Sakhar Bhat ( साखर भात) – Maharashtrian Sweet Rice
This is one more delicacy from Maharashtra. It is very easy to make and tastes delicious. However it is not generally available in restaurants that serve Maharashtrian cuisine. Hence now-a-days it’s not so popular. It’s worth trying this out.
Ingredients (Serves 4)
Raw rice 1 cup (use rice with short grains like kolum or ambemohor; do not use Basmati rice)
Sugar 1.25 cup (Use 1.5 cups if you want rice very sweet)
Lemon Juice 1.5 teaspoon
Cloves 5-6
Cardamon 5-6
Cardamon Powder ¼ teaspoon
Raisins 15-20
Cashew 15-20
Saffron 2 pinches
Desi Ghee (Clarified Butter) 4 tablespoon
Salt a pinch
Milk ½ teaspoon to soak saffron
Instructions
1. Wash and drain rice and keep for 15 minutes.
2. Soak saffron in hot milk. Dissolve sugar in ½ cup of water.
3. In a pan, add 1 teaspoon of desi Ghee, fry cashews and keep aside.
4. In the same pan, fry raisins and keep aside.
5. Add 2.5 tablespoon ghee to the pan. Add cloves and cardamon to the pan and fry them. Keep cloves in the pan.
6. Add rice and saute on low flame till rice gets dry.
7. Add 2 cup hot water, a pinch of salt, lemon juice and cook covered till rice is half cooked.
8. Add sugar water to the rice. Mix and Cover the pan. Cook the rice for 15 minutes. Add water as required.
9. Add Saffron milk, cardamon powder, Fried Cashew and raisins (save a few for garnishing). Mix well.
10. Transfer the rice to a pressure cooker pan and cook in pressure cooker. After one whistle, continue to cook for 10 minutes on simmer.
10. When pressure cooker steam settles, Add remaining Desi ghee to the rice and mix.
11. Delicious Sakhar Bhat is ready. You can have it hot or cold. It tastes awesome.
Note
You can cook the rice on simmer without cooking in pressure cooker. But sometimes, rice does not cook properly and it takes long to cook. Hence I recommend to cook in pressure cooker.
====================================================================================
साखर भात
साखर भात हे महाराष्ट्रीयन पक्वान्न आहे. हल्ली फारसा लोकप्रिय पदार्थ नाही. कदाचित मराठी रेस्टॉरंट्स मध्ये नसतो म्हणून नव्या पिढीला माहित नसेल. पण हा पदार्थ अगदी सोपा आणि स्वादिष्ट असतो. काही जण साखरेचा पाक बनवून साखरभात करतात. पण माझी आई साखरेचं पाणी घालून भात बनवायची. मी ही तसाच बनवते. फक्त भात शिजत आला की मी प्रेशर कुकर मध्ये एक वाफ काढून घेते त्यामुळे भात छान मऊ आणि मोकळा होतो. पुढच्या सणाला नक्की करून बघा.
साहित्य (४ जणांसाठी)
तांदूळ १ कप (बारीक दाण्याचा तांदूळ घ्या – कोलम / आंबेमोहोर ; बासमती घेऊ नका )
साखर सव्वा ते दीड कप (मी सव्वा कप घेते)
लिंबाचा रस दीड चमचा
लवंगा ५–६
वेलची ५–६
वेलची पूड पाव चमचा
काजू १०–१५
बेदाणे (किसमिस ) १०–१५
केशर २ चिमूट
दूध अर्धा चमचा केशर भिजवायला
मीठ चवीनुसार
साजूक तूप ४ टेबलस्पून
कृती
१. तांदूळ धुवून निथळून १५ मिनिटं ठेवा.
२. केशर गरम दुधात भिजवून ठेवा. साखर अर्धा कप पाण्यात विरघळवून घ्या.
३. एका पातेल्यात एक चमचा तूप घालून त्यात काजू मंद आचेवर तळून घ्या. ताटलीत काढून ठेवा.
४. त्याच तुपात बेदाणे (किसमिस) तळून घ्या आणि ताटलीत काढून ठेवा.
५. पातेल्यात आणखी २.५ टेबलस्पून तूप घालून लवंगा आणि वेलची घालून तळून घ्या. लवंगा, वेलची बाहेर काढू नका.
६. त्यातच तांदूळ घालून सुके होईपर्यंत परतून घ्या.
७. आता पातेल्यात २ कप गरम पाणी, लिंबाचा रस घाला. चिमूटभर मीठ घालून भात अर्धवट शिजवून घ्या.
८. साखरेचं पाणी घालून भात मंद आचेवर १५ मिनिटं शिजवा. जरूर पडल्यास आणखी थोडं पाणी घाला.
९. थोडे काजू बेदाणे सजावटीसाठी वेगळे काढून ठेवा. बाकीचे काजू, बेदाणे, केशर, वेलची पूड भातात घालून मिक्स करा.
१०. भात प्रेशर कुकर च्या भांड्यात काढून घ्या. कुकर ची एक शिटी झाली की गॅस बारीक करून १० मिनिटं शिजवा.
११. कुकर ची वाफ गेली कि भातात उरलेले तूप मिक्स करा.
१२. स्वादिष्ट साखर भात तयार आहे. काजू, बेदाणे घालून सजावट करा आणि सर्व्ह करा. हा भात गरम किंवा गार कसाही खाऊ शकता.
टीप
साखर भात तुम्ही साधाच – प्रेशर कुकर मध्ये न ठेवता – शिजवू शकता. पण त्याला जास्त वेळ लागतो आणि मध्ये मध्ये ढवळत राहावे लागते.
Khup chan mhiti dili.
Thank you