Besan Laadoo (बेसन लाडू ) – Besan Laddu – Gram Flour Sweet Balls

Besan Laadoo

Besan Laadoo (बेसन लाडू ) –  Besan Laddu – Gram Flour Sweet Balls

बेसन लाडू मराठी 

Besan laadoo is an all time favorite sweet dish. There are different ways to make Laadoos. Typical Maharashtrian way is to make them with little milk. I always follow this recipe. It’s fairly easy but time consuming. But the end product is awesome. Worth all the time you spent in roasting Besan.

Although it’s an easy recipe that does not require sugar syrup, there are a few things you must take care of.

1. Texture of Besan (Gram Flour) – Coarse gram flour makes delicious Besan Laddus. But if you use fine Gram flour, you need to reduce the quantity of Ghee (clarified butter).

2. Proportion of Ghee is most important for Besan Laddus. If you use too much Ghee, Laddus will lose the shape. At the same time, Ghee should not be too less to make Laddus dry. New home cooks

should first try with a smaller quantity so that they can understand Ghee proportion.

3. Do not use whole stock of Gram Flour and Ghee when you make Besan Laddus. So that you don’t need to run to the shop in can you need to Repair the laddus.

4. It is best to use home made Ghee for these laddus. But in case you want to use Vanaspati Ghee (Thick vegetable oil), then check it before use. If it has little foul smell, do not use that pack. Buy a fresh pack and use it.

5. Use freshly ground sugar for Laddus. If you already have a stock of Ground sugar, grind it again in the grinder to break any lumps. Or if possible, use Bura sugar that is available in India. This is made by dehydrating sugar syrup. There are no lumps in Bura sugar.

Ingredients (Makes 30-35 Laddus)

Besan Kurkura / Jada (Coarse Bengal Gram Flour) 4 cups

Desi Ghee (Clarified Butter) 1.25 cups

Powdered Sugar 2.5 to 3 cups (as per the sweetness required)

Cardamom Powder ½ teaspoon

Raisins (Khismish) 25-30 / Cashew 20-25 cut into pieces

Milk 2 tablespoon

Instructions

1. In a thick bottom pan, add Ghee and Besan. Roast it on low flame till besan turns brown and you get nice aroma of besan. Keep stirring all the time; else it will burn. Initially Besan will be thick and difficult to roast; after about 10 minutes it will be soft and will become easy to roast. It takes 35-40 minutes to roast.

2. Now remove the pan from gas. Immediately add 2 tablespoon of milk. You will see lot of bubbles. Keep stirring. Now the mixture will be thick.

3. Leave it to cool.

4. When mixture is lukewarm, add sugar and mix well. Add Cardamom powder, Raisins / Cashew and any other dry fruits of your choice.

5. Leave the mixture to cool. When completely cold, roll Laadoos.

Enjoy delicious Besan laadoos. These laadoos last for 2 weeks without refrigeration.

Note:

1. If you use fine Gram Flour for making these laddus, reduce the Ghee.

2. In spite of taking all precautions, you land up adding more ghee in the mixture and you are not able to roll laddus, then dry roast some gram flour till it’s light brown, mix it in the mixture and then roll laddus.

3. If mixture is dry and you are not able to roll laddus, heat some ghee and add to the mixture.

Besan Laadoo

 

Besan Laadoo (बेसन लाडू)

 

 

 

 

 

 

 

 

 

================================================================================

बेसन लाडू

सगळ्यांचे आवडते बेसन लाडू बनवायला तसे सोपे असतात, पण जरा वेळखाऊ पदार्थ आहे. मुख्य म्हणजे पाक करायला लागत नाही. पण बेसन भाजायला बराच वेळ लागतो. पण परफेक्ट बेसन लाडू बनवण्यासाठी थोडी अवधानं पाळावी लागतात.

. बेसन किती बारीक आहे ? थोड्या जाडसर बेसनाचे लाडू खूप छान होतात. पण हल्ली बाजारात बेसन मिळतं ते अगदी बारीक असतं. ते लाडवांसाठी वापरलं तर तूप जरा कमी घालावं लागते जाडसर बेसनापेक्षा.

