Shrikhand without White Sugar (श्रीखंड – साखर न घालता)

Shrikhand without White Sugar (श्रीखंड - साखर न घालता)

Shrikhand without White Sugar (श्रीखंड साखर न घालता)

श्रीखंड साखर न घालता मराठी

Shrikhand is a popular Maharashtrian sweet. Traditionally it is made using Chakka (Hung Curd) and sugar. I tried making it Sugar Free by substituting Sugar with Jaggery. The taste was different but it was delicious. Try this healthy option next time you make Shrikhand.

If you don’t eat Curd and Jaggery together, use sugar instead of Jaggery in this recipe.

Ingredients (serves 4) (1 cup = 250 ml)

Full fat milk 1.25 ltrs

Jaggery crushed ¾ to 1 cup (adjust as per taste)

Salt a pinch (optional)

Dry fruits of your choice

Curd 1 teaspoon as culture to make curd for Chakka

Instructions

1. Heat Milk. Allow it to cool. When it is warm, add curd to it and set the curd. It will take 4-5 hours.

2. Spread muslin cloth in a big plate and transfer curd onto this cloth. Tie the cloth tight and keep it in a sieve / chalni. Keep the sieve in a pan (photo attached) and keep the pan in refrigerator for 5-6 hours. All the water from curd will be gathered in the pan and Chakka will be ready. Because of Refrigeration Chakka does not get sour and you need less jaggery. If there is still some water in Chakka, wrap it is a cloth; keep some heavy weight on it and leave it for 15 minutes. All the water will be soaked in the cloth.

Preparation of Hung Curd (चक्का बनवताना)

3. Transfer Chakka in a pan. Add crushed jaggery and salt. Beat the mixture till jaggery dissolves and mixture becomes creamy.

4. Add dry fruits of your choice. Delicious Shrikhand is ready. Refrigerate it and serve.

Note: I did not add Saffron as Jaggery gives a nice colour to Shrikhand. If you want, add saffron after soaking it in a teaspoon of warm milk.

Shrikhand without White Sugar (श्रीखंड – साखर न घालता)
Shrikhand without White Sugar (श्रीखंड – साखर न घालता)

===================================================================================

श्रीखंड साखर न घालता

श्रीखंड महाराष्ट्राचं लाडकं पक्वान्न. कुठल्याही सणावाराला बनवलं जाणारं. चक्का विकत आणला तर पटकन होणारं. चक्का घरी बनवला तर आदल्या दिवशी दही फडक्यात बांधून ठेवून दुसऱ्या दिवशी बनवलेलं. आपण नेहमी साखर घालून श्रीखंड करतो. मी कधी कधी गूळ घालून श्रीखंड करते. जरा वेगळी खमंग चव येते आणि स्वादिष्ट लागतं. ज्यांना साखर वर्ज्य आहे त्यांच्यासाठी  आणि बाकी सगळ्यांना गिल्टी न वाटता खायचं असेल तर नक्कीच चांगला पर्याय आहे. ह्यात मी केशर घालत नाही कारण श्रीखंडाला गुळामुळे छान रंग येतो

चक्का बनवण्यासाठी एक टीप. काही जणांना माहित असेल पण काहींसाठी नवीन असेल. दही फडक्यात बांधून बाहेर न ठेवता एका चाळणीत ठेवा. ती चाळण व्यवस्थित बसेल अशा एका पातेल्यावर ठेवा आणि पातेली फ्रिजमध्ये ठेवा. त्यामुळे चक्का आंबट होणार नाही.

काही जणांच्या मते आयुर्वेदानुसार दही आणि गूळ एकत्र खाणे चांगलं नाहीविषासमान आहे; त्यापेक्षा शुगरफ्री घाला. मला वाटतं शुगरफ्री अजिबात घालू नये. ती फक्त केमिकल्स असतात. त्यापेक्षा गोड खाणंच बंद करावं. आयुर्वेदात  आणखी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. दूध आणि फळं एकत्र खाऊ नये. आपण फ्रुट सॅलड खातो. शिकरण पण पूर्वापार खात आलोय. म्हणजे त्या सगळ्याच गोष्टी आपण पाळतो का? आपल्याला पटलं तर करावं नाहीतर सोडून द्यावं. आम्ही गुळाचं श्रीखंड खाल्लंय बऱ्याच वेळा खाल्लंय आणि काही अपाय झाला नाही

साहित्य (४ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)

म्हशीचं दूध सव्वा लिटर

बारीक चिरलेला गूळ पाऊण ते १ कप (जसं गोड हवं असेल तसं कमी / जास्त करा)

मीठ १ चिमूट

सुके मेवे आवडीप्रमाणे

दही विरजण म्हणून १ चमचा

कृती

. दूध गरम करून कोमट करून घ्यात्यात विरजण लावून दही करून घ्या.

. दही एका मोठ्या फडक्यावर काढा. खाली एक पातेली / परात ठेवा म्हणजे त्यात दह्याचं पाणी पडेल.

. फडक्याला गाठ मारून ते एका चाळणीत ठेवा. चाळण एका पातेल्यात ठेवा आणि पातेलं फ्रिजमध्ये ५६ तास ठेवा. छान चक्का तयार होईल. चक्क्यात थोडं पाणी असेल तर फडक्यावर जड भांडं १५२० मिनिटं ठेवा. जास्तीचं पाणी निघून जाईल.

Preparation of Hung Curd (चक्का बनवताना)

. चक्का एका मोठ्या बाउल मध्ये काढा. त्यात चिरलेला गूळ, मीठ घाला आणि गूळ विरघळेपर्यंत ढवळा. सुके मेवे घाला.

. स्वादिष्ट श्रीखंड तयार आहे तेही साखरेविना. असंच किंवा फ्रिजमध्ये ठेवून पुरी / पोळी बरोबर आनंद घ्या.

Shrikhand without White Sugar (श्रीखंड – साखर न घालता)
Shrikhand without White Sugar (श्रीखंड – साखर न घालता)

 

2 Comments

  1. सुधाताई छान माहिती !\r\nनिरसं दूध पूर्ण न तापवता म्हणजे साय धरु न देता आधीच साधारण कोमट झालं की विरजायचे.यामुळे दूधातला स्निग्धांश दुधातच राहतो.चक्कातील लोण्यामुळे श्रीखंड छान होते.चक्काजास्त आंबट ही होत नाही.ही माझ्या आजीची टीपआहे.करुन बघा.आवडेल तुम्हाला.

Your comments / feedback will help improve the recipes