Papdi Bhaaji (Val Papdi Subji / Flat Beans Subji)

Papdi Bhaaji (वाल पापडीची भाजी) - Flat Beans Subji
Papdi Bhaaji (वाल पापडीची भाजी) - Flat Beans Subji

Papdi Bhaaji (वाल पापडीची भाजी) – Val Papdi Subji / Flat Beans Subji – No Onion Garlic Subji

वाल पापडीची भाजी मराठी

Papdi is Indian Flat Beans (also called as Val Papdi). These are Light green colour pods. Papdi pod as well as the Beans inside are used in the Subji (unlike Matar / Green Peas where we only use Peas and throw away the pod).

This is an easy, non spicy, quick and tasty recipe of Papdi. This is no onion, garlic recipe.

Ingredients (serves 3-4)

Papdi (Flat Beans) 300 Grams

Red Chili powder ½ teaspoon

Jaggery 1 tablespoon

Tamarind Pulp ½ – ¾ teaspoon

Goda Masala ½ teaspoon

Fresh Scraped Coconut 1 tablespoon

Chopped Coriander 1 teaspoon

Oil 1 teaspoon

Mustard Seeds ¼ teaspoon

Cumin Seeds (Jeera) ¼ teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Asafoetida (Hing) a pinch

Salt to taste

Instructions

1. Wash Papdi. Remove strings on both sides of the pod and break it into 1 cm long pieces by hand. You have to do this by Hand because when you break papdi, you need to remove the small strings along the sides of the pods. Keep the beans along with Papdi pieces.

Papdi beans broken into pieces

2. Heat oil in a pan on medium flame. Add mustard seeds, wait for splutter; add cumin seeds, wait for sputter; add turmeric, add Asafoetida (Hing).

3. Add Papdi, saute for 2 minutes; cover and cook for 2 minutes. Remove the lid, Saute and cook covered for 2 more minutes.

4. Add hot water enough to cover the Papdi; bring it to boil. Cook covered till Papdi is little soft. Stir after every 3-4 minutes.

5. Add Tamarind Pulp, Jaggery, Goda Masala, Chili Powder and salt.

6. Cook covered till Papdi is soft. Stir regularly. If required, add some water while cooking. This subji does not have much gravy.

7. Add fresh Coconut and Coriander. Mix and switch off the gas.

8. Tasty Papdi subji is ready. Serve hot with Roti or rice. It tastes awesome with Rice and Curd.

Papdi Bhaaji (वाल पापडीची भाजी) - Flat Beans Subji
Papdi Bhaaji (वाल पापडीची भाजी) – Flat Beans Subji
Papdi Bhaaji (वाल पापडीची भाजी) - Flat Beans Subji
Papdi Bhaaji (वाल पापडीची भाजी) – Flat Beans Subji

 

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

वाल पापडीची भाजी कांदा लसूण विरहित चविष्ट चिंगु (चिंच गुळाची) भाजी

वाल पापडीच्या शेंगा बाजारात जवळजवळ बारा महिने उपलब्ध असतात. वाल पापडी आणि घेवड्याच्या शेंगा साधारण सारख्या दिसतात. पण वाल पापडीच्या शेंगा फिक्या हिरव्या रंगाच्या चपट्या आकाराच्या असतात. तर घेवड्याच्या शेंगा गडद हिरव्या, फुगीर आणि जाड सालीच्या असतात. ही रेसिपी वापरून घेवड्याच्या शेंगांची भाजी सुद्धा करता येते.

वाल पापडीच्या शेंगा सुरीने चिरण्याऐवजी त्याचे हाताने तुकडे करावेत. म्हणजे शेंगेच्या दोन्ही बाजूच्या शिरा / दोरे काढता येतात.

ही रेसिपी अगदी सोपी आहे. कांदा लसूण न घालता ब्राह्मणी पद्धतीची चिंच, गूळ आणि गोड मसाला घालून केलेली चविष्ट भाजी आहे. नक्की करून बघा.

साहित्य ( जणांसाठी)

वाल पापडीच्या शेंगा ३०० ग्रॅम्स

लाल तिखट अर्धा टीस्पून

चिरलेला गूळ १ टेबलस्पून

चिंचेचा कोळ अर्धा पाऊण टीस्पून

गोडा मसाला अर्धा टीस्पून

ताजा खवलेला नारळ १ टेबलस्पून

चिरलेली कोथिंबीर १ टीस्पून

तेल १ टीस्पून

मोहरी पाव टीस्पून

जिरं पाव टीस्पून

हळद अर्धा टीस्पून

हिंग १ चिमूट

मीठ चवीनुसार

कृती

. पापडीच्या शेंगा धुवून घ्या. दोन्ही बाजूंची देठं काढून टाका. शेंग उघडून दाणे काढून घ्या. हाताने सालाचे १ सेमी लांबीचे तुकडे करा. तुकडे करताना सालाच्या कडेचे दोरे काढून टाका. सालांचे तुकडे आणि दाणे एकत्र ठेवा.

Papdi beans broken into pieces

. एका कढईत तेल गरम करून मोहरी, जिरं, हिंग आणि हळद घालून खमंग फोडणी करा.

. फोडणीत पापडीचे तुकडे आणि दाणे घाला. २ मिनिटं परतून घ्या. झाकण ठेवून २ मिनिटं मंद आचेवर वाफ काढापरत एकदा ढवळून झाकण ठेवून २ मिनिटं वाफ काढा.

. पापडी बुडेल एवढं गरम पाणी घाला. मिश्रण उकळलं की झाकण ठेवून पापडी थोडी मऊ होईपर्यंत शिजवा. मधे मधे ढवळून घ्या.

. कढईत चिंचेचा कोळ, गूळ, गोड मसाला, लाल तिखट आणि मीठ घाला.

. झाकण ठेवून पापडी चांगली शिजवा. मधे मधे ढवळून घ्या. जरूर पडल्यास शिजवताना थोडं पाणी घाला. ह्या भाजीला अंगाबरोबर रस असतो.

. नारळ कोथिंबीर घालून भाजी ढवळून गॅस बंद करा.

. पापडीची चविष्ट भाजी तयार आहे. गरम भाजी पोळी / भाकरी / भातासोबत खायला द्या. दहिभातासोबत ही भाजी अप्रतिम लागते.

Papdi Bhaaji (वाल पापडीची भाजी) - Flat Beans Subji
Papdi Bhaaji (वाल पापडीची भाजी) – Flat Beans Subji
Papdi Bhaaji (वाल पापडीची भाजी) - Flat Beans Subji
Papdi Bhaaji (वाल पापडीची भाजी) – Flat Beans Subji

2 Comments

Your comments / feedback will help improve the recipes