Fodnicha Bhaat / Fodnicha Bhat (फोडणीचा भात) – Tempered Rice

Fodnicha Bhaat / Fodnicha Bhat (फोडणीचा भात)
Fodnicha Bhaat / Fodnicha Bhat (फोडणीचा भात)

Fodnicha Bhaat / Fodnicha Bhat (फोडणीचा भात) – Tempered Rice

फोडणीचा भात मराठी

This Rice is generally made with Left over rice. This is an easy and tasty makeover of Left Over Rice. The recipe is very similar to that of Kande Pohe. This can be a quick breakfast or snack or as a rice dish in a meal.

Ingredients (Serves 4) (1 cup = 250 ml)

Raw Rice 1 cup

Onions 2 medium finely chopped

Potato 1 medium (optional)

Green Chilies 3-4

Lemon Juice ½ teaspoon

Sugar ½ teaspoon (adjust as per taste)

Scrapped Fresh coconut 2 tablespoon (optional)

Chopped coriander 2 tablespoon

Oil 1 tablespoon

Mustard Seeds ½ teaspoon

Cumin Seeds ½ teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Asafoetida a pinch

Curry Leaves 8-10

Salt to taste

Instructions

1. Cook rice and leave it to cool. Ensure that the Rice is not sticky and has no lumps. If you have left over Rice, loosen it.

2. Wash Potato and cut into 4 pieces. Chop into thin slices. You can peel the potato before cutting. But I use it without peeling.

3. In a pan, heat oil on medium flame.

4. Add mustard seeds, wait for splutter; add cumin seeds, wait for splutter. Add Asafoetida, green chilies (slit lengthwise) and curry leaves.

5. Add Onions and Turmeric powder. Saute for 2-3 minutes.

6. Add Potato; mix. Cook covered for 2 minutes on low flame.

7. Add 2 pinches of salt; mix. Cook covered till Potatoes are cooked.

8. Add cooked Rice to the pan. Mix.

9. Add Salt, sugar and lemon juice. Sprinkle some water, Mix and Cook covered for 3-4 minutes.

10. Check the texture of Rice. If it’s too dry, sprinkle some more water and cook covered.

11. Add fresh coconut and coriander. Mix.

12. Yummy Fodnicha Bhaat is ready. Serve hot.

Fodnicha Bhaat / Fodnicha Bhat (फोडणीचा भात)
Fodnicha Bhaat / Fodnicha Bhat (फोडणीचा भात)
Fodnicha Bhaat / Fodnicha Bhat (फोडणीचा भात)
Fodnicha Bhaat / Fodnicha Bhat (फोडणीचा भात)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

फोडणीचा भात

फो चा भाआणि फो ची पोहे शिळ्या भाताचे, शिळ्या पोळीचे चविष्ट प्रकार आहेत. हल्लीच्या भाषेत सांगायचं तर शिळ्या पदार्थाचा मेकओव्हर!! फोडणीचा भात मी कांदे पोह्यांसारखा करते. रोजच्या जेवणात आमच्याकडे भात अगदी कमी असतो त्यामुळे फोडणीचा भात करायला शिळा भात उरतच नाही. म्हणून कधी कधी  मी सकाळी मुद्दाम जास्त भात लावून रात्रीच्या जेवणाला फोडणीचा भात करते. भात न आवडणाऱ्या मंडळींना सुद्धा असा भात आवडतो.

साहित्य ( ४ जणांसाठी ) (१ कप = २५० मिली )

तांदूळ १ कप

कांदा २ मध्यम बारीक चिरून

बटाटा १ मध्यम काचऱ्या चिरून

हिरव्या मिरच्या ३

ताजा खवलेला नारळ २ टेबलस्पून

चिरलेली कोथिंबीर २ टेबलस्पून

लिंबाचा रस अर्धा चमचा

साखर अर्धा चमचा (चवीनुसार कमी / जास्त करा)

तेल १ टेबलस्पून 

मोहरी अर्धा  टीस्पून 

जिरं अर्धा  टीस्पून

हळद अर्धा टीस्पून

हिंग चिमूटभर

कढीपत्ता ८१० पानं

मीठ चवीनुसार

कृती

. तांदुळाचा भात करून घ्या आणि तो मोकळा करून गार करून घ्या. शिळा भात असेल तर तो मोकळा करून घ्या.   

. एका कढईत तेल गरम करून मोहरी, जिरं, हिंग, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता घालून खमंग फोडणी करा.

. फोडणीत कांदा घाला. हळद घाला आणि २३ मिनिटं परता.  

. बटाटे घाला. झाकण ठेवून २ मिनिटं मंद आचेवर वाफ काढा.

. २ चिमूट मीठ घाला. झाकण ठेवून बटाटे शिजेपर्यंत शिजवा.

. कढईत भात घालानीट ढवळून घ्या.  

. मीठ, साखर आणि लिंबाचा रस घाला. थोडं पाणी शिंपडा आणि मिश्रण ढवळून झाकण ठेवून वाफ काढा.

. भात सुका वाटत असतील तर थोडं पाणी शिंपडून वाफ काढा.

. नारळ, कोथिंबीर घालून ढवळा.

१०. चविष्ट फोडणीचा भात तयार आहे.

११. गरमागरम फोडणीचा भात कोथिंबीर पेरून खायला द्या.

Fodnicha Bhaat / Fodnicha Bhat (फोडणीचा भात)
Fodnicha Bhaat / Fodnicha Bhat (फोडणीचा भात)
Fodnicha Bhaat / Fodnicha Bhat (फोडणीचा भात)
Fodnicha Bhaat / Fodnicha Bhat (फोडणीचा भात)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes