Vangi Batata Shenga Bhaaji (वांगी बटाटा शेंगांची भाजी ) – Brinjal, Potato and Drumsticks Subji
वांगी बटाटा शेंगांची भाजी मराठी
This is a Maharashtrian recipe with Goda Masala, Tamarind and Jaggery. It’s a very easy and quick recipe that makes very tasty Subji. This is a no Onion Garlic subji.
Ingredients (Serves 4)
Brinjal Purple / Green Small about 300 gms
Potatoes 2 medium size
Drumstick 1
Goda Masala 1 teaspoon
Tamarind (Imli) Pulp 1 tablespoon
Crushed Jaggery 1-2 tablespoon (adjust as per taste)
Chili Powder ½ – 1 teaspoon (adjust as per taste)
Fresh Scraped Coconut 1 tablespoon
Chopped coriander 1 tablespoon
Sesame Seeds 1 tablespoon
Salt to taste
Oil 1 teaspoon
Mustard Seeds ½ teaspoon
Turmeric Powder ½ teaspoon
Asafoetida 2 pinch
Instructions
1. Wash and chop Brinjal into medium size pieces; soak in water to avoid from turning it black
2. Wash and chop Potatoes into medium size pieces (similar to Brinjal pieces); soak in water. I don’t peel potatoes; If you want you can peel and then cut.
3. Wash and cut drumstick into 2 inch pieces
4. Cook Drumstick pieces in water with a pinch of salt; do not cover the pan; when drumstick is soft, it’s cooked. Switch off the gas and keep drumsticks aside along with the left over water that you added while cooking.
5. In a pan, roast sesame seeds on low flame till they start to splutter; take them out to a plate; on cooling roughly crush the seeds.
6. In a pan heat oil. Add Mustard seeds; wait for splutter; add Turmeric powder; add Asafoetida.
7. Turn flame to low; Add Potato pieces; mix and cook covered for 2 minutes – do not add water
8. Stir and cook covered for another 2 minutes – do not add water
9. Add Brinjal pieces. Mix and cook covered for 2 minutes – do not add water
10. Stir and cook covered for 2 minutes – do not add water
11. Now add water to cover ½ the ingredients; let the water boil
12. Add Goda masala, Tamarind pulp, Jaggery, Salt, Chili powder and Scraped fresh coconut.
13. Cook covered till both Brinjal and Potatoes are almost cooked; keep stirring after every 3-4 minutes; add more water if subji gets very dry. This subji has little gravy.
14. Add cooked drumsticks; add chopped coriander; add ground sesame seeds.
15. Now cook till Brinjal and potatoes are cooked. Tasty subji is ready.
Serve hot with Roti or Rice.
Note:
1. You can add Fresh Val Papdi beans (वालाचे दाणे) – Indian flat beans to this subji. For this pressure cook the beans separately and add along with drumsticks.
2. If you want, you can skip Sesame seeds. But the gravy will not be thick then.
==================================================================================
वांगी बटाटा शेंगांची भाजी – कांदा लसूण विरहित सात्विक भाजी
ही कोकणातली लोकप्रिय भाजी गोडा मसाला आणि चिंच, गूळ घालून करतात. अतिशय सोपी, पटकन होणारी आणि चविष्ट अशी ही भाजी आहे. कांदा लसूण न घालून केलेली ही भाजी छान लागते.
साहित्य (४ जणांसाठी )
वांगी (जांभळी / हिरवी छोटी) ३०० ग्राम
बटाटे २ मध्यम
शेवग्याची शेंग १
गोडा मसाला १ चमचा
चिंचेचा कोळ १ चमचा
गूळ १–२ मोठे चमचे
लाल तिखट अर्धा – एक चमचा
खवलेला नारळ १ मोठा चमचा
चिरलेली कोथिंबीर १ मोठा चमचा
तीळ १ मोठा चमचा
तेल १ चमचा
मोहरी अर्धा चमचा
हळद अर्धा चमचा
हिंग २ चिमूट
मीठ चवीनुसार
कृती
१. वांगी धुवून देठ आणि देठाकडचा हिरवा भाग काढून टाका. मध्यम आकाराचे तुकडे करून पाण्यात ठेवा.
२. बटाटे धुवून मध्यम आकाराचे तुकडे करून पाण्यात ठेवा. मी बटाट्याची सालं काढत नाही. तुम्ही हवं असेल तर सालं काढून तुकडे करा.
३. शेवग्याची शेंग धुवून २ इंच लांबीचे तुकडे करा. थोड्या पाण्यात चिमूटभर मीठ घालून शेंगा पाण्यात घालून शिजवून घ्या.
४. एका पातेल्यात तीळ भाजून घ्या. खमंग भाजले की ताटलीत काढून गार करा आणि मिक्सर मध्ये जाडसर कुटून घ्या.
५. त्याच पातेल्यात तेल घालून मोहरी, हळद आणि हिंगाची फोडणी करा.
६. फोडणीत बटाट्याच्या फोडी घालून परता. पाणी न घालता२ मिनिटं झाकण ठेवून वाफवून घ्या.
७. एकदा ढळवून परत २ मिनिटं झाकण ठेवून वाफवून घ्या.
८. आता वांग्याच्या फोडी घालून परतून घ्या. पाणी न घालता२ मिनिटं झाकण ठेवून वाफवून घ्या.
९. एकदा ढळवून परत २ मिनिटं झाकण ठेवून वाफवून घ्या.
१०. आता पातेल्यात भाजी अर्धी बुडेल एवढं पाणी घाला. त्यात गोड मसाला, चिंच, गूळ, लाल तिखट, नारळ आणि मीठ घालून मिक्स करा.
११. भाजी झाकण ठेवून शिजवा. मधे मधे ढवळत रहा. भाजी जास्त सुकी झाली असेल तर थोडं पाणी घाला. ह्या भाजीला थोडा रस असतो.
१२. भाजी शिजत आली की शेंगा, कोथिंबीर आणि तिळाचं कूट घाला. एकदा ढवळून भाजी शिजवा.
१३. चविष्ट भाजी तयार आहे. पोळी / भाकरी बरोबर गरमगरम भाजी खायला द्या.
टीप
१. ह्यात तुम्ही वालाच्या शेंगांचे दाणे ही घालू शकता. दाणे प्रेशर कुकर मध्ये वाफवून घ्या आणि वर लिहिलेल्या कृतीत शेंगांबरोबर हे दाणे घाला.
२. जर आवडत नसेल तर तिळाचं कूट नाही घातलं तरी चालेल. फक्त भाजीचा रस जरा पातळ होईल.
What we can use instead of goda masala
There is no substitute for Goda Masala. It’s easily available in shops as well as online stores. Bedekar, K-pra, Suhana are the popular brands that sell Goda Masala.\nSudha