Patole (पातोळे) – Rice Dumplings Steamed in Turmeric leaves

Patole

Patole (पातोळे) – Rice Dumplings Steamed in Turmeric leaves

पातोळे मराठी

This is a Maharashtrian and Goan specialty – rice dumplings steamed in Turmeric leaves. This is generally made as Prasad for Ganapati and Nagpanchami as Turmeric leaves are available in this season. This is a very easy recipe. Patole tastes delicious and aroma of turmeric leaves is awesome. There are 3 methods to make the cover for Patole.

1. By making a thick paste of Rice flour and spreading it on Turmeric Leaves and

2. By making a dough of Rice flour and gently patting it on Turmeric Leaves

3. Adding Rice flour to boiling water, knead it (Like Modak cover) and and gently patting it on Turmeric Leaves

Patole made using any method taste good. But I find the second method more easy and manageable. You can choose any as per your convenience.

Ingredients (for about 20 Patole) (1 cup = 200ml)

Fresh scraped coconut 2.5 cups

Crushed Jaggery 1.5 to 2 cups (as per desired sweetness)

Home made butter / ghee 1 teaspoon

Salt 2 pinch

Cardamom (Eliachy) powder ¼ teaspoon

Rice flour 1.5 cups

Turmeric leaves 10 if bigger leaves (you can cut each leaf and use for 2 Patole);

20 if small

Turmeric Leaves

Instructions

For Filling

1. Mix scraped coconut and jaggery in a thick bottom pan. Cook on low flame stirring all the time till jaggery is dissolved and mixture starts getting thick

2. Add a pinch of salt and Cardamom powder. Mix. Switch off the gas and let the filling cool.

Coconut Jaggery Filling

For Cover

Method 1:

1. Add a pinch of salt to Rice Flour. Add water and mix well to form a thick paste. We have to spread this paste on turmeric leaves; so it should not be too thick ; not too thin also.

Method 2:

1. Add a pinch of salt to Rice Flour. Using hot water, bind a medium consistency dough.

Method 3:

1. Boil 1+1/4 cup of water. Add half teaspoon ghee and pinch of salt. Add Rice flour, mix and switch off the gas. Quickly cover the pan. After 10 minutes knead the dough. Use water if required and knead a medium consistency dough.

Rice Flour Dough

To make Patole

1. Wash and Dry turmeric leaves. Remove stem if any.

2. If you have longer/bigger leaves then cut them in the centre (centre of the length) to make 2 halves.

3. Apply some ghee on each leaf

Method 1:

4. Spread rice flour paste on each leaf evenly and as thin as possible

Method 2 & 3:

4. Take a small lemon size Rice Flour dough and pat it on Turmeric Leaf to form a thin uniform layer.

5. Place a thin layer of filling on half of the leaf and fold the leaf so that filling is covered by rice paste/dough on both sides. If the leaves are wide, then fold it on the stem. If the leaves are long fold it on the centre of the length.

Place a layer of Filling on Rice Flour layer
Fold the leaf to cover the filling on both sides
Spread Filling on half of the rice paste and fold the leaf (पिठाच्या अर्ध्या भागावर सारण पसरा आणि पानाची घडी घाला )

6. Prepare all Patole as mentioned above.

Patole ready for steaming

7. Steam them in a steamer for about 15 minutes.

8. When cooked, Patole will not stick to the leaf.

9. You can either serve them along with leaves or separate leaves from Patole before serving. Serve with pure ghee.

10. Patole is a mild sweet dish that is extremely delicious.

 

 

 

Patole
Patole (पातोळे)

Note: In case turmeric leaves are not available, you can use banana leaves. But turmeric leaves aroma is awesome.

========================================================================

पातोळे

पातोळे हा महाराष्ट्र, गोव्यात बनवला जाणारा पारंपारिक गोड पदार्थ आहे. नागपंचमी ला आणि गौरी, गणपती ला नैवेद्य म्हणून पातोळे बनवतात. उकडीच्या मोदकासारखे  पण मोदकापेक्षा सोपे असे पातोळे हळदीच्या पानात वाफवतात. हळदीचा फार छान स्वाद येतो पातोळ्याला. हळदीची पानं नसतील तर केळीची पानं वापरू शकता.

पातोळ्याचं आवरण ३ प्रकाराने बनवतात.

पद्धत १. तांदुळाच्या पिठाची सरसरीत पेस्ट बनवून ती हळदीच्या पानाला सारवून घेतात

पद्धत २. तांदुळाचं पीठ गरम पाणी घालून भिजवून ते हळदीच्या पानावर थापतात

पद्धत ३. तांदुळाची उकड काढून (मोदकाप्रमाणे) ती हळदीच्या पानावर थापतात

पातोळे कसे ही केले तरी छान लागतात.

साहित्य (२० पातोळे बनवण्यासाठी) (१ कप = २०० मिली)

 

सारणासाठी

ताजा खवलेला नारळ अडीच  कप

चिरलेला गूळ दीड ते दोन कप (जसं गोड हवं असेल तसं )

वेलची पूड पाव चमचा

मीठ चिमूटभर (ऐच्छिक)

आवरणासाठी

तांदुळाचे पीठ दीड कप (सुगंधी तांदुळाचं / मोदकाचं पीठ असेल तर उत्तम)

मीठ चिमूटभर

साजूक तूप १ चमचा 

हळदीची पानं १० मोठी / २० छोटी

Turmeric Leaves (हळदीची पानं)

कृती

. सारणासाठी खवलेला नारळ आणि गूळ मंद आचेवर शिजवून घ्या. मिश्रण घट्ट होत आलं की मीठ आणि वेलची पूड घालून मिक्स करा आणि ताटलीत काढून मिश्रण गार करा.

Coconut Jaggery Filling (सारण)

. आवरणासाठी

पद्धत १. तांदुळाच्या पिठात चिमूटभर मीठ घाला. पाणी घालून सरसरीत पेस्ट बनवा. फार पातळ नको आणि फार घट्ट ही नको. पानावर व्यवस्थित पणे सारवता आली पाहिजे.

पद्धत २. तांदुळाच्या पिठात चिमूटभर मीठ घाला. गरम पाणी घालून पीठ भिजवा. पोळ्यांच्या कणकेसारखा गोळा झाला पाहिजे. फार घट्ट नको आणि फार सैल नको. पीठ छान मळून घ्या.

Rice Flour Dough (पिठाचा गोळा )

पद्धत ३. सव्वा कप पाणी उकळा. त्यात अर्धा चमचा तूप आणि मीठ घाला. पाणी उकळल्यावर तांदुळाचं पीठ घालून ढवळा आणि गॅस बंद करून झाकून ठेवा. १० मिनिटांनी पीठ छान मळून घ्या. हवं असल्यास थोडें पाणी लावा आणि भाकरीच्या पिठासारखा गोळा बनवा.

. पातोळे बनवण्यासाठी

. हळदीची पानं धुवून पुसून घ्या. मोठी पानं असतील तर एका पानाचे दोन तुकडे करा (लांब बाजू कापा). प्रत्येक पानाला थोडं तूप लावून घ्या.

पद्धत १.

२. थोडी तांदुळाची पेस्ट हळदीच्या पानावर एकसारखी पसरा. पानाची शीर मधे आली पाहिजे. दोन्ही बाजूला एक सारखं पीठ लागलं पाहिजे.

पद्धत २ आणि ३.

२. पिठाची छोटी गोळी घेऊन हळदीच्या पानावर पातळ थापापानाची शीर मधे आली पाहिजे. दोन्ही बाजूला एक सारखं पीठ लागलं पाहिजे.

. आता थापलेल्या / सारवलेल्या पिठावर शीरेच्या एका बाजूला सारण पसरवा. अगदी कडेपर्यंत पसरू नका.

Place a layer of Filling on Rice Flour layer (पिठाच्या अर्ध्या भागावर सारण पसरा )
Spread Filling on half of the rice paste and fold the leaf (पिठाच्या अर्ध्या भागावर सारण पसरा आणि पानाची घडी घाला )
Fold the leaf to cover the filling on both sides (पानाची घडी घाला)

. पानाच्या शीरेवर पानाची घडी घाला म्हणजे सारणाच्या दोन्ही बाजूला पिठाचं आवरण येईल . कडा हलक्या हातानं दाबून बंद करा.

. सगळी पाने अशी तयार करून घ्या.

पातोळे वाफवण्यासाठी तयार

. इडली / मोदक पात्रात पाणी गरम करून त्यातल्या जाळीवर ही पाने लावा. झाकण बंद करून १५ मिनिटं वाफवून घ्या. शिजलेले पातोळे पानाला चिकटत नाहीत.

. गरमागरम पातोळे साजूक तुपाबरोबर खायला द्या.

टीप

हळदीची पानं अरुंद असतील तर लांब बाजूची घडी घाला नाहीतर पातोळे फार छोटे होतील.

पातोळे
पातोळे

2 Comments

  1. Mam I tried receipe but the jaggery and coconut mixture was melting even after it was cooled ..was this because of quality of jaggery

    • Maybe the filling was undercooked.Did you cook the filling till it starts getting dry? If yes, then the filling will not melt further. Filling consistency should be similar to Modak filling.

Leave a Reply

Your email address will not be published.


*