Kanakechi Nankhatai (कणकेची नानखटाई) – Indian Cookies with Whole Wheat Flour

Kanakechi Nankhatai (कणकेची नानखटाई)

Kanakechi Nankhatai (कणकेची नानखटाई) – Indian Cookies with Whole Wheat Flour

कणकेची नानखटाई मराठी

Traditional Indian Cookies made from Maida (All Purpose Flour), Sugar and Ghee. This is a healthier version of these cookies where Whole Wheat Flour is used instead of Maida (All purpose Flour). I tried using Jaggery instead of Sugar but then the cookies were little hard. So best is to make them with Sugar. This is definitely a better snack than Ready made Biscuits / Cookies. These cookies taste awesome when you use Clarified butter (Pure Ghee) instead of Vanaspati (Hydrogenated Vegetable Oil). So try to bake them with Pure Ghee, if possible.

Also it’s not necessary to bake them in Oven. You can use a covered Pan to bake them.

Ingredients (Makes 45-48 cookies) (1 cup = 250 ml)

Whole Wheat Flour 4 cups

Powdered sugar 2 cups

Pure Ghee (Clarified butter) 1.5 cup

Salt a pinch

Baking Soda a pinch

Cardamom Powder ¼ teaspoon

Dry fruits as per choice

Instructions

1. Beat Ghee till it’s light and fluffy.

2. Mix powdered sugar and beat again for 5 minutes.

3. Add Whole Wheat Flour, Salt, Baking Soda and mix well.

4. Add Cardamom powder and mix well.

5. Let the dough rest for 30 minutes.

6. Knead the dough for 2 minutes. If the dough is too dry and you are not able to roll cookies; add some more Ghee (one teaspoon at a time) and mix the dough.

7. Make small flattened round or any other shaped cookies; place dry fruits on each cookie if you like.

8. Bake in Pre-heated oven for 25-30 minutes on 200 degrees.

9. The top of Nankhatai turns light brown when baked.

10. Store Nankhatai in air tight container.

Note

1. Set the timer as per settings of your oven as the heating differs from oven to oven.

2. You can bake Nankhatai in a pan also. It may take 30-35 minutes to bake Nankhatai in a pan.

Kanakechi Nankhatai (कणकेची नानखटाई)
Kanakechi Nankhatai (कणकेची नानखटाई)
      ==================================================================================

कणकेची नानखटाई खमंग खुसखुशीत बिस्किटं

नानखटाई साधारणपणे मैदा वापरून करतात. ह्या नानखटाईत मैद्याऐवजी कणिक वापरली आहे. त्यामुळे नेहमीच्या नानखटाई पेक्षा पौष्टिक आहेत. मी साखरेऐवजी गूळ घालून ही नानखटाई करून बघितली. पण ती जरा कडक होतात. त्यामुळे ह्यात साखरच घालावी असं मला वाटतं

काही जण याला नानकटाई असंही म्हणतात. पण नावात काय आहेपदार्थाची वेगवेगळी नावं असू शकतात नाही का !!

साजूक तुपाची नानखटाई अप्रतिम लागते. तुम्ही त्याऐवजी वनस्पती तूप वापरू शकता. फक्त वापरण्याआधी  वनस्पती तुपाचा वास घेऊन बघा. खवट वास असेल तर वापरू नका. बिस्किटांना ही वास येईल आणि कोणी खाऊ शकणार नाहीत.

मी नानखटाई ओव्हन मध्ये भाजते. तुमच्याकडे ओव्हन नसेल तर कढई / पातेल्यात भाजू शकता. रेसिपीच्या शेवटी त्याची माहिती दिली आहे

साहित्य (४५४८ नानखटाई साठी) (१ कप = २५० मिली)

कणिक ४ कप

पिठीसाखर २ कप

साजूक तूप दीड कप

बेकिंग सोडा १ चिमूट

मीठ १ चिमूट

वेलची पूड पाव टीस्पून

सुका मेवा आवडीनुसार

कृती

. तूप हलकं होईपर्यंत फेटून घ्या.

. त्यात पिठीसाखर घालून पुन्हा ५ मिनिटं फेटून घ्या.

. त्यात कणिक, बेकिंग सोडा, मीठ घालून चांगलं मळून घ्या.

. वेलची पूड घालून मिक्स करा.

. पीठ अर्धा तास झाकून ठेवा.

. पीठ जरा मळून घ्या. पीठ खूप सुकं असेल आणि गोळे बनवता येत नसतील तर थोडं तूप (१ टीस्पून) घालून मिक्स करा.

. पिठाचे छोटे गोळे बनवून हव्या त्या आकाराची बिस्किटं बनवा. वर सुका मेवा लावा.

. प्रीहिटेड ओव्हन मध्ये २०० डिग्री ला २५३० मिनिटं बेक करा.

. बिस्किटं वरून लालसर होईपर्यंत भाजा.

१०. नानखटाई  हवाबंद डब्यात ठेवा.  

टीप

. ओव्हन चा टायमर तुमच्या ओव्हन च्या सेटिंग प्रमाणे लावा. प्रत्येक ओव्हन चं तापमान वेगवेगळं असतं.

. ओव्हन  नसेल तर तुम्ही कढईत  / पातेल्यात  ही बेक करू शकता. त्यासाठी कढईत / पातेल्यात वाळू / मिठाचा थर द्या. त्यावर एक स्टॅन्ड ठेवून ५१० मिनिटं कढई / पातेलं गरम करून घ्या (प्रीहीट).  स्टॅण्डवर  बिस्किटांची  ताटली ठेवा आणि  झाकण लावून मंद आचेवर भाजा. भाजायला ३०३५ मिनिटं लागतील. मधे मधे चेक करा

Kanakechi Nankhatai (कणकेची नानखटाई)
Kanakechi Nankhatai (कणकेची नानखटाई)

2 Comments

Leave a Reply to sudha Cancel reply