. तुपाचं प्रमाण बेसनाच्या लाडवांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. बेसन लाडू फार तुपकट नसावा म्हणजे डब्यात ठेवला तर तो गोलच रहावा ; बसू नये. पण त्याचबरोबर लाडू सुकाही नसावा. म्हणून पहिल्यांदाच लाडू करून बघणाऱ्या मित्र / मैत्रिणींनी एक वाटी मापाचे लाडू बनवून बघावे म्हणजे तुपाच्या प्रमाणाचा अंदाज येईल.

. नेहमी लाडू करताना घरातलं सगळं बेसन / सगळं तूप संपवू नये. म्हणजे जर लाडू दुरुस्त करायची वेळ आली तर दुकानात धावावं लागणार नाही.

. तूप साजूक तुपातले बेसन लाडू अप्रतिम लागतात. ते शक्य नसेल तर वनस्पती तूप वापरू शकता. पण वनस्पती तूप वापरण्याआधी त्याचा वास घेऊन बघा. कधी कधी जरा विचित्र खवट असा वास येतो. तसा आला तर ते तूप वापरू नका. वापरलं तर लाडवांना पण वास येतो. नवीन वनस्पती आणून वापरा.

. पिठी साखर ताजी मिक्सर मध्ये दळून घ्या. किंवा आधी आणलेली / केलेली पिठीसाखर परत एकदा मिक्सर मध्ये फिरवून घ्या / किंवा चाळून घ्यानाहीतर पिठीसाखरेच्या गुठळ्या मोडता मोडता हात दुखून येतात.  ‘बुरा साखरमिळत असेल तर ती वापरा ; त्याच्या गुठळ्या होत नाहीत. ‘बुरा साखऱम्हणजे साखर पाण्यातवितळवून परत त्याचे क्रिस्टल होईपर्यंत उकळवतात. हे क्रिस्टल्स म्हणजे बुरा साखऱ‘. दुकानात मिळते.

साहित्य (३०३५ लाडू होतात)

जाडसर बेसन ४ कप

साजूक तूप सव्वा कप / नसेल तर वनस्पती तूप वापरू शकता

दळलेली / पिठी साखर अडीच ते ३ कप

वेलची पूड अर्धा चमचा

काजू / बेदाणे (किसमिस) आवडीनुसार

दूध २ मोठे चमचे

कृती

. एका जाड बुडाच्या पातेल्यात तूप आणि बेसन घालून मंद आचेवर खमंग भाजून घ्या. भाजायला २०२५ मिनिटं लागतात. सुरुवातीला मिश्रण भाजायला कठीण पडतं. पण नंतर मिश्रण थोडं पातळ होतं आणि सहज भाजलं जातं.

. बेसनाचा रंग बदलला आणि छान खमंग सुगंध आला की गॅस बंद करून लगेच दूध घाला. आणि मिश्रण ढवळत राहा. बेसन फुलेल. खूप बुडबुडे येतील आणि थोडा वेळ ढवळल्यावर बुडबुडे येणं बंद होईल. असे केल्यानं लाडवाचा ढास बसत नाही ( लाडू घशाला चिकटत नाही).

. मिश्रण दुसऱ्या पातेल्यात काढून गार करत ठेवा.

. मिश्रण कोमट झालं की त्यात साखर मिसळा आणि एकजीव करा. वेलची पूड घालून एकजीव करा.

. थोडा वेळाने लाडू वळा. बेदाणे / काजू मिश्रणात घालू शकता किंवा प्रत्येक लाडू वळताना लावू शकता.

. बेसन लाडू २३ आठवडे टिकतात. फ्रिजमध्ये ठेवू नका.

टीप

. बेसन बारीक असेल तर ह्या मापापेक्षा कमी तूप घाला.

. एवढी काळजी घेऊनही जर लाडवात तूप जास्त झाले तर थोडं सुकं बेसन खमंग घालून मिश्रणात मिक्स करा आणि लाडू वळा.

. तूप जर कमी झालं तर थोडं तूप गरम करून मिश्रणात घालून एकजीव करा आणि लाडू वळा.

Besan Laadoo (बेसन लाडू)
Besan Laadoo (बेसन लाडू)

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*