Khatti Urad Dal (खट्टी उडीद डाळ) – Tasty Gujarati Dal using Split Black Lentil – Zero Oil Recipe
This is a traditional Gujarati recipe that uses minimal ingredients and absolutely NO Oil. But it tastes super yummy. Unlike other Dal recipes where we use Tuvar Dal (split Pigeon Peas) Or Moong Dal (Split Yellow Petite Lentil), this one uses Urad Dal (Split Black Lentil). This dal only uses Curd, Green Chilies,Garlic and Fresh Coriander for taste. Relish piping hot Khatti Urad Dal with Rotis or Rice or have it as it is.
Ingredients (1 cup = 250 ml) (Serves 2-3)
Split Black Lentil (Urad Dal) ½ cup
Curd ¼ cup
Green Chili Paste ½ teaspoon
Crushed Garlic ½ teaspoon
Chopped Coriander 1 tablespoon
Turmeric ¼ teaspoon
Salt to taste
Instructions
1. Wash and Soak Split Black lentil (Urad Dal) in water for 4 hours.
2. Add a pinch of Turmeric powder to Urad Dal and Pressure cook it. Don’t make it mushy. After one whistle of Pressure Cooker, cook on simmer for 3 minutes. Dal will be soft but not mushy.
3. Transfer cooked Dal to a deep Pan.
4. Whisk curd without adding water and add it to the Dal. Add Turmeric Powder, Chili Paste, Garlic Paste and Salt. Mix well.
5. This Dal is thick like Dal Fry. Add water to adjust the consistency. Cook on simmer for 5 minutes. Add Chopped coriander and mix. Switch off the gas.
6. This Dal thickens as it cools. So it’s better to have it piping hot.
7. Serve Hot Khatti Urad Dal with Roti or Rice or relish it as it is.
==================================================================================
खट्टी उडीद डाळ – अजिबात तेल न घालता केलेली चविष्ट डाळ – पारंपरिक गुजराती रेसिपी
ही एक पारंपरिक गुजराती रेसिपी आहे. साधारणपणे डाळ / आमटी साठी आपण तूरडाळ किंवा मूगडाळ वापरतो. ही उडीद डाळीची रेसिपी आहे. ह्यात अजिबात तेल घालत नाहीत. अगदी कमी जिन्नस घालून केलेली ही डाळ खूप चविष्ट लागते. ह्यात फक्त दही, मिरची, लसूण आणि कोथिंबीर घालतात. उडीद डाळ शिजवताना अगदी मेणासारखी शिजवायची नाही. थोडी अख्खी डाळ दिसली पाहिजे. गरमगरम खट्टी उडीद डाळ पोळी, भातासोबत किंवा अशीच खातात. खूप छान लागते.
साहित्य (२–३ जणांसाठी)
उडीद डाळ अर्धा कप
दही पाव कप
ठेचलेली हिरवी मिरची अर्धा टीस्पून
ठेचलेली लसूण अर्धा टीस्पून
हळद पाव टीस्पून
चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून
मीठ चवीनुसार
कृती
१. उडीद डाळ धुवून ४ तास पाण्यात भिजवून ठेवा.
२. डाळीत चिमूटभर हळद घालून डाळ शिजवून घ्या. अगदी मेणासारखी शिजवू नका. थोडी अख्खी डाळ दिसली पाहिजे. प्रेशर कुकर मध्ये शिजवत असाल तर एका शिटीनंतर कुकर ३ मिनिटं मंद आचेवर ठेवा. डाळ व्यवस्थित शिजेल.
२. शिजलेली डाळ एका कढईत घाला.
३. दही पाणी न घालता घुसळून घ्या. डाळीमध्ये दही, मिरची, लसूण, हळद आणि मीठ घालून मिश्रण ढवळून घ्या.
४. जरुरीनुसार पाणी घालून डाळ मंद आचेवर ५ मिनिटं उकळून घ्या. ही डाळ दाट असते. त्यानुसार पाणी घाला.
५. शेवटी कोंथिबीर घालून डाळ ढवळून घ्या आणि गॅस बंद करा.
६. ही डाळ थंड झाल्यावर दाट होते त्यामुळे गरम असतानाच खावी.
७. गरम गरम खाती उडीद डाळ पोळी, भातासोबत किंवा अशीच खायला द्या. खूप छान लागते.
Your comments / feedback will help improve the recipes