Lal Bhopalyachya Fodi (लाल भोपळ्याच्या फोडी / काप) – Pan Fried Red Pumpkin Fritters – My innovative Recipe
लाल भोपळ्याच्या फोडी / काप मराठी
CapsicumIn Goa, Pan Fried Fritters (Fodi) are very popular. Different vegetables like Potato, Breadfruit (Neerpanas), Eggplant, Okra, Bitter Gourd, Capsicum are used to make these fritters. Goans have these fritters with Rice and Solkadhi (Kokam Curry). My innovation adds one more vegetable to this list – Red Pumpkin. The texture of Red Pumpkin is just right for these fritters and a little sweetish taste of pumpkin makes these fritters very tasty. Try this out. It tastes amazing.
Ingredients (Serves 4)
Red Pumpkin 200 grams
Chili Powder 1 teaspoon
Turmeric Powder ½ teaspoon
Garam Masala ½ teaspoon
Lemon Juice ½ teaspoon
Rice Flour 3-4 tablespoon
Fine Semolina 1 tablespoon
Oil for Pan Frying
Salt to taste
Instructions
1. Wash and Peel Red Pumpkin. Remove the seeds and the soft portion around the seeds.
2. Chop Pumpkin into square / rectangular pieces about 3-4 mm thick.
3. Add Chili Powder, Turmeric Powder, Lemon Juice, Garam Masala and Salt to Pumpkin Pieces and mix together. There will be a thin layer of spice mixture on pumpkin pieces.
4. In a plate, mix Rice Flour and Semolina.
5. Heat a Griddle. Put some oil on the Griddle and spread it evenly. Turn the flame to low.
6. Roll each Pumpkin piece in dry flour mixture and place it on hot Griddle. Put some oil around the pieces.
7. Roast pieces for 3-4 minutes and then flip over. Again Put some oil around the pieces.
8. Roast for 2-3 minutes.
9. Yummy Pumpkin Fritters are ready. Serve hot as a snack or a side dish.
==================================================================================
लाल भोपळ्याच्या फोडी / काप – माझी नाविन्यपूर्ण रेसिपी
गोव्यात वेगवेगळ्या भाज्यांच्या फोडी / काप करतात. अट्टल गोवेकराच्या मते शिवराक (शाकाहारी) जेवणाला ह्या फोडींमुळे चव येते. बटाटे, निरपणस, वांगी, भेंडी, कारले, ढोबळी मिरची ह्या भाज्यांच्या फोडी लोक शित (भात) कढीसोबत (सोलकढी) आवडीनं खातात. मी ह्या यादीत अजून एक भाजी घातलीय – ती म्हणजे लाल भोपळा. लाल भोपळ्याचं टेक्सचर ह्या फोडींसाठी अगदी योग्य आहे. आणि भोपळ्याची किंचित गोडसर चव फोडी आणखीन चवदार करते. नक्की करून बघा ही नवीन रेसिपी.
साहित्य (४ जणांसाठी)
लाल भोपळा २०० ग्राम
लाल तिखट १ टीस्पून
हळद अर्धा टीस्पून
गरम मसाला अर्धा टीस्पून
लिंबाचा रस अर्धा टीस्पून
तांदुळाचं पीठ ३–४ टेबलस्पून
बारीक रवा १ टेबलस्पून
तेल फोडी भाजताना घालण्यासाठी
मीठ चवीनुसार
कृती
१. लाल भोपळा धुवून सोलून घ्या. बिया आणि बियांजवळच्या रेषा काढून टाका. ३–४ मिमी जाडीचे चौकोनी तुकडे करा.
२. भोपळ्याचे तुकडे एका ताटलीत घेऊन त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला, लिंबाचा रस आणि मीठ घालून मिसळून घ्या. भोपळ्याच्या तुकड्यांना छान मसाला लागलेला दिसेल.
३. दुसऱ्या ताटलीत तांदुळाचं पीठ आणि रवा घालून एकत्र करा.
४. एक तवा गरम करून त्यावर थोडं तेल घालून पसरून घ्या. गॅसची आच मंद करा.
५. भोपळ्याचे तुकडे पिठात घोळवून तव्यावर घाला. तुकड्यांवर सर्व बाजूला थोडं तेल घाला.
६. ३–४ मिनिटं भाजून तुकडे परतून घ्या. परत थोडं तेल घालून दुसरी बाजूही २–३ मिनिटं भाजून घ्या.
७. भोपळ्याच्या चवदार फोडी / काप तयार आहेत. स्नॅक किंवा साईड डिश म्हणून खायला द्या.
Your comments / feedback will help improve the recipes