या फणसाची भाजी) – Raw Jackfruit Subji – Kathal Subji

Note

1. If you want to add Black Peas or Field Beans to this subji, soak it for 8 hours, pressure cook and add in step 9.

    ===================================================================================

कच्च्या फणसाची भाजी – कांदा लसूण विरहित चविष्ट भाजी

ही महाराष्ट्रीयन स्पेशालिटी भाजी खूप चविष्ट लागते. ज्यांना आवडते त्यांना खूप आवडते आणि बाकी लोकांना अजिबात आवडत नाही. कच्च्या फणसाला कोकणात फणसाची कुयरी म्हणतात. ही ब्राह्मणी पद्धतीची रेसिपी आहे कांदा लसूण न घालता. मी ह्यात शेंगदाणे आणि काजू घालते. काही जणी काळे वाटाणे, पावटे ही घालतातरेसिपी सोपी आहे. पण कच्चा फणस चिरणं हे फार कटकटीचं काम असतं. मी पारंपारीक पद्धतीने ही भाजी करते प्रेशर कुकर मध्ये न शिजवता. पण दुसरी एक सोपी पद्धत माहित आहे ज्यात फणसाचे ४ तुकडे करून प्रेशर कुकर मध्ये शिजवून घेतात. आणि नंतर त्याचं चारखंड (साल) आणि पाव (मधला घट्ट भाग) काढून टाकतात. ह्या पद्धतीत फणस कापायला सोपा पडतो पण प्रेशर कुकर मध्ये शिजवल्यामुळे चव जरा बदलते. वेळ कमी असेल तर ही पद्धत वापरू शकता.

साहित्य (५ जणांसाठी) (१ कप = २५० मिली )

कच्चा फणस १ लहान

कच्चे शेंगदाणे पाव कप

काजूगर १५२०

चिरलेला गूळ २-३ टीस्पून

सुक्या लाल मिरच्या ५ मध्ये चीर देऊन

लाल तिखट अर्धा ते १ टीस्पून

ताजा खवलेला नारळ २ टेबलस्पून

चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून

ताक ३ टेबलस्पून

मीठ चवीनुसार

फोडणीसाठी

तेल १ टेबलस्पून

मोहरी पाव टीस्पून

हळद अर्धा टीस्पून

हिंग २ चिमूट

कृती

. शेंगदाणे आणि काजू ४६ तास भिजवून ठेवा

. फणस धुवून घ्या. कटिंग बोर्ड / ताटली च्या खाली मोठं वर्तमानपत्र पसरून घ्या म्हणजे फणसाचा चीक ओट्यावर / फरशीवर पडणार नाही. कटिंग बोर्ड, सुरी, विळी ला व्यवस्थित तेल लावून घ्या. हातालाही तेल लावा. एका पातेलीत अर्धी पातेली पाणी घ्या आणि त्यात ताक मिक्स करा. चिरलेला फणस ह्या पाण्यात घातला की काळा पडत नाही.

. फणसाचे ४ तुकडे करा. पांढरा चीक बाहेर येईल तो टिश्यू कागदाने पुसून घ्या. फणसाचे चारखंड (साल) आणि पाव (मधला घट्ट भाग) काढून टाका. कच्च्या फणसात बिया नसतात / कोवळ्या असतात. त्या काढाव्या लागत नाहीत. फणसाचे छोटे  १ सेमी चे चौकोनी तुकडे करा आणि पाणी, ताकाच्या मिश्रणात घालासगळे तुकडे बुडतील एवढं पाणी पातेलीत असू दे.

. शेंगदाणे आणि काजू वेगवेगळे प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्या. शेंगदाणे शिजायला जास्त वेळ लागतो.

. एका पातेल्यात तेल घालून मोहरी, हळद, हिंगाची फोडणी करा. त्यात लाल मिरच्या घालून चिरलेला फणस घाला. पाणी घालू नका. ४ मिनिटं परता.

. पाणी न घालता ७८ मिनिटं झाकण ठेवून शिजवा. ४ मिनिटांनी ढवळा.

. फणसाचे तुकडे बुडून थोडं वर येईल एवढं पाणी घाला. आणि झाकण ठेवून फणस मऊ होईपर्यंत शिजवा. अगदी पीठ करू नका .

. मीठ, गूळ, लाल तिखट, शेंगदाणे, काजू, नारळ, कोथिंबीर घालून मिक्स करा.

. जेवढा रस हवा असेल तेवढं पाणी घालून उकळी काढा. ह्या भाजीला फार रस नसतो. ३ मिनिटं उकळून गॅस बंद करा.

१०. फणसाची स्वादिष्ट भाजी तयार आहे. गरम भाजी पोळीसोबत सर्व्ह करा.

टीप

. काळे वाटाणे / पावटे घालायचे असतील तर ८ तास भिजवून प्रेशर कुकर मध्ये शिजवून स्टेप ८ मध्ये भाजीत घाला.

Fanasachi Bhaaji (कच्च्या फणसाची भाजी) – Raw Jackfruit Subji – Kathal Subji
Fanasachi Bhaaji (कच्च्या फणसाची भाजी) – Raw Jackfruit Subji – Kathal Subji

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes