Khava Naral Poli (खवा नारळ पोळी) – Sweet Roti with a Filling of Milk Solids and Coconut – No Refined Sugar
I often make Rotis with Khava / Milk Solids Filling. I also make sweet Rotis with Coconut Filling. This is a combination of both. Rotis filled with delicious filling of Khava and Coconut. No white sugar is used in the recipe. These Rotis are super delicious and relatively easy to make. Try these out.
Ingredients (Makes 12-13 Poli) (1 cup = 250 ml)
Fresh Scraped Coconut 2 cups
Khava / Khoya / Mava / Milk Solids 1 cup
Crushed Jaggery 1.75 cups (Adjust as per taste)
Cardamom Powder ¼ teaspoon
Wheat Flour 2 cups + as required for dusting
Oil 1 teaspoon
Salt 1-2 pinch
Instructions
1. Add little salt and oil to Wheat flour and gradually add water to bind a medium consistency dough. Keep the dough covered for 30 minutes.
2. Loosen Khava / Mava and Roast it on low flame for 2 minutes. Transfer it to a plate and leave it to cool.
3. Mix Coconut and Jaggery in a thick bottom pan. Cook on low flame stirring continuously till mixture starts thickening. Add Khava and mix. Keep cooking till the liquid in the mixture evaporates completely. Switch off the gas. Add Cardamom Powder to the mixture and spread it in a plate and leave it to cool. Filling is ready.
4. Make big lemon size balls of the dough. Make filling balls bigger than the dough balls.
5. Take a dough ball. Make a bowl of the dough; place the filling ball inside the dough bowl and gently pull the dough from all sides so as to cover the filling with the dough.
6. Roll the filled ball in dry wheat flour and gently roll into a circular shaped Roti thinner than a Paratha.
7. Heat a Griddle. Dry roast Roti on the griddle on medium flame, till light brown on both sides.
8. Upon cooling Transfer Rotis to a container. These Rotis taste better on the following day. Serve yummy Khava Naralachi Poli with a generous helping of home made Ghee (clarified butter).
9. Khava Naralachi Poli can be stored for 3-4 days at room temperature. Do not refrigerate.
Note
1. Instead of wheat flour you can use Semolina and all purpose flour (half-half) for the cover.
==================================================================================
खवा नारळ पोळी – माझी नाविन्यपूर्ण रेसिपी – स्वादिष्ट पक्वान्न पांढरी साखर न घालता
मी खव्याच्या पोळ्या करते आणि नारळाच्या पोळ्याही करते. ही एक नवीन रेसिपी आहे ज्यात खवा आणि नारळाचं पुरण घालून पोळ्या केल्या आहेत. साखर न घालता फक्त गूळ घालून केलेल्या ह्या पोळ्या अतिशय स्वादिष्ट लागतात. आणि ह्या पोळ्या करायलाही फार कठीण नाहीत. एकदा करून बघा.
साहित्य (१२–१३ पोळ्यांसाठी) (१ कप = २५० मिली)
ताजा खवलेला नारळ २ कप
खवा / मावा १ कप
चिरलेला गूळ पावणे दोन कप (चवीप्रमाणे कमी/जास्त करा)
वेलची पूड पाव टीस्पून
कणिक २ कप + पोळ्या लाटताना लागेल तेवढी
तेल १ टीस्पून
मीठ२–३ चिमूट
कृती
१. २ कप कणिक, तेल, मीठ घालून पीठ भिजवून घ्या. फार सैल नको आणि फार घट्ट ही नको.
२. खवा मोकळा करून मंद आचेवर २ मिनिटं भाजून घ्या. परातीत काढून गार करा.
३. एका जाड बुडाच्या कढईत नारळ आणि गूळ घालून मिश्रण मंद आचेवर शिजवा. सतत ढवळत राहा. मिश्रण घट्ट व्हायला लागलं की खवा घालून परत शिजवा. मिश्रणातलं पाणी (रस) आटला की गॅस बंद करा. वेलची पूड घालून ढवळून घ्या आणि मिश्रण एका ताटलीत पसरून गार करा. पोळीत भरायचं पुरण तयार आहे.
४. भिजवलेली कणिक मळून घ्या आणि मोठ्या लिंबाएवढे गोळे करा. तयार पुरणाचे कणकेच्या गोळ्यांपेक्षा मोठे गोळे करा.
५. कणकेच्या गोळ्याची पारी करून त्यात पुरणाचा गोळा ठेवा आणि हलक्या हाताने कणकेचा गोळा (उंडा) बंद करा.
६. भरलेला उंडा सुकी कणिक लावून हलक्या हाताने लाटून घ्या. पोळीपेक्षा जाड पण पराठ्यापेक्षा पातळ पोळी लाटून घ्या.
७. लाटलेली पोळी गरम तव्यावर मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्या. भाजताना तेल / तूप लावण्याची गरज नाही.
८. भाजलेल्या पोळ्या गार झाल्या की डब्यात भरून ठेवा.
९. खवा नारळाची स्वादिष्ट पोळी तयार आहे. पोळ्या घरी कढवलेल्या साजूक तुपासोबत खायला द्या. खूप छान लागतात. ह्या पोळ्या मुरल्या की जास्त छान लागतात.
टीप
१. आवरणासाठी कणकेऐवजी बारीक रवा आणि मैदा अर्धा अर्धा घालू शकता.
Your comments / feedback will help improve the recipes