Mirchi Ka Salan (मिरची का सालन) – Green Chili Curry – A Spicy Specialty from Hyderabad

Mirchi Ka Salan (मिरची का सालन)
Mirchi Ka Salan (मिरची का सालन)

Mirchi Ka Salan (मिरची का सालन) – Green Chili Curry – A Spicy Specialty from Hyderabad

मिरची का सालन मराठी

Mirchi ka Salan is a specialty from Hyderabad. This is made using Thick Green chilies that are less pungent than normal chilies. There it is served with Biryani. But it goes well with Indian Roti / Paratha / Rice. There are different recipes of Salan. This recipe uses Peanuts and Sesame Seeds. That gives a nice nutty spicy taste to the curry. This recipe also uses some dry red chilies and chili powder. Adjust the measure depending on the pungent taste of green chilies and what suits your palate.

Ingredients (Serves 4) (1 cup = 250 ml)

Mirchi Ka Salan (मिरची का सालन)
Ingredients of Mirchi Ka Salan (मिरची का सालन चं साहित्य)

Thick Green chilies 250 grams

Raw Peanuts ½ cup

Sesame Seeds 2 tablespoons

Coriander Seeds 1 tablespoon

Cumin Seeds 1 teaspoon

Red dry chilies 2

Red Chili Powder ½ teaspoon

Ginger 1 inch piece roughly chopped

Garlic 8-9 cloves roughly chopped

Oil 2 tablespoons + as required for frying Chilies

Mustard seeds ¼ teaspoon

Curry leaves 8-10

Onion medium size 1 Grated

Turmeric powder ½ teaspoon

Tamarind pulp 2 tablespoons

Sugar ½ teaspoon (optional)

Salt to taste

Instructions

1. Wash, wipe green chilies. Retain the stems. Give a lengthwise slit without cutting through.

2. Heat 3-4 tablespoon oil in a wok and deep fry for one minute. Take out on a tissue paper.

Mirchi Ka Salan (मिरची का सालन)
Fried Green Chilies (तळलेल्या हिरव्या मिरच्या)

3. Dry roast Raw peanuts till the colour changes. Dry roast sesame seeds till sesame seeds splutter. Take out in a plate. Dry roast coriander seeds and cumin seeds together till you get nice aroma of roasted spices. Take them out in a plate.

4. In a Grinder transfer Peanuts (do not peel), sesame seeds, coriander seeds, cumin seeds, red chilies, ginger and garlic. Grind into a fine paste. Add little water if required.

5. Heat two tablespoons of oil in a pan (you can use the leftover oil used for frying chilies), add mustard seeds, wait for splutter; add curry leaves.

6. Add onion. Saute until onion is light golden brown, stirring continuously.

7. Add turmeric powder and mix well. Add spice paste and cook for 3-4 minutes, stirring continuously.

8. Add one and half cups of water and bring it to a boil. Cook on low flame for 8-10 minutes.

9. Add tamarind pulp and mix.

10. Add fried Green chilies, red chili powder, salt and cook on low heat for 8-10 minutes.

11. Yummy Mirchi ka Salan is ready. Serve hot with Indian Roti / Biryani / Rice.

Mirchi Ka Salan (मिरची का सालन)
Mirchi Ka Salan (मिरची का सालन)
Mirchi Ka Salan (मिरची का सालन)
Mirchi Ka Salan (मिरची का सालन)

==================================================================================

