Pohyache Dangar (पोह्याचे डांगर) – Yummy Maharashtrian Snack using Flattened Rice
In my childhood, we used to get fresh Poha Papad (semi dried). They used to taste awesome. My mother also used to make Poha Dangar (Papad dough). We used to relish these simple things. Now-a-days we really miss these. So sometimes, I make Poha Dangar at home from Poha (Flattened Rice). One can have this as a snack or as an accompaniment with Curd Rice. To get the exact taste of Poha Papad, I add little Papad Khar (Alkaline Salt) to this; but you can skip it if you like.
Ingredients (Makes 14-15 balls) (1 cup = 250 ml)
Flattened Thick Rice (Poha) 1 cup
Kashmiri Chili Powder 1.5 teaspoon
Chili Powder ½ teaspoon
Asafoetida ¼ teaspoon
Buttermilk 1 cup
Oil 2 teaspoon
PapadKhar (Alkaline Salt) ½ teaspoon (optional)
Aalt to taste
Instructions
1. Dry Roast Poha on low flame till crispy. Leave to cool. Grind Poha into a fine powder.
2. In a Bowl, add ground Poha, Chili Powder, Asafoetida, Papadkhar and Salt. Mix tgether.
3. Dissolve PapadKhar in 2 teaspoons of water.
4. Add this water to the mixture and mix. Gradually add buttermilk and bind a soft dough. Add water if required.
5. Add Oil and knead the dough for 8-10 minutes.
6. Make round balls of the dough. Pohyache Dangar is ready.
7. Enjoy Pohyache Dangar dipped in Groundnut oil (preferably filtered oil). It tastes super yummy. You can also have this Dangar with Curd Rice.
==================================================================================
पोह्याचे डांगर
लहानपणी पोह्याचे ओले पापड मिळायचे. ते खायला अतिशय चविष्ट असायचे. आई कधी कधी पोह्याचं डांगर करायची. हल्ली हे पदार्थ मिळतच नाहीत. पण पदार्थांच्या आठवणी आल्या की तोंडाला पाणी सुटतं. मग असे पदार्थ घरीच करावे लागतात. पोह्याचं डांगर करायला अगदी सोपं आहे. पापडाची चव यायला मी यात पापडखार घालते. उपलब्ध नसेल तर नाही घातला तरी चालेल.
साहित्य (१ कप = २५० मिली) (१४–१५ लाट्यांसाठी)
जाडे पोहे १ कप
काश्मिरी लाल तिखट दीड टीस्पून
लाल तिखट अर्धा टीस्पून
हिंग पाव टीस्पून
पापडखार अर्धा टीस्पून (ऐच्छिक)
ताक १ कप
मीठ चवीनुसार
कृती
१. पोहे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
२. एका परातीत पोह्याचं पीठ, काश्मिरी लाल तिखट, लाल तिखट, हिंग, मीठ घालून मिसळून घ्या.
३. २ टीस्पून पाण्यात पापडखार विरघळवून घ्या. ते पाणी परातीत घालून मिश्रण एकजीव करा.
४. थोडं थोडं ताक घालून सैलसर पीठ भिजवा. जरुर पडल्यास थोडं पाणी घाला.
५. तेल घालून पीठ ८–१० मिनिटं मळून घ्या.
६. पिठाच्या छोट्या छोट्या लाट्या / गोळे करून घ्या. पोह्याचं चविष्ट डांगर तयार आहे.
७. कच्च्या तेलात बुडवून डांगराचा आस्वाद घ्या (फिल्टर्ड गोडं तेल असेल तर आणखी छान लागतं). हे डांगर दही भातासोबतही छान लागतं.
Your comments / feedback will help improve the recipes