Instant Poha Idli (इन्स्टंट पोहा इडली) – Steamed Cake using Flattened Rice (No fermentation required)

Poha idli - Plain, Palak and Designer idli (पोहा इडली (साधी, पालकची आणि डिझायनर)

Instant Poha Idli (इन्स्टंट पोहा इडली)– Steamed Cake using Flattened Rice (No fermentation required)

इन्स्टंट पोहा इडली मराठी

When you want to try a different type of Idli, try Poha Idli. This is instant Idli does not require fermentation. This can be a quick and healthy breakfast option. These idlis are very soft, fluffy and super white. I added Palak (Spinach) puree and made Palak Idli and 2-in-1 Designer Idli also. But you can make plain Idli or add any other veggies.

Ingredients (Makes 24-25 Idlis) (1 cup = 250 ml)

Jada Poha (Thick Flattened Rice) 1 cup

Idli Rava (Coarse Rice Flour that is used for making Idli) 1 cup

Curd 1.5 cup

Salt to taste

Baking soda a pinch

Oil for greasing idli plates

For Palak Idli

Palak (Spinach) Leaves 10-12 along with tender stems

Cumin Powder ½ teaspoon

Crushed Chillies ½ teaspoon

Instructions

1. Wash Poha and soak in ½ cup curd. Add little water just enough to cover poha. Do not add too much water. Keep for 15 minutes.

2. Water would have soaked in Poha completely and Poha would be soft

3. Mash Poha using a blender or a beater

4. Add Idli rava and remaining curd. Add little water just enough to cover the mixture. Leave for 15 minutes.

5. Water would have soaked in the mixture completely.

6. Add salt. Add water if required to make idli (Pan cake) batter consistency.

7. If you want to make Palak Idli, wash Palak leaves, stems and cook in microwave without lid for 4 minutes on high power. Do not add any water. You can cook without microwave also; but just add as little water as possible while cooking.

8. On cooling, make Palak Puree using a blender.

9. Add Palak Puree, crushed chilies, cumin powder to the batter and mix.

10. For plain idlis, skip steps 7 to 9.

11. Heat Idli steamer. Grease Idli plates with oil.

12. Add baking soda to idli batter and mix. Quickly pour idli batter into Idli moulds and steam for 12-15 minutes.

13. Soft and Fluffy Idlis are ready. Serve with chutney and / or Sambar.

Poha idli – Plain, Palak and Designer idli
Poha idli – Plain, Palak and Designer idli

==================================================================================

इन्स्टंट पोहा इडली

नेहमीच्या इडली पेक्षा जरा वेगळी इडली हवी असेल तर ही पोहा इडली करून पहा. ह्या इडल्यांसाठी फार वेळ जिन्नस भिजवायला लागत नाहीत. अर्ध्या तासात इडल्या वाफवायला ठेवू शकता. पोह्याच्या इडल्या छान फुलतात, लुसलुशीत आणि पांढऱ्या शुभ्र होतात. मी पालक घालून ही थोड्या इडल्या बनवल्या. थोड्या डिझायनर इडल्या बनवल्या. तुम्ही साध्या किंवा दुसरी काही भाजी घालून ही बनवू शकता.

साहित्य (२४२५ इडल्यांसाठी ) (१ कप = २५० मिली )

जाडे पोहे १ कप

इडली रवा १ कप

दही दीड कप

बेकिंग सोडा १ चिमूट

मीठ चवीनुसार

तेल इडलीच्या साच्याला लावायला

पालक इडली साठी

पालक ची पानं १०१२ कोवळे देठ असतील तर तेही घ्या

जिरेपूड अर्धा टीस्पून

मिरची ठेचलेली अर्धा टीस्पून

कृती

. पोहे धुवून घ्या. त्यात अर्धा कप दही घाला. मिक्स करा. पोहे बुडतील एवढं पाणी घाला. १५ मिनिटं  झाकून ठेवा.

. आता पोहे छान नरम झाले असतील.

. पोहे  मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.

. त्यात इडली रवा घाला. उरलेलं दही घाला. मिश्रण बुडेल एवढं पाणी घाला. १५ मिनिटं झाकून ठेवा.

. मीठ घालून एकत्र करा.

. पालक इडली साठी पालक धुवून मायक्रोवेव्ह मध्ये ४ मिनिटं शिजवून घ्या. पाणी घालू नका. झाकण ठेवू नका. देठ असतील तर तेही पालकाच्या पानांबरोबर घाला. मायक्रोवेव्ह नसेल तर कमीत कमी पाणी घालून पालक शिजवून घ्या.

. गार झाल्यावर मिक्सर मध्ये पालक ची पेस्ट करून घ्या.

. त्यात जिरे पूड आणि मिरची घाला.

.तुम्ही अर्ध्या इडल्या साध्या , थोड्या पालकाच्या आणि थोड्या मिक्स डिझायनर इडल्या बनवू शकता. त्यानुसार इडलीचं पीठ आणि पालकची पेस्ट मिक्स करा.

१०. इडलीपात्रात पाणी गरम करून घ्या. इडलीच्या साच्याला तेल लावा.

११. इडलीच्यामिश्रणात सोडा घालून मिक्स करा. लगेच साच्यात घालून वाफवायला ठेवा.

१२. १२१५ मिनिटात इडल्या तयार होतील.

१३. चटणी, सांबार बरोबर गरम इडल्या सर्व्ह करा.

महत्वाची टीप

इडलीच्या साच्यामध्ये सगळ्या इडल्या एकदम होणार नसतील तर जेवढ्या इडल्या साच्यात मावतील तेवढ्या पिठातच सोडा घाला. उरलेल्या इडल्या करायच्या आधी त्या पिठात सोडा घाला. सोडा घालून लगेच वाफवायला ठेवलं नाही तर इडल्या दडदडीत होतील

Poha idli – Plain, Palak and Designer idli (पोहा इडली (साधी, पालकची आणि डिझायनर)
Poha idli – Plain, Palak and Designer idli (पोहा इडली (साधी, पालकची आणि डिझायनर)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes