Fanasache Saandan / Dhondas (फणसाचे सांदण / धोंडस) – Jackfruit Cake
This is a specialty from Konkan region in Maharashtra and from Goa. In North Konkan, it’s called Saandan; in South Konkan and Goa it’s called Dhondas (धोंडस). There are 2 types of Jackfruits. One is with dry bulbs (कापा फणस) and other with juicy bulbs (बरका / रसाळ फणस). We can use both types for this recipe.
Extracting pulp of Jackfruit from juicy bulbs is a tedious process. You can’t use a blender or grinder for it as Jackfruit fibre (strings) get entangled in the blades of blender / grinder. Traditional method for extracting pulp uses a sieve/ strainer. Place Jackfruit bulbs in a sieve / strainer; place the sieve on a bowl. Push and squeeze the bulbs to extract the pulp. This way pulp gets collected in the bowl and the fibre remains on the sieve.
While using a grinder to grind Jackfruit with juicy / dry bulbs add some Semolina while grinding and make a pulp.
Jackfruit Pulp is mixed with coarse rice flour (or coarse Semolina) along with fresh coconut and jaggery and batter is steamed or Baked. It is served with sweet coconut milk or home made ghee (clarified butter). It’s very healthy and tasty sweet dish. In Konkan, this is served as a part of meal like Puran Poli and not as a sweet dish. Whereas the baked Dhondas is served as a snack in Goa.
I add a pinch of Baking Soda to the batter. That gives nice fluffy texture to Saandan / Dhondas. But if you don’t want it, skip it.
Ingredients (1 cup = 250 ml)
Coarse Rice Flour / Idli Rava / Coarse Semolina 1.5 cup
Jackfruit Pulp / Jackfruit dry Bulbs 2 cup
Fresh Scraped Coconut 1 cup
Crushed Jaggery 1 to 1.5 cups (adjust as per taste)
Salt ¼ teaspoon
Cardamom Powder ¼ teaspoon
Baking Soda a pinch (Optional)
Pure Ghee (Clarified Butter) 1.5 teaspoon
Cashew nuts about 10-12 in small pieces (optional)
For Serving
Pure Ghee (Clarified Butter) or Coconut milk mixed with Jaggery, salt and cardamom powder
Instructions
1. In a pan, heat 1 teaspoon of ghee. Add Idli Rava / Semolina and roast it on low flame till it starts changing colour. Do not roast further.
2. Extract Jackfruit Pulp. If you are using Grinder to grind dry Bulbs of Jackfruit, add a tablespoon of semolina (from the semolina that you have roasted in step 1) while grinding. It makes it easier while grinding.
3. Grind together fresh scraped coconut and crushed Jaggery just enough to mix it together. Do not make a fine paste.
4. Mix together Idli Rava / Semolina, Jackfruit Pulp, coconut + jaggery mixture, salt, cardamom powder. Make a thick batter of dropping consistency.
5. Keep the mixture covered for 1 hour. In case required, add little water to make it of dropping consistency again. Add Baking Soda and Mix.
6. Boil water in a steamer. Grease a steaming plate with ghee. Pour the mixture in the greased plate to form about a cm thick layer; tap the plate to make a uniform layer. Steam for 15-20 minutes. Check if the batter is cooked properly by using a knife/ toothpick.
7. Leave the plate to come to room temperature. Cut into pieces of desired size.
8. For Baked Saandan / Dhondas, transfer the plate prepared in step 5 to a pre-heated oven on 200 degrees. Bake the mixture on 200 degrees for 25-30 minutes or till it gets light brown on the top. Or use a traditional Cake pot and roast it on Gas. Or Use a Pan / Wok for roasting Saandan / Dhondas.
9. Serve along with sweet coconut milk and / or pure ghee. It taste yummy.
Note
1. You can make Saandan using Cucumber or Mango also.
==================================================================================
फणसाचं सांदण / धोंडस
हा कोकण / गोव्याचा लोकप्रिय पदार्थ आहे. फणसाच्या मोसमात २–३ वेळा नक्कीच बनवला जातो. हे सांदण वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं. १. बरका (रसाळ) फणस वापरून आणि २. कापा फणस वापरून. कोकणात सांदण वाफवतात तर गोव्यात धोंडस भाजतात. कोकणात सांदण जेवणाबरोबर खातात तर गोव्यात धोंडस चहासोबत नाश्त्याला खातात. बरका फणस वापरला तर फणसाचा गर काढणं थोडं कटकटीचे काम असतं. पारंपरिक पद्धतीनुसार फणसाचे गरे चाळणीत घेऊन हाताने फिरवत राहिलं तर फणसाचा गर चाळणीतून खाली पडतो आणि चोथा चाळणीवर राहतो.मिक्सरमध्ये रस काढण्यासाठी गऱ्यासोबत थोडा रवा घालून वाटावा म्हणजे छान रस निघतो. कापा फणसाचे गरे मात्र मिक्सरमध्ये बारीक होतात. सांदण / धोंडस करताना फणसाच्या गरात भाजलेला रवा, ताजा नारळ, गूळ, किंचित मीठ घालून पीठ भिजवतात. आणि वाफवतात / भाजतात.
