Rava Cake – Tupachya Bericha Cake (रव्याचा केक – तुपाच्या बेरीचा केक) – Eggless Semolina Cake with Ghee Sediments

Rava Cake (रव्याचा केक - तुपाच्या बेरीचा केक)

Rava Cake – Tupachya Bericha Cake (रव्याचा केक – तुपाच्या बेरीचा केक) Eggless Semolina Cake with Ghee Sediments

रव्याचा केक – तुपाच्या बेरीचा केक मराठी

In India, making Clarified Butter (Ghee) at home is a normal practice. Ghee is an important element of Indian Cuisine. When Ghee is made at home from Butter, Ghee Sediments (residue) – Tupachi Beri as we call it in Marathi – is a by-product. Since I make Ghee once in 8-10 weeks, I get a good amount of Beri every time. Apart from adding it to Pan Cakes and Different Types of Rice, I also bake a cake using this Beri and Semolina. It’s an easy recipe that makes this delicious eggless Cake.

You can make it without Ghee sediments also. Add 1.5 to 2 tablespoon of Ghee instead of Ghee sediments.

Ingredients

Fine Semolina 1.5 cups

Sugar 1 cup

Milk 1 cup

Curd (Dahi / Yogurt) 1 cup

Tupachi Beri (Ghee Sediments) 1 cup (or whatever is available)

Baking powder ½ teaspoon

Baking soda ¼ teaspoon

Salt ¼ teaspoon

Cardimum Powder ¼ teaspoon

Pure Ghee for greasing

Instructions

1. Mix Semolina, Sugar, Milk, Curd, Tupachi Beri together in a bowl. (You can use the same pan that you used from making pure Ghee).

2. Keep the mixture for 8 hours.

3. Mix in Baking Powder, Baking Soda, Salt and Cardamom powder.

4. Grease a baking tray.

5. Pour the mixture in baking tray. Gently Tap the baking tray on kitchen platform so that the mixture levels and air bubbles are removed.

6. Bake at 210 degree centigrade (pre-heated for 10 minutes) for 25-30 minutes till cake is cooked.

7. On cooling cut in desired shape pieces and serve.

8. This cake can be stored for 2 days at room temperature. If you want to store longer, store in refrigerator.

Rava Cake (रव्याचा केक – तुपाच्या बेरीचा केक)
Rava Cake (रव्याचा केक – तुपाच्या बेरीचा केक)
Rava Cake (रव्याचा केक – तुपाच्या बेरीचा केक)

Note

1. If you are using Ghee instead of Ghee sediments, add 1.5 to 2 tablespoon of Ghee instead of Ghee sediments in step 1.

2. It will take 45-50 minutes to bake this cake in pre-heated Pressure Cooker. Check the cake after 45 minutes by inserting a toothpick. If not done, bake further and check after every 8-10 minutes.

3. Colour of the cake will depend on the colour of Ghee sediments. My Ghee Sediments are dark brown and hence the colour of the cake.

4. You can add dry fruits of your choice. But this cake is so delicious as it is; you really don’t need any dry fruits.

==================================================================================

रव्याचा केक (तुपाच्या बेरीचा केक )

घरी तूप कढवल्यावर तुपाच्या बेरीचं काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. मी ८१० आठवडयांनी तूप कढवते त्यामुळे नेहमी बऱ्यापैकी बेरी येते. आणि हल्ली लहानपणासारखं बेरी खाणं ही होत नाही. मग कणिक भिजवायला बेरीचं पाणी, बेरी धिरड्यात / थालीपीठात घालून, बेरी पुलावात घालून संपवावी लागते. बेरीचे आणखी २ प्रकार मी बनवते ते म्हणजे बेरीचा रवा केक आणि बेरीची नानखटाई. दोन्ही पदार्थ अप्रतिम लागतात. आजची रेसिपी बेरीच्या रवा केकची. हा केक प्रेशर कुकर मध्ये ही बनवू शकता. बेरी नसेल तर खाली दिलेल्या प्रमाणात दीड ते दोन टेबलस्पून तूप घालून हा केक बनवू शकता.

साहित्य

बारीक रवा दीड कप

दूध १ कप

साखर १ कप

दही १ कप 

तुपाची बेरी १ कप (जेवढी असेल तेवढी)

मीठ पाव चमचा 

बेकिंग सोडा पाव चमचा

बेकिंग पावडर अर्धा चमचा

वेलची पावडर पाव चमचा

तूप केक च्या ट्रे ला लावण्यासाठी

कृती

. एका बाउल मध्ये रवा, दूध, साखर, बेरी, दही, तुपाची बेरी मिक्स करून ८ तास झाकून ठेवा. तूप कढवलेल्या पातेल्यात ही हे साहित्य मिक्स करू शकता.

. मिश्रणात बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, मीठ आणि वेलची पावडर घालून मिक्स करा.

. केक च्या ट्रे ला तूप लावून त्यात मिश्रण घाला. ट्रे ओट्यावर हलकेच आपटून घ्या म्हणजे पिठात हवेचे बुडबुडे असतील तर निघून जातील.

. ओव्हन २१० डिग्री सेन्टिग्रेड वर १० मिनिटं प्रीहीट करून केक २५३० मिनिटं भाजून घ्या. टूथपीक घालून चेक करा.

. केक थंड झाला की आवडीच्या आकाराचे तुकडे कापून खायला द्या.

. हा केक फ्रिज बाहेर २ दिवस राहतो. जास्त दिवस ठेवायचा असेल तर फ्रिज मध्ये ठेवा

Rava Cake (रव्याचा केक – तुपाच्या बेरीचा केक)
Rava Cake (रव्याचा केक – तुपाच्या बेरीचा केक)
Rava Cake (रव्याचा केक – तुपाच्या बेरीचा केक)

टीप

. तुपाच्या बेरीऐवजी तूप घालायचं असेल तर दीड ते दोन टेबलस्पून तूप घाला आणि बाकी साहित्याबरोबर स्टेप १ मध्ये सांगितल्याप्रमाणे मिश्रणात मिक्स करा.

. प्रेशर कुकर मध्ये केक भाजायचा असेल तर प्री हीटेड प्रेशर कुकर मध्ये ४५५० मिनिटं केक भाजा. ४५ मिनिटानंतर चेक करा. केक भाजला नसेल तर आणखी थोडा वेळ भाजा आणि प्रत्येक १० मिनिटांनी चेक करा.  

. केक चा रंग बेरीच्या रंगानुसार बदलेल. माझी तुपाची बेरी डार्क ब्राऊन असते म्हणून केक चा रंग डार्क असतो

. हवं असेल तर सुके मेवे घालू शकता. पण हा केक असाच एवढा स्वादिष्ट लागतो की सुक्या मेव्याची जरूर नाही

4 Comments

    • Dear Manisha,
      Cup to grams differs for ingredients. It is better to use standard measures for cups and spoons. If a recipe mentions both cups & grams, it’s better to follow one measure consistently for all ingredients.
      Sudha

Leave a Reply

Your email address will not be published.


*