Narali Bhat (नारळी भात / नारळीभात) – Sweet Coconut Rice

Narali Bhat (नारळी भात)

Narali Bhat (नारळी भात / नारळीभात) – Sweet Coconut Rice

नारळी भात मराठी

This is one more delicacy from Konkan. It is generally made on Narali Pournima / Savan Poonam / Raksha Bandhan. It has fresh coconut and Jaggery. It is very easy to make and tastes delicious.

Ingredients (Serves 4) (1 cup = 200 ml)

Raw rice 2 cup (use rice with short grains like kolam or ambemohor; do not use Basmati rice)

Fresh scraped coconut 1+ ¼ cup

Jaggery crushed 2.5 cup

Cloves 5-6

Raisins 20-25

Almonds 20-25

Cashew 20-25

Saffron 2 pinches

Desi Ghee (Clarified Butter) 2 tablespoon

Salt a pinch

Milk ½ teaspoon to soak saffron

Instructions

1. Wash and drain rice and keep for 15 minutes

2. Soak Almonds in hot water; soak saffron in hot milk.

3. In a pan, add ½ teaspoon of desi Ghee, fry cashews and keep aside.

4. In the same pan, fry raisins and keep aside.

5. Add ½ teaspoon ghee to the pan. Add cloves to the pan and fry them. Keep cloves in the pan.

6. Add rice and sauté on low flame till rice gets dry.

7. Add 4 cup hot water, a pinch of salt and cook covered till rice is properly cooked. I used rice cooker to cook the rice. Rice should not be soggy. Let the cooked rice come to room temperature.

8. Peel almonds and chop into thin slices.

9. In a pan, add fresh scraped coconut and Jaggery. Cook on low flame stirring regularly till Jaggery melts and it forms a homogeneous mixture.

Coconut and Jaggery being cooked (नारळ आणि गुळाचं मिश्रण )

10. Add cooked rice and mix well.

Narali Bhat (नारळी भात)

11. Add cashew, almonds, raisins, saffron and mix well

12. Add remaining desi ghee; cook covered for 5 minutes on low flame.

Narali Bhat (नारळी भात)
Narali Bhat (नारळी भात)

13. Delicious Narali Bhat is ready. You can have it hot or cold. It tastes awesome.

Note

You can use Sugar instead of Jaggery. But rice made with Jaggery tastes better.

Narali Bhat (नारळी भात)
Narali Bhat (नारळी भात)

==================================================================================

नारळी भात / नारळीभात

नारळी पौर्णिमेनिमित्त खास कोकणातली रेसिपी. नारळी भात नारळ आणि गूळ घालून बनवलेला स्वादिष्ट पदार्थ आहे. अतिशय सोपी रेसिपी. पाक बनवायला नको; मुद्दाम काही जिन्नस आणायला नकोत. घरात नेहमी असणारे जिन्नस वापरून करून बघा हा नारळी भात.

साहित्य ( जणांसाठी) (१ कप = २०० मिली )

तांदूळ २ कप (बारीक दाण्याचा तांदूळ घ्या कोलम / आंबेमोहोर ; बासमती घेऊ नका )

ताजा खवलेला नारळ सव्वा कप

गूळ अडीच कप

बदाम २०२५

काजू   २०२५

बेदाणे (किसमिस ) २०२५

केशर २ चिमूट

दूध अर्धा टीस्पून

केशर भिजवायला

मीठ चवीनुसार

साजूक तूप २ टेबलस्पून

 

कृती

. तांदूळ धुवून निथळून १५ मिनिटं ठेवा.

. बदाम गरम पाण्यात भिजवून ठेवा ; केशर गरम दुधात भिजवून ठेवा.

. एका पातेल्यात अर्धा चमचा तूप घालून त्यात काजू मंद आचेवर तळून घ्या. ताटलीत काढून ठेवा

. त्याच तुपात बेदाणे (किसमिस) तळून घ्या आणि ताटलीत काढून ठेवा.

. पातेल्यात आणखी अर्धा चमचा तूप घालून लवंगा घालून तळून घ्या. लवंगा बाहेर काढू नका

. त्यातच तांदूळ घालून सुके होईपर्यंत परतून घ्या.

. आता पातेल्यात ४ कप गरम  पाणी घाला. चिमूटभर मीठ घालून भात शिजवून घ्या. मी राईस कुकर मध्ये भात शिजवते. भात छान मोकळा झाला पाहिजे. भात गार होऊ द्या.

. बदाम सोलून त्याचे पातळ तुकडे करून घ्या.

. एका कढईत नारळ आणि गूळ घालून मंद आचेवर  शिजवा. मिश्रण एकजीव झाले की त्यात शिजलेला भात घाला.

Coconut and Jaggery being cooked (नारळ आणि गुळाचं मिश्रण )
Narali Bhat (नारळी भात)

१०. भातात बदाम, काजू, बेदाणे, केशर घालून मिक्स करा.

११. उरलेले तूप घालून झाकण ठेवून मंद आचेवर ५ मिनिटं शिजवा.

Narali Bhat (नारळी भात)
Narali Bhat (नारळी भात)

१२. स्वादिष्ट नारळी भात तयार आहेगरम किंवा गार कसाही खाऊ शकता.   

टीप

नारळी भात गुळाऐवजी साखर घालून ही बनवू शकता. पण गूळ घालतेला भात जास्त चविष्ट लागतो

Narali Bhat (नारळी भात)
Narali Bhat (नारळी भात)

3 Comments

Your comments / feedback will help improve the recipes