Athalyancha Halwa (आठळ्यांचा हलवा) – Jackfruit Seeds Pudding – Sugarfree

Athalyancha Halwa (आठळ्यांचा हलवा) – Jackfruit Seeds Pudding
Athalyancha Halwa (आठळ्यांचा हलवा) – Jackfruit Seeds Pudding

Athalyancha Halwa (आठळ्यांचा हलवा) – Jackfruit Seeds Pudding – Sugarfree – No Sugar, No Jaggery, No Honey – My Innovative recipe

आठळ्यांचा स्वादिष्ट हलवा मराठी

I’d designed this recipe for a competition.

In Konkan, we use Jackfruit Seeds to make subji, we add it to curry, we make pan cake using flour of dried Jackfruit seeds. But I was not aware of any other recipe made using these seeds. While thinking about an innovative Sweet dish recipe without using Sugar, Jaggery and Honey, I thought of using Jackfruit seeds and Sugarcane Juice as 2 main ingredients to make a Halwa (Pudding). To get the right texture of Halwa, I added some semolina. For added sweetness, added little dry Dates powder. A few Dates pieces were added along with Pieces of Jackfruit Seeds to give the Halwa some crunch. Halwa was super delicious and super healthy too.

Ingredients (Serves 4) (1 cup = 250 ml)

Jackfruit Seeds 24-25

Coarse Semolina 2 tablespoon

Sugarcane Juice 1.75 cup (with Lemon)

Dry Dates Powder ¼ cup

Dates 4 chopped into pieces

Pure Ghee (Clarified Butter) 3 teaspoon

Salt 1 pinch

Instructions

1. Wash Jackfruit Seeds and Pressure cook them until soft.

2. Upon cooling, peel the seeds. Save 5 seeds for garnishing and chop them into long pieces. Transfer remaining seeds to a grinder, add ¼ cup sugarcane juice and grind into a smooth paste.

3. In a thick bottom pan, add ½ teaspoon pure ghee, add semolina and roast on low flame till the colour changes to light pink. Take it out to a plate.

4. Reduce the sugarcane juice by boiling it on medium flame. Reduce 1.5 cups of juice to make it 1.25 cups.

5. Add 1.5 teaspoon of Pure Ghee to the pan, add Seeds paste and saute on low flame for 7-8 minutes.

6. Add Roasted semolina and Dry Dates powder to the pan and mix it well.

7. Add hot sugarcane juice and cook covered till the mixture is cooked.

8. Remove the lid, add dates pieces and salt. Keep sauteing till you get the required consistency of the Halwa.

9. Once you get the required consistency, add 1 teaspoon of Pure Ghee, mix well and switch off the gas.

10. Delicious and Healthy Jackfruit Seeds Halwa is ready. Garnish with Seeds pieces and serve hot.

Athalyancha Halwa (आठळ्यांचा हलवा) – Jackfruit Seeds Pudding
Athalyancha Halwa (आठळ्यांचा हलवा) – Jackfruit Seeds Pudding
Athalyancha Halwa (आठळ्यांचा हलवा) – Jackfruit Seeds Pudding
Athalyancha Halwa (आठळ्यांचा हलवा) – Jackfruit Seeds Pudding

 

 

 

 

 

==================================================================================

आठळ्यांचा स्वादिष्ट हलवा साखर, गूळ, मध न घालता – माझी नाविन्यपूर्ण रेसिपी – Jackfruit Seeds Pudding – No Sugar, No Jaggery, No Honey

ही रेसिपी मी कालनिर्णयच्या स्पर्धेसाठी केली होती.

कोकणात फणसाच्या आठळ्यांची भाजी करतात, आठळ्या आमटीत घालतात, आठळ्यांच्या पिठाचं थालीपीठ करतात. पण ह्या व्यतिरिक्त काही पदार्थ ऐकलेले किंवा वाचलेले नाहीत. स्पर्धेसाठी नव्या रेसिपीचा विचार सुरु असतानाच नेहमीच्या भाजीवाल्याकडे छान फणस दिसला. फणस आणून खाऊन झाला. आठळ्या शिजवण्यासाठी पाण्यात घालून ठेवल्या होत्या. त्या पाहून ह्याचा हलवा करावा असं सुचलं. साखर, गूळ, मध न घालता गोड पदार्थ करायचा तर उसाचा रस घालावा असा विचार आला. मग हे मुख्य जिन्नस घेऊन रेसिपी तयार केली. आठळ्या शिजवून वाटल्या की अगदी बारीक पेस्ट होते त्यामुळे हलव्याच्या टेक्सचरसाठी थोडा रवा घातला. गोडीसाठी थोडी खारीक पूड घातली आणि खाताना मधे मधे तुकडे लागावेत म्हणून थोडा खजूर घातला. सजावटीसाठी सुद्धा आठळ्यांचे तुकडेच घातले. हलव्याला उसाच्या रसाची छान चव आली त्यामुळे वेलची सुद्धा घातली नाही. हा आठळ्यांचा नाविन्यपूर्ण हलवा खूप स्वादिष्ट झाला.

साहित्य (१ कप = २५० मिली) (४ जणांसाठी)

फणसाच्या आठळ्या २४२५

जाडा रवा २ टेबलस्पून

उसाचा रस पावणे दोन कप (लिंबू घालून केलेला)

खारीक पावडर पाव कप

खजूर ४ तुकडे करून

साजूक तूप ३ टीस्पून

मीठ चिमूटभर

कृती

. फणसाच्या आठळ्या स्वच्छ धुवून प्रेशर कुकर मध्ये शिजवून घ्या. आठळ्या लवकर शिजतात.

. आठळ्या गार झाल्या की सोलून घ्या. आठळ्या वेगळ्या काढून ठेवा आणि बाकी आठळ्या मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. वाटताना पाव कप उसाचा रस घाला. बाजूला काढून ठेवलेल्या आठळ्यांचे लांबट तुकडे करा. हे सजावटीसाठी वापरायचे आहेत.

. एका कढईत अर्धा टीस्पून साजूक तूप घालून रवा मंद आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या. भाजलेला रवा एका ताटलीत काढून ठेवा.

. बाकीचा उसाचा रस एका पातेल्यात घालून १० मिनिटं उकळून घ्या. दीड कप रस साधारण सव्वा कप होईल एवढं उकळा.

. आता कढईत दीड टीस्पून साजूक तूप घालून वाटलेल्या आठळ्या घाला आणि मंद आचेवर मिनिटं परतून घ्या.

. कढईत भाजलेला रवा आणि खारीक पूड घालून मिश्रण एकजीव करा. त्यात गरम उसाचा रस घालून झाकण ठेवून मंद आचेवर शिजवा.

. मिश्रण शिजलं की त्यात खजुराचे तुकडे घाला. चिमूटभर मीठ घाला आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत रहा.

. मिश्रण शिऱ्यासारखं घट्ट झालं की त्यात १ टीस्पून साजूक तूप घालून ढवळून घ्या.

. आठळ्यांचा स्वादिष्ट आणि पौष्टिक हलवा तयार आहे. गरम हलवा वर आठळ्यांचे तुकडे घालून खायला द्या.

Athalyancha Halwa (आठळ्यांचा हलवा) – Jackfruit Seeds Pudding
Athalyancha Halwa (आठळ्यांचा हलवा) – Jackfruit Seeds Pudding
Athalyancha Halwa (आठळ्यांचा हलवा) – Jackfruit Seeds Pudding
Athalyancha Halwa (आठळ्यांचा हलवा) – Jackfruit Seeds Pudding

 

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes