Bitter Sweet Coffee Paratha (कॉफी पराठा) – Indian Bread stuffed with Bitter Sweet Coffee filling
I learnt this recipe from my friend. This is a very different kind of paratha that has a filling of instant coffee.
Coffee lovers will like this bitter and sweet parathas. It does not require many ingredients and can be a good breakfast / snack option. My family loves it. I make it often.
Ingredients (for 7-8 Parathas)
Rusks (Toasts that you get in bakery) 4 big size / 6 medium size
Instant Coffee powder 3 teaspoon
Bura sugar / Powdered sugar 5 teaspoon (adjust as per taste)
Milk 2-3 teaspoon
Salt 2 pinch
Wheat Flour for 7-8 parathas
Oil for dough
Ghee (clarified butter)/ oil for roasting parathas
Instructions
1. Crush rusks; add coffee powder, powdered sugar and a pinch of salt.
2. Add little milk at a time and mix. Make a mixture not too wet but you should be able to spread it easily. If it’s too wet, it will come out while rolling paratha.
3. Bind dough for Paratha. It should not be too soft.
4. Take a dough ball – little bigger than a big lemon.
5. Roll it into a circular shape (a big puri).
6. Spread a teaspoon of coffee mixture of the puri evenly.
7. Sprinkle some dry wheat flour over it.
8. Make a tight roll of this puri and then make a spiral. Seal the side of the spiral.
9. Roll the spiral into a little thick paratha.
10. Roast both sides on a non stick griddle using a few drops of ghee.
11. Serve with home made butter or ghee. It tastes super yummy.
==================================================================================
कॉफी पराठा
मी कॉफी बरोबर खायचा पराठा सांगत नाहीये. हा कॉफी चं सारण भरलेला पराठा आहे. विश्वास नाही बसत? मग ही रेसिपी वाचाच. कॉफी आवडणाऱ्या सर्वांना नक्कीच आवडेल हा गोड आणि थोडासा कडसर पराठा. माझ्या एका मैत्रिणीकडून मी ही रेसिपी शिकले. आमच्या घरी खूप आवडतो सर्वांना.
साहित्य (७–८ पराठ्यांसाठी)
बेकरीत मिळणारे टोस्ट (रस्क) ६ मध्यम आकाराचे
पिठीसाखर ५ चमचे (चवीप्रमाणे कमी/जास्त करा)
इन्स्टंट कॉफी पावडर ३ चमचे
दूध २–३ चमचे
मीठ २ चिमूट
कणिक ७–८ पराठ्यांसाठी
तेल कणिक भिजवायला
तूप / तेल पराठे भाजायला
सुकी कणिक पराठे लाटताना लावायला
कृती
१. सारण बनवण्यासाठी टोस्ट ची पावडर करून घ्या. एका वाडग्यात टोस्ट ची पावडर, पिठीसाखर, कॉफी पावडर आणि चिमूटभर मीठ घाला. मिक्स करा.
२. आता १–१ चमचा दूध घालून मिश्रण एकत्र करा. जास्त सैल नको. पराठ्यावर पसरता येईल इतपत सैल करा. कणिक, मीठ आणि तेल घालून भिजवून घ्या. फार सैल नको आणि फार घट्ट ही नको.
३. आता पराठे बनवण्याची कृती माझ्या बाकर पराठ्यासारखी आहे. तुम्हा सर्वांच्या सुविधेसाठी ती कृती इथे परत देत आहे.
४. कणकेचा लिंबाएवढा गोळा घ्या. त्याची जरा मोठी पुरी लाटा.
५. पुरीवर एक चमचा सारण पसरा. थोडी कणिक भुरभुरवा . सारण हलक्या हाताने पुरीवर दाबून घ्या.
६. ह्या पुरीचा एक रोल बनवा. रोल परत गोलाकार फिरवून गोल चक्र (spiral) बनवा.
७. आता हे गोल चक्र जाडसर लाटून पराठा बनवा.
८. गरम तव्यावर तूप/ तेल घालून पराठा दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.
९. चविष्ट कॉफी पराठा लोणी किंवा तुपाबरोबर खायला द्या.
Your comments / feedback will help improve the recipes