मी सांदणात चिमूटभर सोडा घालते. त्यामुळे सांदण छान फुलतं. तुम्हाला नको असेल तर सोडा घालू नका.
धोंडस तुम्ही ओव्हन मध्ये भाजू शकता किंवा पातेल्यात / कढईत भाजू शकता किंवा गॅसवर ठेवायचं केकचं भांडं असतं त्यात भाजू शकता. केकच्या भांड्यात भाजताना खाली बटर पेपर घातला तर धोंडस भांड्याला चिकटत नाही.
साहित्य (१ कप = २५० मिली)
फणसाचा गर / कापा फणसाचे गरे २ कप
तांदुळाचा जाडसर रवा / इडली रवा / जाडा रवा दीड कप
चिरलेला गूळ दीड – १ – दीड कप (फणसाच्या गोडीनुसार कमी / जास्त करा)
ताजा खवलेला नारळ १ कप
बेकिंग सोडा १ चिमूट
मीठ पाव टीस्पून
वेलची पूड पाव टीस्पून
साजूक तूप दीड टीस्पून
काजू १०–१२ लहान तुकडे करून (ऐच्छिक)
कृती
१. १ चमचा साजूक तूप घालून तांदुळाचा रवा / इडली रवा / जाडा रवा मंद आचेवर भाजून घ्या. जरा रंग बदलला की गॅस बंद करा.
२. कापा फणसाचे गरे भाजलेल्या रव्यातला १ टेबलस्पून रवा घालून मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.
३. खवलेला नारळ आणि गूळ मिक्सरमध्ये फिरवून घ्या. थोडं जाडसर मिश्रण झालं की पुरे.
४. एका पातेल्यात फणसाचा गर, भाजलेला रवा, नारळ गुळाचं मिश्रण , मीठ, वेलची घालून एकजीव करा. इडली च्या पिठासारखं मिश्रण होईल.
५. मिश्रण अर्धा तास झाकून ठेवा. मिश्रण जास्त घट्ट झालं तर थोडं पाणी घालून इडली च्या पिठासारखं करा. कधी कधी रवा जास्त फुलतो.बेकिंग सोडा घालून मिश्रण ढवळून घ्या.
६. एका ताटलीला साजूक तूप लावून हे मिश्रण घाला. सांदण वाफवायचं असेल तर इडली पात्रात पाणी उकळून त्यात ही ताटली ठेवून १५–२० मिनिटं वाफवून घ्या. सुरी टोचून सांदण शिजलं का ते चेक करा. सुरीला मिश्रण चिकटलं तर आणखी थोडा वेळ वाफवून घ्या.
७. सांदण भाजायचं असेल तर
१. ओव्हन २०० डिग्री ला प्रीहीट करून मिश्रणाची ताटली ओव्हन मध्ये ठेवून २५–३० मिनिटं भाजून घ्या.
२. कढई किंवा पातेल्यात वाळू किंवा मिठाचा थर द्या. कढई / पातेलं गरम करून घ्या. वाळू / मिठावर एक स्टॅन्ड ठेवून पीठ घातलेली ताटली ठेवा. कढई / पातेल्यावर झाकण ठेवून मंद आचेवर भाजून घ्या. २५–३० मिनिटं लागतील.
३. गॅसवर ठेवायच्या केकपात्रात बटर पेपर घाला. पेपर वर थोडं तूप लावा. केकपात्राच्या ताटलीत मिठाचा थर द्या. मिश्रण पात्रात घालून झाकण लावून २–३ मिनिटं मध्यम आचेवर भाजा. आणि नंतर मंद आचेवर २०–२५ मिनिटं भाजा.
सांदण वरून थोडं लालसर झालं पाहिजे आणि टोचलेल्या सुरीला मिश्रण चिकटू नये.
८. सांदण साजूक तुपाबरोबर किंवा नारळाच्या गोड रसाबरोबर खाल्लं जातं.
टीप
१. अशाच प्रकारे आंब्याचं आणि काकडीचं सांदण ही बनवतात.
Your comments / feedback will help improve the recipes