Shenganchi Peeth Perun Bhaaji (शेंगांची पीठ पेरून भाजी) – Drumsticks subji
You would have seen Drumsticks being used in Aamti / Zunka / Pithale. But in Konkan region of Maharashtra, we also make subji using drumsticks. This subji was my Mother’s specialty. It’s an easy recipe to make a tasty dry subji. This is a No Onion Garlic Recipe.
Ingredients (Serves 3)
Drumsticks 3
Gram flour (Besan) 2-3 tablespoon
Rice flour 1-2 tablespoon
Thalipeeth Bhajani 2 tablespoon (if you don’t have this, increase Gram Flour and rice flour)
Chili Powder ½ teaspoon
Goda Masala 1 teaspoon
Mango Powder (Aamchoor) ½ teaspoon
Fresh scraped coconut 2 teaspoon
Chopped Coriander 1 teaspoon
Salt to taste
Sugar ½ teaspoon
Oil 1 tablespoon
Mustard Seeds ¼ teaspoon
Cumin Seeds ¼ teaspoon
Turmeric Powder ½ teaspoon
Asafoetida 2 pinch
Instructions
1. Wash and cut Drumsticks in 3-4 inch pieces.
2. In a pan, heat oil. Add mustard seeds; wait for splutter; add Cumin Seeds, wait till sputter; add Turmeric Powder and Asafoetida.
3. Add drumsticks; saute.
4. Cook covered on low flame for 5 minutes without adding water. Stir in between once / twice.
5. Now add 1 cup water. Cook covered till Drumsticks are little soft. Add more water if required. Don’t overcook.
6. Add Chili Powder, Mango Powder, Goda Masala, Salt and Sugar. Mix.
7. Add Gram Flour, Rice flour and Thalipeeth Bhajani. Mix well.
8. Sprinkle some water and cook covered till drumsticks are cooked. This is a dry subji; so don’t add too much water. Add just enough to cook flour and drumsticks. Drunsticks should not be overcooked.
9. Add fresh scraped coconut and chopped coriander and serve hot with Roti / Bhakari / Curd Rice.
===================================================================================
शेंगांची पीठ पेरून भाजी – शेवग्याच्या शेंगाची खमंग भाजी
पीठ पेरून बनवलेल्या भाज्यांमध्ये शेवग्याच्या शेंगाची भाजी कोकणात लोकप्रिय आहे. नेहमी घरात असणारं साहित्य वापरून – कांदा लसूण न वापरता – केलेली ही भाजी अतिशय चविष्ट लागते. माझी आई ही भाजी अतिशय सुंदर करायची. अगदी सोपी आणि झटपट होणारी खमंग भाजी आहे.
साहित्य (३ जणांसाठी)
शेवग्याच्या शेंगा ३
बेसन २–३ टेबलस्पून
तांदुळाचं पीठ १–२ टेबलस्पून
थालीपीठ भाजणी २ टेबलस्पून (भाजणी नसेल तर बेसन आणि तांदुळाचं पीठ वाढवा)
लाल तिखट अर्धा टीस्पून
आमचूर अर्धा टीस्पून
गोडा मसाला १ टीस्पून
ताजा खवलेला नारळ २ टीस्पून
चिरलेली कोथिंबीर १ टीस्पून
मीठ चवीनुसार
साखर अर्धा ते एक टीस्पून
तेल १ टेबलस्पून
मोहरी पाव टीस्पून
जिरं पाव टीस्पून
हळद अर्धा टीस्पून
हिंग २ चिमूट
कृती
१. शेवग्याच्या शेंगा धुवून ३–४ इंच लांबीचे तुकडे करा.
२. एका कढईत तेल घालून मोहरी, जिरं, हळद आणि हिंगाची फोडणी करा.
३. फोडणीत शेंगांचे तुकडे घाला. एकदा परतून पाणी न घालता झाकण ठेवून मंद आचेवर ५ मिनिटं वाफ काढा. मधे मधे एक दोनदा ढवळा.
४. कढईत १ कप पाणी घाला. झाकण ठेवून मंद आचेवर शेंगा जरा नरम होईपर्यंत शिजवून घ्या. जास्त शिजवू नका.
५. आता लाल तिखट, आमचूर, गोडा मसाला, मीठ आणि साखर घालून ढवळा.
६. बेसन, तांदुळाचं पीठ आणि थालीपीठ भाजणी सुकीच घाला आणि नीट ढवळून घ्या.
७. पाण्याचा हबका मारून झाकण ठेवून पीठ शिजेपर्यंत वाफ काढा. आता शेंगाही शिजल्या असतील.
८. खवलेला नारळ आणि कोथिंबीर घालून एकदा ढवळून गॅस बंद करा.
९. शेंगांची गरम गरम चविष्ट खमंग भाजी पोळी / भाकरी / दही भातासोबत खायला द्या.
Your comments / feedback will help improve the recipes