Alu Palak (आलू पालक)– Yummy Spinach Potatoes Subji
Alu Palak subji is very popular. There are different recipes of Alu Palak. This is my recipe where I use minimum spices. In most places, the texture of Alu Palak is like a paste. I use a combination of Spinach Paste and Mashed Spinach. Hence the texture of this subji is different. I use Microwave to cook Spinach. That retains the nice green colour of spinach. If you don’t want to use Microwave, you can cook it in a pan. Read Note at the end of the recipe for details.
Ingredients (Serves 3)
Finely chopped Spinach 2.5 cups
Onions 1 medium roughly chopped
Garlic 6-7 cloves
Ginger ½ inch roughly chopped
Boiled Potatoes 2 medium
Cashew nuts 12-13
Pure Ghee (Clarified Butter) 1 tablespoon
Cumin Seeds ¼ teaspoon
Asafoetida a pinch
Green Chilies Crushed ½ teaspoon
Tamarind pulp ½ teaspoon
Sugar ½ – 1 teaspoon
Garam Masala ¼ teaspoon
Salt to taste
Instructions
1. Clean, wash and finely chop Spinach. Use tender stems, if any.
2. Transfer spinach into a microwave safe bowl and cook on High power for 4 minutes. Do not add water. Do not cover the bowl.
3. Leave Spinach to cool.
4. Grind Onions, Garlic, Ginger together into a smooth paste.
5. Soak Cashew nuts in warm water for 10 minutes.
6. Transfer half of Spinach to a grinder bowl and grind it into a smooth paste. Mash remaining spinach using a spoon.
7. In a pan, heat Ghee. Add cumin seeds and wait for splutter. Add Asafoetida.
8. Add Onion paste and saute on low heat till light brown. Add Tamarind pulp and mix.
9. Add Spinach Paste as well as Mashed Spinach.
10. Add Crushed chilies, Garam Masala, Salt and Sugar. Mix.
11. Peel Boiled potatoes and chop into medium size pieces. Add to Spinach. Mix.
12. Make a smooth paste of cashew nuts and add to Spinach.
13. Mix and cook for 3-4 minutes.
14. Delicious, creamy Alu Palak is ready. Enjoy with Roti / Paratha (Indian Bread).
Note
1. If you don’t have Microwave, cook chopped spinach in a pan without adding water and without covering the pan. Spinach will release water and that will be sufficient to cook it.
==================================================================================
आलू पालक
आलू पालक खूप लोकप्रिय भाजी आहे. आलू पालक वेगवेगळ्या प्रकारे करतात. ह्या रेसिपीत मी खूप कमी मसाले घालते. तरीही छान चविष्ट भाजी होते. बहुतेक सगळ्या रेसिपीत पालक वाटून त्याची पेस्ट करतात त्यामुळे भाजीचं टेक्सचर दाट सुपासारखं येतं. मी पालक आधी मायक्रोवेव्ह मध्ये शिजवून घेते. मायक्रोवेव्ह मध्ये शिजवल्यामुळे पालक छान हिरवागार राहतो. अर्धा पालक मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि अर्धा चमच्याने कुस्करून (मॅश) करून घेते. त्यामुळे भाजीचं टेक्सचर छान येतं. मायक्रोवेव्ह नसेल तर तुम्ही पालक कढईत शिजवू शकता. रेसिपीच्या शेवटी त्याची टीप दिलेली आहे.
साहित्य (३ जणांसाठी)
बारीक चिरलेला पालक २.५ कप
कांदे १ मध्यम आकाराचा – तुकडे करून
लसूण ६–७ पाकळ्या
आलं अर्धा इंच चिरून
उकडलेले बटाटे २ मध्यम
काजू १२–१३
साजूक तूप १ टेबलस्पून
जिरं पाव चमचा
हिंग चिमूटभर
ठेचलेली हिरवी मिरची अर्धा चमचा
चिंचेचा कोळ अर्धा चमचा
गरम मसाला पाव चमचा
साखर अर्धा – १ चमचा
मीठ चवीनुसार
कृती
१. पालक निवडून, धुवून बारीक चिरून घ्या. पालकचे कोवळे देठ असतील तर तेही चिरून घ्या.
२. एका मायक्रोवेव्हच्या भांड्यात पालक घालून मायक्रोवेव्ह मध्ये हाय पॉवर वर ४ मिनिटं शिजवून घ्या. पाणी घालू नका. झाकण ठेवू नका.
३. पालक गार होऊ द्या.
४. कांदे, आलं, लसूण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
५. काजू १० मिनिटं कोमट पाण्यात भिजवून ठेवा.
६. अर्धा पालक मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. अर्धा चमच्याने चुरडून घ्या. असं केल्याने भाजीचं टेक्सचर छान येतं.
७. एका कढईत तूप गरम करून जिरं, हिंगाची फोडणी करा.
८. वाटलेलं कांद्याचं मिश्रण कढईत घालून मंद आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत परता. चिंचेचा कोळ घालून मिश्रण ढवळून घ्या.
९. मिक्सर मध्ये बारीक केलेला पालक आणि चमच्याने चुरडलेला पालक दोन्ही कढईत घाला.
१०. हिरवी मिरची, गरम मसाला, मीठ, साखर घालून मिक्स करा.
११. बटाटे सोलून मध्यम आकाराचे तुकडे करा. कढईत घाला.
१२. काजू थोडं पाणी घालून मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. कढईत घाला.
१३. मिश्रण ढवळून ३–४ मिनिटं शिजवा.
१४. स्वादिष्ट, क्रिमी आलू पालक तयार आहे. पोळी / भाकरी बरोबर अप्रतिम लागते.
टीप
१. मायक्रोवेव्ह नसेल तर चिरलेला पालक एका कढईत पाणी न घालता आणि झाकण न ठेवता शिजवून घ्या. पालकाला पाणी सुटतं आणि त्या पाण्यात पालक छान शिजतो.
Your comments / feedback will help improve the recipes