Chinchech Vangyache Bharit (चिंचेचं वांग्याचं भरीत ) – Baingan Bharata with Tamarind
This is a variation of popular Indian dish Baingan Bharata. This is not so popular maybe because it is not served in restaurants. The first step in this recipe also is to roast the Brinjal. Raw chopped onion and Tamarind Pulp is added to Brinjal along with Green Chilies. There is no cooking after Brinjal roasting but you can pour hot oil with mustard seeds (Tempering) if you like. It’s an easy recipe that makes yummy Bharata of a different taste. One more variation of this recipe is to make Bharata with Curd. Details are provided in the Note at the end of this recipe.
Ingredients (Serves 4)
Big Brinjal 3 medium size (I generally use Brinjals with dark skin but you can also use the green ones)
Onion 2 medium finely chopped
Tamarind Pulp 1 tablespoon
Chili Paste ½ teaspoon
Scraped fresh coconut 1 tablespoon
Chopped coriander 2 teaspoon
Sugar ½ to 1 teaspoon (Adjust as per taste)
Salt to taste
For Tempering (optional)
Oil 1 tablespoon
Mustard Seeds ¼ teaspoon
Cumin Seeds ¼ teaspoon
Asafoetida a pinch
Instructions
1. Wash Brinjals and wipe with kitchen tissue, remove the green part around the stem; do not cut the stem. Apply little oil on the skin of Brinjal and roast it on direct gas flame till the skin gets dark. Once one side is roasted, Rotate brinjal and roast other sides. Leave to cool.
2. Peel off Brinjals; taste Brinjals individually. If Brinjal is bitter don’t use it. Mash the flesh with help of a spoon. You can hold brinjal using the stem while peeling. After mashing Brinjal, discard the stem.
3. Transfer Brinjal Flesh in a bowl. Add Chopped onion, Chili Paste, Tamarind Pulp, Salt, Sugar, Coconut and Coriander. Mix well.
4. If you want to add Tempering then In a laddle, heat oil. Add mustard seeds, wait for splutter; add cumin seeds, wait for splutter. Add Asafoetida and pour this tempering on Brinjal mixture.
5. Delicious Baingan Bharata is ready. Serve with Roti / Bhakari (Indian Bread).
Note
1. There is another variation of Baingan Bharata – made using Curd (Yogurt). Use the above recipe expect for Tamarind Pulp. Mix Curd to Bharata just before serving. This Bharata also tastes yummy. In this variation also Tempering is optional.
====================================================================================
चिंचेचं वांग्याचं भरीत
खमंग भाजलेल्या वांग्याचं भरीत बहुतेक सगळ्यांना आवडतं. कांदा, टोमॅटो घालून केलेलं भरीत सगळ्यांना माहित आहे कारण रेस्टॉरंट मध्ये ते ‘बैंगन भरता‘ ह्या नावानी मिळतं. ही जरा वेगळी रेसिपी आहे ज्यात वांगं भाजल्यानंतर शिजवत नाहीत. सगळे जिन्नस एकत्र करून वरून हवी असेल तर फोडणी देतात. फोडणी नाही दिली तरी भरीत छान लागतं. भरताचा आणखी एक प्रकार म्हणजे दही घालून केलेलं भरीत. माहितीसाठी ह्या रेसिपीच्या शेवटी दिलेली टीप वाचा.
साहित्य (४ जणांसाठी)
भरताची वांगी ३ मध्यम आकाराची (जांभळी किंवा हिरव्या सालीची – कुठलीही चालतील)
चिंचेचा कोळ १ टेबलस्पून
कांदे २ मध्यम बारीक चिरून
ठेचलेली हिरवी मिरची अर्धा टीस्पून
ताजा खवलेला नारळ १ टेबलस्पून
चिरलेली कोथिंबीर २ टीस्पून
साखर अर्धा ते १ टीस्पून (चवीनुसार कमी /जास्त करा)
मीठ चवीनुसार
फोडणीसाठी (ऐच्छिक)
तेल १ टेबलस्पून
मोहरी पाव टीस्पून
जिरं पाव टीस्पून
हिंग चिमूटभर
कृती
१. वांगी धुवून पुसून घ्या. देठालगतच्या हिरव्या पाकळ्या काढून टाका. देढ कापू नका. वांगी भाजताना देढाला धरून फिरवता येतात. वांग्यांना २ थेम्ब तेल लावून डायरेक्ट गॅसवर भाजून घ्या. सर्व बाजूनी साल काळी होईपर्यत भाजा.
२. थंड झाल्यावर सालं काढून टाका. प्रत्येक वांगं चाखून बघा. एखादं वांगं कडू असेल तर भरीत कडू होतं.
३. एका हाताने वांग्याचा देढ धरून चमच्याने वांग्याचा गर कुस्करून घ्या. आता देढ काढून टाका.
४. वांग्याचा गर एका वाडग्यात घ्या. त्यात कांदा, हिरवी मिरची, चिंचेचा कोळ, मीठ, साखर, नारळ , कोथिंबीर घालून नीट मिक्स करा.
५. फोडणी द्यायची असेल तर एका छोट्या कढईत तेल घालून मोहरी, जिरे आणि हिंगाची फोडणी करा.वांग्याच्या मिश्रणावर ही फोडणी ओतून मिक्स करा.
६. वांग्याचं चविष्ट भरीत तयार आहे. भरीत पोळी / भाकरी सोबत खायला द्या.
टीप
१. भरताचा आणखी एक प्रकार म्हणजे दही घालून केलेलं भरीत. त्यासाठी वरच्या रेसिपीत चिंच घालू नका. खायला देताना भरतात घट्ट दही घालून मिक्स करा. दह्याचं भरीत ही खूप छान लागतं.
Your comments / feedback will help improve the recipes