Paneer Butter Masala (पनीर बटर मसाला ) – Yummy and Creamy Subji with Cottage Cheese
Paneer Butter Masala is a popular gravy in Indian cuisine. Paneer lovers definitely ask for this when they go to restaurants. It is very easy to make this subji at home. The gravy made in this preparation is a general purpose gravy where instead of Paneer, you can add Peas, Corn, Cauli Flower, Potatoes. Non-veg lovers can add chicken pieces to make Butter Chicken. This recipe makes super delicious subji – better than what you get in restaurants.
Ingredients (Serves 4)
Paneer (Cottage Cheese) ½ kg
Tomatoes 4 medium size finely sliced
Onions 3 medium size finely sliced
Big Cardamom 1
Cinnamon 1 inch
Cashew Nuts 15
Bay Leaf 1
Garlic 5-6 cloves
Chili Powder 1 teaspoon
Garam Masala ½ teaspoon
Sugar 1 teaspoon
Dried Fenugreek Leaves (Kasuri Methi) 2 teaspoon
Butter 2 tablespoon
Fresh Cream 1 tablespoon
Salt to taste
Instructions
1. In a big Pan, heat about 1 liter of water.
2. Add sliced tomatoes, Onions, bay leaf, cinnamon, big cardamom, cashew nuts, sugar. Boil mixture for 5 minutes.
3. Add Garlic, Garam Masala, Chili Powder, 1 teaspoon of Dried Fenugreek Leaves and Salt. Cook covered on medium flame till onions are translucent.
4. Remove Bay leaf and Big Cardamom from the mixture and leave the mixture to cool.
5. When the mixture comes to room temperature, Grind it into a smooth paste and strain the paste.
6. Transfer the Strained mixture to the pan and heat on low flame.
7. Add Cottage Cheese pieces. Add water to adjust consistency. Cook for 5 minutes.
8. Add butter and cook for 2-3 minutes.
9. Add fresh cream and remaining Dried Fenugreek Leaves (crushed).
10. Serve hot with with Roti or Paratha. It tastes awesome with Lachha Paratha.
Note:
1. Instead of adding raw Paneer, you can pan fry the pieces and then add to the gravy.
==================================================================================
पनीर बटर मसाला – रेस्टॉरंटपेक्षा स्वादिष्ट भाजी
पनीर बटर मसाला ही एक लोकप्रिय भाजी आहे. पनीर आवडीने खाणारे लोक रेस्टॉरंट मध्ये गेल्यावर ही डिश हमखास मागवतात. ही भाजी करायला सोपी आहे. ह्यात घातली जाणारी ग्रेव्ही ही General purpose gravy आहे. त्यात तुम्ही पनीर ऐवजी मटार, कॉर्न, फ्लॉवर, बटाटे ही घालू शकता. मांसाहारी लोक ह्यात चिकन घालून बटर चिकन करू शकतात. ह्या रेसिपीनुसार केलेली भाजी अगदी स्वादिष्ट होते.
साहित्य (४ जणांसाठी )
पनीर अर्धा किलो
टोमॅटो ४ मध्यम आकाराचे – उभे पातळ slice चिरून
कांदे ३ मध्यम आकाराचे – उभे पातळ slice चिरून
मसाला वेलची १
दालचिनी १ इंच
तमालपत्र १
काजू १५
लसूण ५–६ पाकळ्या
लाल तिखट १ टीस्पून
गरम मसाला अर्धा टीस्पून
साखर १ टीस्पून
कसुरी मेथी २ टीस्पून
बटर २ टेबलस्पून
फ्रेश क्रीम १ टेबलस्पून
मीठ चवीनुसार
कृती
१. एका मोठ्या पातेल्यात १ लिटर पाणी गरम करा.
२. त्यात चिरलेले टोमॅटो, कांदे, तमालपत्र, दालचिनी, मसाला वेलची, काजू आणि साखर घालून मिश्रण ५ मिनिटं उकळवा.
३. त्यात लसूण, गरम मसाला, लाल तिखट, १ टीस्पून कसुरी मेथी आणि मीठ घाला. पातेल्यावर झाकण ठेवून कांदे पारदर्शक होईपर्यंत मध्यम आचेवर शिजवा.
४. गॅस बंद करून तमालपत्र आणि मसाला वेलची काढून टाका आणि मिश्रण गार करून घ्या.
५. मिश्रण गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून गाळण्याने गाळून घ्या.
६. गाळलेले मिश्रण एका कढईत घाला आणि मंद आचेवर गरम करा.
७. त्यात पनीरचे तुकडे घाला. जरुरीनुसार पाणी घाला आणि मंद आचेवर ५ मिनिटं शिजवा.
८. बटर घालून २–३ मिनिटं शिजवा.
९. फ्रेश क्रिम घाला. उरलेली कसुरी मेथी चुरडून घाला.
१०. स्वादिष्ट पनीर बटर मसाला तयार आहे. गरम गरम भाजी पोळी / पराठ्यासोबत सर्व्ह करा. लच्छा पराठ्यासोबत ही भाजी फारच छान लागते.
टीप
१. भाजीत पनीरचे तुकडे कच्चे न घालता तव्यावर गरम करून घालू शकता.
Your comments / feedback will help improve the recipes