Rava Cake – Tupachya Bericha Cake (रव्याचा केक – तुपाच्या बेरीचा केक) – Eggless Semolina Cake with Ghee Sediments
रव्याचा केक – तुपाच्या बेरीचा केक मराठी
In India, making Clarified Butter (Ghee) at home is a normal practice. Ghee is an important element of Indian Cuisine. When Ghee is made at home from Butter, Ghee Sediments (residue) – Tupachi Beri as we call it in Marathi – is a by-product. Since I make Ghee once in 8-10 weeks, I get a good amount of Beri every time. Apart from adding it to Pan Cakes and Different Types of Rice, I also bake a cake using this Beri and Semolina. It’s an easy recipe that makes this delicious Eggless Cake.
You can make it without Ghee sediments also. Add 1.5 to 2 tablespoon of Ghee instead of Ghee sediments.
Ingredients
Fine Semolina 1.5 cups
Sugar 1 cup
Milk 1 cup
Curd (Dahi / Yogurt) 1 cup
Tupachi Beri (Ghee Sediments) 1 cup (or whatever is available)
Baking powder ½ teaspoon
Baking soda ¼ teaspoon
Salt ¼ teaspoon
Cardamum Powder ¼ teaspoon
Pure Ghee for greasing
Instructions
1. Mix Semolina, Sugar, Milk, Curd, Tupachi Beri together in a bowl. (You can use the same pan that you used from making pure Ghee).
2. Keep the mixture for 8 hours.
3. Mix in Baking Powder, Baking Soda, Salt and Cardamom powder.
4. Grease a baking tray.
5. Pour the mixture in baking tray. Gently Tap the baking tray on kitchen platform so that the mixture levels and air bubbles are removed.
6. Bake at 210 degree centigrade (Pre-heated for 10 minutes) for 25-30 minutes till cake is cooked.
7. On cooling cut in desired shape pieces and serve.
8. This cake can be stored for 2 days at room temperature. If you want to store longer, store in refrigerator.
Note
1. If you are using Ghee instead of Ghee sediments, add 1.5 to 2 tablespoon of Ghee instead of Ghee sediments in step 1.
2. It will take 45-50 minutes to bake this cake in Pre-heated Pan. Check the cake after 45 minutes by inserting a toothpick. If not done, bake further and check after every 8-10 minutes.
3. Colour of the cake will depend on the colour of Ghee sediments. My Ghee Sediments are dark brown and hence the colour of the cake.
4. You can add dry fruits of your choice. But this cake is so delicious as it is; you really don’t need any dry fruits.
==================================================================================
रव्याचा केक (तुपाच्या बेरीचा केक) – बिन अंड्याचा केक
घरी तूप कढवल्यावर तुपाच्या बेरीचं काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. मी ८–१० आठवडयांनी तूप कढवते त्यामुळे नेहमी बऱ्यापैकी बेरी येते. आणि हल्ली लहानपणासारखं बेरी खाणं ही होत नाही. मग कणिक भिजवायला बेरीचं पाणी, बेरी धिरड्यात / थालीपीठात घालून, बेरी पुलावात घालून संपवावी लागते. बेरीचे आणखी २ प्रकार मी बनवते ते म्हणजे बेरीचा रवा केक आणि बेरीची नानखटाई. दोन्ही पदार्थ अप्रतिम लागतात. तसंच सगळ्या प्रकारच्या लाडवांमध्ये ही बेरी घालून लाडू खमंग होतात. आजची रेसिपी बेरीच्या रवा केकची. ओव्हन नसेल तर हा केक कढई / पातेल्यात ही भाजू शकता. बेरी नसेल तर खाली दिलेल्या प्रमाणात दीड ते दोन टेबलस्पून तूप घालून हा केक बनवू शकता.
साहित्य (१ कप = २५० मिली )
बारीक रवा दीड कप
दूध १ कप
साखर १ कप
दही १ कप
तुपाची बेरी १ कप (जेवढी असेल तेवढी)
मीठ पाव चमचा
बेकिंग सोडा पाव चमचा
बेकिंग पावडर अर्धा चमचा
वेलची पावडर पाव चमचा
तूप – केक च्या ट्रे ला लावण्यासाठी
कृती
१. एका वाडग्यात मध्ये रवा, दूध, साखर, तुपाची बेरी, दही मिक्स करून ८ तास झाकून ठेवा. मिश्रण भिजवण्यासाठी तुम्ही तूप कढवलेलं पातेलं ही वापरू शकता.
२. मिश्रणात बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, मीठ आणि वेलची पावडर घालून मिक्स करा.
३. केक च्या ट्रे ला तूप लावून त्यात मिश्रण घाला. ट्रे ओट्यावर हलकेच आपटून घ्या म्हणजे पिठात हवेचे बुडबुडे असतील तर निघून जातील.
४. ओव्हन २१० डिग्री सेन्टिग्रेड वर १० मिनिटं प्री–हीट करून केक २५–३० मिनिटं भाजून घ्या. टूथपीक घालून चेक करा.
५. केक थंड झाला की आवडीच्या आकाराचे तुकडे कापून खायला द्या.
६. हा केक फ्रिज बाहेर २ दिवस राहतो. जास्त दिवस ठेवायचा असेल तर फ्रिज मध्ये ठेवा.
टीप
१. तुपाच्या बेरीऐवजी तूप घालायचं असेल तर दीड ते दोन टेबलस्पून तूप घाला आणि बाकी साहित्याबरोबर स्टेप १ मध्ये सांगितल्याप्रमाणे मिश्रणात मिक्स करा.
२. कढई / पातेल्यात केक भाजायचा असेल तर प्री हीटेड कढई / पातेल्यात ४५–५० मिनिटं केक भाजा. ४५ मिनिटानंतर चेक करा. केक भाजला नसेल तर आणखी थोडा वेळ भाजा आणि प्रत्येक १० मिनिटांनी चेक करा.
३. केक चा रंग बेरीच्या रंगानुसार बदलेल. माझी तुपाची बेरी डार्क ब्राऊन असते म्हणून केक चा रंग डार्क असतो.
४. हवं असेल तर सुके मेवे घालू शकता. पण हा केक असाच एवढा स्वादिष्ट लागतो की सुक्या मेव्याची जरूर नाही.
तुमची website बघूनच इतकी खात्री वाटत आहे की नक्की बनविन मी.
माझ्या मध्ये नवीन confidence आलाय की आपण cake बनवू शकतो.
बेरी चा cake बनवला की नक्की कळविन.
Thank you!!
नक्की करून बघा. खूप छान होतो.
Sudha
८ तास बाहेर भिजवायचा का Fridge मध्ये?
बाहेर ठेवायचा.
Sudha
Khup chhan
Thank you Smita.
Super delicious and healthy\r\nOne cup means how many grams?
Dear Manisha, \nCup to grams differs for ingredients. It is better to use standard measures for cups and spoons. If a recipe mentions both cups & grams, it’s better to follow one measure consistently for all ingredients.\nSudha