Microwave Besan Laadoo (मायक्रोवेव्ह बेसन लाडू) – Gram Flour / Chickpeas flour Laddus – Microwave method
Everyone likes delicious Besan Laadoos. But to roast Besan (Gram Flour) for laddus is a tedious and time consuming task. Since you need to keep stirring the flour continuously, you can’t do anything else at the same time – No multitasking. But Microwave makes the task very easy. Let’s see how to do it:
Instructions
1. Use Micrwave safe glass bowl. Add Gram Flour and Ghee. Mix it and cook on high power for 3 minutes.
2. Take out the bowl. Mix the mixture and cook it again for 3 minutes on high power.
3. Keep repeating these steps till you get nice aroma of roasted Gram flour.
4. Once Gram Flour is roasted take out the bowl. Sprinkle some milk and mix properly till bubbles settle.
5. Add Powdered Sugar Or Crushed Jaggery, Mix and roll laddus.
For detailed recipe of Besan Laddus with Sugar, click on the link below:
https://myfamilyrecipes.kunkalienkar.com/2017/10/besan-laadoo/
For detailed recipe of Besan Laddus with Jaggery, click on the link below:
https://myfamilyrecipes.kunkalienkar.com/2021/09/gulache-besan-laadoo/
==================================================================================
मायक्रोवेव्ह बेसन लाडू- बेसन भाजण्याची सोपी पद्धत
लाडवांसाठी बेसन भाजणे हे एक कंटाळवाणं काम असतं. आणि ते करताना दुसरं काही करता येत नाही. मायक्रोवेव्ह मध्ये बेसन छान भाजलं जातं आणि सतत ढवळत राहावं लागत नाही. गॅसवर भाजलेल्या आणि मायक्रोवेव्ह मध्ये भाजलेल्या बेसनाच्या लाडवांच्या चवीत काही फरक नसतो. मी पहिल्यांदा मायक्रोवेव्ह मध्ये बेसन भाजून लाडू केले तेव्हा घरी सांगावं लागलं की आज वेगळ्या पद्धतीनं लाडू केलेत; तोपर्यंत कोणाला काही वेगळं जाणवलं नव्हतं.
कृती
१. मायक्रोवेव्हच्या काचेच्या भांड्यात बेसन घाला. तूप घाला. एकदा ढवळून मायक्रोवेव्ह हाय पॉवर वर ३ मिनिटं चालू करा.
२. नंतर बेसन बाहेर काढून ढवळून परत ३ मिनिटं भाजा.
३. बेसन खमंग भाजेपर्यंत ह्या पायऱ्या परत परत करा. पाव किलो बेसन भाजायला ७–८ मिनिटं लागतात.
४. तुम्हाला जेवढं खमंग भाजायचं असेल तेवढं भाजून भांडं बाहेर काढून दुधाचा हबका मारून चांगलं ढवळून घ्या.
५. भाजलेल्या बेसनाचे पिठीसाखर / गूळ घालून लाडू वळा.
साखरेच्या बेसन लाडवांच्या सविस्तर रेसिपी साठी ह्या लिंकवर क्लिक करा:
https://myfamilyrecipes.kunkalienkar.com/2017/10/besan-laadoo/
गुळाच्या बेसन लाडवांच्या सविस्तर रेसिपी साठी ह्या लिंकवर क्लिक करा:
https://myfamilyrecipes.kunkalienkar.com/2021/09/gulache-besan-laadoo/
Your comments / feedback will help improve the recipes