Gulgule in Appe Pan (गुलगुले – आप्पे पात्रात बनवलेले) – Delicious and Healthy version of a traditional sweet

Gulgule in Appe Pan (गुलगुले - आप्पे पात्रात बनवलेले)

Gulgule in Appe Pan (गुलगुले आप्पे पात्रात बनवलेले) – Delicious and Healthy version of a traditional sweet

गुलगुले मराठी

Gulgule is a traditional Sweet from Eastern, Central and Northen parts of India. They are also called Sweet Pue (स्वीट पुए). I’d not tasted this till a few years back, as this is not popular in Konkan. Main ingredients of Gulgule are Wheat Flour and Jaggery. Fennel Seeds (Saunf) or Cardamom (Eliachy) is used for flavour. Traditionally Gulgule are deep fried balls (like Doughnuts). This is a healthy version of Gulgule where they are roasted in Appe Pan (Paniyaram Pan) with ghee. Gulgule are mild sweet and taste delicious. You can have them as Snack or Sweet as a part of Meal. Gulgule with Mashed Banana added to batter are also common. Try these Gulgule. They taste awsome.

Ingredients (Makes 10-12 Gulgule) (1 cup = 250ml)

Wheat Flour 1 cup

Crushed Jaggery 3-4 Tablespoon (Adjust as per taste)

Crushed Fennel Seeds (Saunf) ¼ teaspoon

Sesame Seeds ½ teaspoon

Baking Soda a pinch

Salt a pinch

Pure Ghee (Clarified Butter) 3 teaspoon + required while roasting Gulgule

Instructions

1. Dissolve Jaggery in ½ cup water.

2. In a bowl, mix Wheat Flour, Salt, Fennel Seeds, Sesame Seeds, Ghee and Baking soda.

3. Add Jaggery water and mix.

4. Add little water at a time to make batter of dropping consistency.

5. Preheat Appe Pan; Grease each mould with little ghee.

6. Fill each mould with batter till the brim.

7. Cook covered on low flame for 3-4 minutes til the upper layer of batter dries.

8. Flip Appe with help of 2 spoons. Add a few drops of Ghee over each mould.

9. Cook for 2-3 minutes till both sides are golden brown. Colour of Gulgule depends on the colour of Jaggery used.

10. Serve hot Gulgule with Generous helping of Pure Ghee.

Gulgule in Appe Pan (गुलगुले – आप्पे पात्रात बनवलेले)
Gulgule in Appe Pan (गुलगुले – आप्पे पात्रात बनवलेले)
      ===================================================================================

गुलगुले आप्पे पात्रात बनवलेले स्वादिष्ट आणि पौष्टिक

गुलगुले हा उत्तर, मध्य  आणि पूर्व भारतातला पारंपारिक गोड पदार्थ आहे. ह्याला स्वीट पुए असं ही म्हणतात. कोकणात / मुंबईत फारसा प्रचलित नसल्यामुळे मी दोन तीन वर्षांपूर्वीपर्यंत हा पदार्थ खाल्ला नव्हता. गव्हाचं पीठ आणि गूळ हे मुख्य जिन्नस असतात गुलगुले मध्ये. बडीशेप किंवा वेलची स्वादासाठी घालतात. पारंपारिक गुलगुले हे तळलेले असतात (डोनट सारखे). ह्या रेसिपीत गुलगुले आप्पे पात्रात बनवून त्यांना पौष्टिक बनवलं आहे. गुलगुले हलके गोड आणि स्वादिष्ट असतात. तुम्ही ते नाश्त्याला किंवा जेवणात पक्वान्न म्हणून खाऊ शकता. मात्र  बरोबर साजूक तूप हवंच. कुस्करलेलं केळे घालून बनवलेले गुलगुले ही लोकप्रिय आहेत. हे स्वादिष्ट आणि पौष्टिक गुलगुले नक्की करून बघा

साहित्य (१०१२ गुलगुले बनवण्यासाठी) (१ कप = २५० मिली )

गव्हाचे पीठ १ कप

चिरलेला गूळ टेबलस्पून (जसं गोड हवं असेल त्याप्रमाणे कमी /जास्त करा)

जाडसर कुटलेली बडीशेप पाव चमचा

तीळ अर्धा चमचा

बेकिंग सोडा चिमूटभर

मीठ चिमूटभर

साजूक तूप ३ चमचे + गुलगुले भाजताना लागेल ते

कृती

. अर्धा कप पाण्यात गूळ विरघळवून घ्या.

. एका बाउल मध्ये गव्हाचं पीठ, मीठ, बडीशेप, तीळ, बेकिंग सोडा आणि ३ चमचे तूप घाला.

. गुळाचं पाणी बाउल मध्ये घालून मिक्स करा. गुठळ्या होऊ देऊ नका. आता थोडं थोडं साधं पाणी घालून इडलीच्या पिठासारखं पीठ भिजवा. पीठ चमच्याने नीट पडलं पाहिजे (dropping consistency).

. आप्पे पात्र गरम करून घ्या.

. प्रत्येक साच्यात  थोडं तूप लावून घ्या. चमच्याने पीठ आप्पे पात्राच्या साच्यात कडेपर्यंत घाला.

. आप्पे पात्रावर झाकण ठेवून मंद आचेवर मिनिटं भाजून घ्या. वर ओलं पीठ दिसलं तर अजून थोडं भाजा.

. गुलगुले चमच्याच्या साहयाने परता. दोन चमचे घेऊन सहज परतता येतात. थोडं तूप सोडा आणि दुसरी बाजू ही खरपूस भाजून घ्या. गुलगुल्यांचा रंग गुळाच्या रंगावर अवलंबून आहे. मी सेंद्रिय गूळ वापरते त्यामुळे गुलगुले गडद ब्राउन रंगाचे होतात.

. गरमागरम गुलगुले साजूक तुपाबरोबर सर्व्ह करा.     

Gulgule in Appe Pan (गुलगुले – आप्पे पात्रात बनवलेले)
Gulgule in Appe Pan (गुलगुले – आप्पे पात्रात बनवलेले)

2 Comments

Your comments / feedback will help improve the recipes