Ukadichi Bhakari (उकडीची भाकरी)– Indian Soft Flat Bread

Ukadichi Bhakari (उकडीची भाकरी)Indian Soft Flat Bread

उकडीची भाकरी मराठी

Ukadichi Bhakari using Rice flour is very famous in Maharashtra. In this Rice flour is steamed, dough is kneaded and then Bhakari is rolled using this dough. I make Bhakari with different flours using this method. Sorghum (Jowar), Pearl Millet (Bajara), Corn / Maize (Maka) and Nachani (Finger Millet / Ragi) as well as any combination of these flour makes a healthy and soft Bhakari. This is an easier method than binding the dough and making a Bhakari by patting the dough. With Steamed flour you can easily roll a Bhakari like Chapati and roast it on a Griddle. Roasting it on direct flame is not required. Also you don’t need to spread water on Bhakari while roasting. Bhakari puffs up while roasting on a Griddle and remains soft even after 8-10 hours.

Ingredients (Makes 10-12 medium size Bhakari) (1 cup = 250 ml)

Rice / Sorghum (Jowar) / Pearl Millet (Bajara)/ Maize (CornMeal) / Nachani (Finger Millet / Ragi) Flour 2 cup

Salt ½ teaspoon

Instructions

1. Add 2 cups of water in a Pan. Add salt. Heat the pan. And bring the water to boil.

2. Add flour and mix.

3. Switch off the gas. Quickly cover the pan.

4. After 10 minutes, take out the dough in a plate and knead well to get medium soft dough. Use water if required. Use little oil if the dough is sticky.

5. Take a big lemon size dough ball and roll it into a circular Bhakari. Use flour for dusting. Roti should be little thicker than chapati.

6. Heat a Griddle. Turn gas to medium flame.

7. Transfer Bhakari to the Griddle. Roast it a bit and flip it.

8. Roast Bhakari. It will puff up. Gently press the edges with a Spatula so that edges also get roasted.

Ukadichi Makai Roti (उकडीची मकाई रोटी)

9. When other side is cooked, flip Bhakari and roast the first side. Bhakari will puff up.

10. Serve hot Bhakari along with Home made butter and any Gravy / Subji.

Ukadichi Makai Roti (उकडीची मकाई रोटी)
Ukadichi Jwarichi Bhakari (उकडीची ज्वारीची भाकरी)
     ==================================================================================

उकडीची मऊसूत भाकरी

बऱ्याच जणींना भाकऱ्या करता येत नाहीत. त्याची वेगवेगळी कारणं आहेतएकतर भाकरी थापायची सवय नसतेभाकरी भाजताना पाणी कधी लावायचं माहित नसतं; भाकरीचे तुकडे पडतात; भाकरी भाजताना फुलत नाही; भाकरी मऊ होत नाही; शिळी भाकरी तर अतिशय सुकी होते. लहानपणापासून आपण बघत / ऐकत आलोय की तांदुळाची भाकरी उकड काढून करायची आणि ज्वारी, बाजरी, नाचणी, मिक्स पिठाची भाकरी उकड न काढता पीठ भिजवून करायची. मक्याची भाकरी (मकाई रोटी) सुद्धा पीठ भिजवून करतात. पण मी सगळ्या भाकऱ्या उकड काढून करते. त्यामुळे भाकरी करणं अगदी सोपं जातं आणि वर लिहिलेले सगळे प्रश्न सुटतात. उकडीची भाकरी पोळपाटावर लाटता येते. तिला भाजताना पाणी लावावं लागत नाही. भाजताना सरळ गॅसवर फुलवावी लागत नाही. आणि मुख्य म्हणजे भाकरी छान मऊसूत होते; फुलक्यासारखे पापुद्रे सुटतात. अगदी शिळी भाकरी सुद्धा मऊ राहते.

साहित्य (१०१२ मध्यम आकाराच्या भाकऱ्यांसाठी ) (१ कप = २५० मिली)

ज्वारी / तांदूळ / मका / बाजरी / नाचणी / मिक्स पीठ २ कप

मीठ अर्धा चमचा

पाणी

कृती

. उकड काढण्यासाठी कप पाणी गरम करा. त्यात थोडं मीठ घाला.

. पाणी उकळलं की गॅस बारीक करून त्यात पीठ घाला. नीट ढवळून गॅस बंद करा आणि पातेल्यावर झाकण ठेवून पीठ मुरायला ठेवा.

. पीठ कोमट असताना परातीत काढून पाण्याचा हात लावून छान मळून घ्या.

. पिठाचे छोटे गोळे करून पोळपाटावर लाटून घ्या. वरून जरुरीप्रमाणे सुकं पीठ लावा. भाकरी पातळ लाटली की गरम तव्यावर घाला.

. एक बाजू जराशी भाजली की भाकरी परता.

. दुसरी बाजू भाजून घ्या. आता भाकरी फुलेल. भाकरीच्या कडेला कायलाथ्याने चेपून कडा नीट भाजून घ्या; नाहीतर कडा कच्च्या राहतील.

Ukadichi Makai Roti (उकडीची मकाई रोटी)

. परत भाकरी परतून पहिली बाजू भाजून घ्या. भाकरी ह्या बाजूनेही फुलेलभाकरीच्या कडेला कायलाथ्याने चेपून कडा नीट भाजून घ्या.

. मऊसूत भाकरी लोणी आणि कांद्याबरोबर खायला द्या.  

Ukadichi Makai Roti (उकडीची मकाई रोटी)
Ukadichi Jwarichi Bhakari (उकडीची ज्वारीची भाकरी)

       

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes