Kandyachi Peeth Perun Bhaaji (कांद्याची पीठ पेरून भाजी) – Onion Subji with Gram Flour

Kandyachi Peeth Perun Bhaaji (कांद्याची पीठ पेरून भाजी) - Onion Subji with Gram Flour

Kandyachi Peeth Perun Bhaaji (कांद्याची पीठ पेरून भाजी) – Onion Subji with Gram Flour

कांद्याची पीठ पेरून भाजी मराठी

This is a tasty subji made using Onions. Subjis using Dry Gram Flour are very popular in Maharashtrians. Chopped vegetables are added to Tempering and cooked without adding water. After vegetables are cooked, dry Gram Flour is sprinkled in the pan and then cooked with little water. These subjis taste yummy and are very easy to cook. Onions, Spring Onions, Capsicum, Snake Gourd subjis are made this way. I add little Rice flour (half of Gram flour) along with Gram Flour so that the subji does not get very dry after it comes to room temperature.

Use Iron Wok for these subjis. Subjis taste better.

Ingredients (Serves 3)

Onions 2 medium size

Gram Flour 2-3 Tablespoon

Rice Flour 1-1.5 Tablespoon

Chili Powder ½ teaspoon

Carom Seeds (Ajwain) ½ teaspoon

Sugar ½ teaspoon

Fresh Scraped Coconut 1 Tablespoon

Chopped Coriander 1 teaspoon

Oil 1 tablespoon

Mustard Seeds ¼ teaspoon

Cumin Seeds ¼ teaspoon

Asafoetida a pinch

Turmeric Powder ½ teaspoon

Salt to taste

Instructions

1. Finely chop onions.

2. In a pan, heat oil. Add Mustard seeds, wait for splutter; Add Cumin Seeds, wait for splutter. Add Carom Seeds, Asafoetida.

3. Add chopped onions, turmeric powder.

4. Saute on low flame for 2-3 minutes.

5. Cook covered on low flame without adding water till onions are translucent.

6. Add Chili Powder, Salt, Sugar and mix.

7. Sprinkle 2 tablespoon Gram flour using your fingers in the pan. You can use a spoon also but flour gets sprinkled better by using fingers.

8. Sprinkle 1 tablespoon rice flour. Mix well.

9. If you want subji to be more dry, sprinkle more Gram flour and rice flour.

10. Now sprinkle ¼ cup of water and cook covered on low flame till flour is cooked (flour should not be sticky).

11. Add Fresh coconut and coriander. Mix.

12. Tasty Onion subji is ready. Serve hot with Indian bread.

Note:

1. You can make subji using Spring Onions, Capsicum or Snake Gourd using this recipe. For Capsicum and Snake Gourd subji, I do not add Carom seeds.

Kandyachi Peeth Perun Bhaaji (कांद्याची पीठ पेरून भाजी) – Onion Subji with Gram Flour
Kandyachi Peeth Perun Bhaaji (कांद्याची पीठ पेरून भाजी) – Onion Subji with Gram Flour

 

 

 

 

 

 

 

====================================================================================

कांद्याची पीठ पेरून भाजी

महाराष्ट्रात पीठ पेरून केलेल्या भाज्या खूप लोकप्रिय आहेत. वेगवेगळ्या भाज्या वापरून ह्या भाज्या बनवल्या जातात. भाज्या फोडणीत घालून वाफेवर शिजवल्या की त्यात तिखट, मीठ (ह्यात मसाला नसतोचफक्त काही भाज्यांत फोडणीत ओवा घालतात) घालून सुकं बेसन घातलं जातं (भुरभुरवतात) – शक्यतो हातानेम्हणजे एकदम जास्त पीठ एका जागी पडत नाही. मी अशा भाज्यांमध्ये थोडं तांदुळाचं पीठ (बेसनाच्या निम्मं) पण घालते. त्यामुळे भाजी गार झाल्यावर सुद्धा सुकी आणि फळफळीत होत नाही. काही ठिकाणी बेसन भाजून घालतात तर काही ठिकाणी कच्चेच. दोन्ही प्रकारे भाजी छान लागतेकांदा, पातीचा कांदा, ढोबळी मिरची, पडवळ ह्या भाज्यांची अशी भाजी बनवतात. अगदी सोपी रेसिपी आहे आणि भाजी अतिशय चविष्ट बनते. आणि हो, ह्या भाज्या शक्यतो लोखंडाच्या कढईत कराव्यात. आणखी खमंग लागतात

साहित्य (३ जणांसाठी)

कांदे २ मध्यम बारीक चिरून

बेसन २३ टेबलस्पून

तांदुळाचं पीठ एक दीड टेबलस्पून

लाल तिखट अर्धा चमचा

ओवा अर्धा चमचा

साखर अर्धा चमचा

आमचूर पाव चमचा

ताजा खवलेला नारळ १ टेबलस्पून

चिरलेली कोथिंबीर १ चमचा

तेल १ टेबलस्पून

मोहरी पाव चमचा

जिरं पाव चमचा

हिंग १ चिमूट

हळद अर्धा चमचा

मीठ चवीनुसार

कृती

. एका कढईत तेलाची गरम करून मोहरी, जिरं, हिंगाची फोडणी करा.

. फोडणीत कांदा आणि हळद घालून २३ मिनिटं परता.

. झाकण ठेवून पाणी न घालता मंद आचेवर वाफ काढा. कांदा पारदर्शक झाला पाहिजे.

. लाल तिखट, मीठ आणि साखर घालून मिक्स करा

. आता २ टेबलस्पून बेसन आणि १ टेबलस्पून तांदुळाचं पीठ हाताने भुरभुरवा. छान ढवळून घ्या. भाजी जास्त ओली दिसत असेल तर आणखी १ टेबलस्पून बेसन आणि अर्धा टेबलस्पून तांदुळाचं पीठ घाला. ढवळून घ्या.

. आता पाव कप पाणी शिंपडून झाकण ठेवून मंद आचेवर वाफ काढा. पीठ हाताला चिकटलं नाही की भाजी शिजली असं समजावं.

. नारळ, कोथिंबीर घालून ढवळून घ्या. गॅस बंद करा.

. कांद्याची पीठ पेरून भाजी तयार आहे. गरम भाजी पोळी / भाकरी बरोबर खायला द्या. ही भाजी अशीच खायला ही छान लागते.   

टीप

. पातीचा कांदा, ढोबळी मिरची आणि पडवळ ह्या भाज्यांची अशीच भाजी बनवू शकता. फक्त ढोबळी मिरची आणि पडवळाच्या भाजीत मी ओवा घालत नाही

Kandyachi Peeth Perun Bhaaji (कांद्याची पीठ पेरून भाजी) – Onion Subji with Gram Flour
Kandyachi Peeth Perun Bhaaji (कांद्याची पीठ पेरून भाजी) – Onion Subji with Gram Flour

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*