मिरची का सालन झणझणीत हैदराबादी स्पेशालिटी

मिरची का सालन ही हैदराबादी स्पेशालिटी आहे. जाड हिरव्या मिरच्या (त्या जरा कमी तिखट असतात) घालून हे सालन करतात. हैदराबाद मध्ये हे सालन बिर्याणीसोबत खाल्लं जातं. पण पोळी / पराठ्यासोबत ही हे छान लागतं. हे सालन वेगवेगळ्या प्रकारे करतात. पण शेंगदाणे, तीळ घालून ह्या रेसिपीनुसार केलेलं हे झणझणीत सालन आमच्याकडे फार आवडतं. माझा नवरा बाकी काही तिखट खात नाही पण हे सालन मात्र आवडीनं खातो. भाजीवाल्याकडे जाड हिरव्या मिरच्या दिसल्या की त्याची सालनची फर्माईश असतेच. ह्या रेसिपीत सुक्या लाल मिरच्या आणि थोडं लाल तिखट घातलंय. हिरव्या मिरच्यांच्या तिखटपणानुसार आणि तुमच्या पोटाला झेपेल त्यानुसार हे प्रमाण कमी / जास्त करा.

साहित्य (४ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)

Mirchi Ka Salan (मिरची का सालन)
Ingredients of Mirchi Ka Salan (मिरची का सालन चं साहित्य)

जाड हिरव्या मिरच्या २५० ग्रॅम्स

कच्चे शेंगदाणे अर्धा कप

तीळ २ टेबलस्पून

धने १ टेबलस्पून

जिरं १ टीस्पून

सुक्या लाल मिरच्या २

लाल तिखट अर्धा टीस्पून

आलं १ इंच तुकडे करून

लसूण ८९ तुकडे करून

तेल २ टेबलस्पून + मिरच्या तळायला लागेल तेव्हढं

मोहरी पाव टीस्पून

कढीपत्ता ८१० पानं

कांदा १ मध्यम आकाराचा किसून

हळद अर्धा टीस्पून

चिंचेचा कोळ २ टेबलस्पून

साखर अर्धा टीस्पून (ऐच्छिक)

मीठ चवीनुसार

कृती

. हिरव्या मिरच्या धुवून पुसून घ्या. देठं काढू नका. प्रत्येक मिरचीला एक उभी चीर द्या. पूर्ण चिरून दोन तुकडे करू नका.

. एका कढईत ३४ टेबलस्पून तेल गरम करून त्यात मिरच्या घालून १ मिनिट तळून घ्या. तळलेल्या मिरच्या टिश्यू पेपर वर काढून घ्या.

Mirchi Ka Salan (मिरची का सालन)
Fried Green Chilies (तळलेल्या हिरव्या मिरच्या)

. शेंगदाणे आणि तीळ वेगवेगळे खमंग भाजून ताटलीत काढून ठेवा. धने आणि जिरे एकत्र छान भाजून घ्या.

. मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे (सालासकट), तीळ, धने, जिरे, लाल मिरच्या, आलं, लसूण घालून थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या.

. एका कढईत २ टेबलस्पून तेल घालून गरम करा (मिरच्या तळलेलं तेलही वापरू शकता ). मोहरी घाला. मोहरी तडतडली की कढीपत्ता घाला.

. किसलेला कांदा घालून मंद आचेवर तपकिरी रंगावर परतून घ्या.

. हळद घालून मिश्रण ढवळून घ्या. वाटलेले मसाले घालून मंद आचेवर ३४ मिनिटं शिजवा.

. कढईत दीड कप पाणी घालून उकळी काढा आणि मंद आचेवर ८१० मिनिटं शिजवा.

. चिंचेचा कोळ घालून मिश्रण ढवळून घ्या.

१०. मिश्रणात तळलेल्या मिरच्या, लाल तिखट आणि मीठ घालून मंद आचेवर ८१० मिनिटं शिजवा. शिजताना जरुरीनुसार पाणी घाला. हे सालन थंड झाल्यावर आळते. हे लक्षात ठेवा.

११. झणझणीत आणि चविष्ट मिरची का सालन तयार आहे. गरमागरम सालन बिर्याणी / पोळी / भाकरी / पराठा / भातासोबत खायला द्या.

Mirchi Ka Salan (मिरची का सालन)
Mirchi Ka Salan (मिरची का सालन)
Mirchi Ka Salan (मिरची का सालन)
Mirchi Ka Salan (मिरची का सालन)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes