Raw Papaya Chutney (कच्च्या पपईची चटणी – फरसाण चटणी) – संभारो

Raw Papaya Chutney (कच्च्या पपईची चटणी - फरसाण चटणी)

Raw Papaya Chutney (कच्च्या पपईची चटणी फरसाण चटणी) – संभारो

कच्च्या पपईची चटणी फरसाण चटणी मराठी

We all love the Raw Papaya Chutney that is served with Gujarati snacks like Kachori, Fafda and Gathiya. I tried a few recipes but did not get the right texture of this chutney. Then I did some changes to the recipe and finally got the texture and the taste that I was looking for. Two main ingredients in this chutney are Raw Papaya and Besan. It is so tasty that you can also have it as Salad or as a subji along with Roti / Chapati (Indian Bread).

Ingredients (1 Cup = 250 ml)

Raw Papaya thin pieces 2 cups

Besan (Gram Flour / Chickpeas Flour) ½ cup

Buttermilk or Curd 2 tablespoon

Slit Green Chilies 4-5

Lemon Juice ½ teaspoon

Crushed Ginger ½ teaspoon

Turmeric Powder 2 pinch

Sugar About 1 teaspoon (adjust as per taste)

Salt to taste

Fruit Salt ½ teaspoon

Oil 1 tablespoon + ½ teaspoon

Cumin Seeds ½ teaspoon

Asafoetida (Hing) a pinch

Instructions

1. Make thin pieces of Papaya about 1 inch X 1 inch size. You can either peel Papaya before chopping or chop it along with the peel.

2. In a bowl, mix Besan, Buttermilk, a pinch of Turmeric powder, ½ teaspoon oil and salt. Make a batter like Idli batter / thicker than Pan Cake batter. Add water if required.

3. Add water to a steamer and bring it to boil.

4. Grease a plate with oil.

5. Add fruit salt to besan batter, mix it quickly in one direction and pour in the greased plate. Do not over mix.

6. Quickly Place the plate in the steamer and Steam for 20 minutes.

7. On cooling, crumble the steamed Besan.

8. In a pan, heat 1 tablespoon of oil. Add cumin seeds, a pinch of turmeric, Asafoetida, crushed ginger and slit green chilies. Sauté for 2-3 minutes.

9. Add Papaya pieces, mix and cook covered till Papaya is soft. Stir every 2-3 minutes. Do not overcook.

10. Add Crumbled Besan, lemon juice, sugar and salt. Mix. Cook for 2 minutes.

11. Tasty Raw Papaya Chutney is ready. Serve it with Thepla or serve it as Salad or serve it as Subji along with Roti (Indian Bread).

Raw Papaya Chutney
Raw Papaya Chutney
        ===================================================================================

कच्च्या पपईची चटणी फरसाण चटणी

फरसाण सोबत दिली जाणारी चटणी माझ्या मुलाला खूप आवडते. मी २३ रेसिपीज करून पहिल्या. पण चटणीचं  हवं तसं टेक्सचर येत नव्हतं. मग माझ्या मनानेच रेसिपीत बदल करून चटणी केली. आणि जशी हवी तशी चटणी झाली चव आणि टेक्सचर सुद्धाह्या चटणी ला २ मुख्य जिन्नस लागतात कच्ची पपई आणि बेसन. बाकी सगळं घरात असणारं साहित्य. चटणी खूप टेस्टी होते. आम्ही ही चटणी अशीच खातो किंवा भाजी म्हणून पोळी सोबत खातो.

साहित्य (१ कप = २५० मिली)

कच्च्या पपईच्या काचऱ्या २ कप

बेसन अर्धा कप

ताक किंवा दही २ टेबलस्पून

हिरव्या मिरच्या ४५ उभी चीर देऊन

ठेचलेलं आलं अर्धा चमचा

हळद २ चिमूट

साखर १ चमचा (चवीनुसार कमी /जास्त करा)

लिंबाचा रस अर्धा चमचा

मीठ चवीनुसार

इनो फ्रुट सॉल्ट अर्धा चमचा

तेल १ टेबलस्पून + अर्धा चमचा

जिरं अर्धा चमचा

हिंग चिमूटभर

कृती

. पपईच्या पातळ काचऱ्या चिरून घ्या. चिरण्याआधी पपईची साल काढा किंवा काहीजण साल न काढता पपई चिरतात

. एका बाऊलमध्ये बेसन, ताक/ दही, चिमूटभर हळद, अर्धा चमचा तेल आणि मीठ घाला. इडलीच्या पिठासारखं पीठ भिजवा. जरूर पडल्यास पाणी घाला

. इडलीपात्रात पाणी घालून गरम करायला ठेवा.

. एका ताटलीला तेल लावून घ्या

. इडलीपात्रातलं पाणी उकळलं की बेसनाच्या पिठात इनो फ्रुट सॉल्ट घाला. लगेच एका दिशेने ढवळून  पीठ तेल लावलेल्या ताटलीत घाला. जास्त वेळ ढवळू  नका

. ताटली लगेच इडलीपात्रात ठेवा आणि झाकण लावून २० मिनिटं वाफवून घ्या.  

. वाफवलेलं पीठ गार झाल्यावर हाताने कुस्करून घ्या

. एका कढईत १ टेबलस्पून तेल गरम करून जिरं, चिमूटभर हळद, हिंग घालून फोडणी करा. त्यात आलं आणि हिरव्या मिरच्या घालून २३ मिनिटं परतून घ्या.   

. पपईच्या काचऱ्या घाला. नीट ढवळून झाकण ठेवून पपई मऊ होईपर्यंत शिजवा. दर २३ मिनिटांनी ढवळत राहा. पपई मेण होईपर्यंत शिजवू नका. तुकडे दिसले पाहिजेत

१०. कुस्करलेलं बेसन घाला. लिंबाचा रस, साखर आणि मीठ घालून एकत्र करा. २ मिनिटं वाफवून घ्या.

११. चविष्ट चटणी तयार आहे. फरसाण, ठेपला सोबत सर्व्ह करा किंवा सॅलड म्हणून सर्व्ह करा किंवा पोळीबरोबर खायला भाजी म्हणून सर्व्ह करा

Raw Papaya Chutney (कच्च्या पपईची चटणी – फरसाण चटणी)
Raw Papaya Chutney (कच्च्या पपईची चटणी – फरसाण चटणी)

2 Comments

  1. फरसाणवाले नेहमी उरलेला ढोकळा अशा चटणीसाठी वापरतात.हिरवा रंग घालून गोडसर चटणी करतात.

    • हो. घरी ढोकळा नसतो म्हणून बेसन उकडून घालते. आणि कृत्रिम रंग मी वापरत नाही. \nSudha

Your comments / feedback will help improve the recipes