Nachani – Ragi Pudding (नाचणी पुडिंग) – Finger Millet Pudding using Millet Four (No Refined Sugar)

Nachani - Ragi Pudding (नाचणी पुडिंग)
Nachani - Ragi Pudding (नाचणी पुडिंग)

Nachani – Ragi Pudding (नाचणी पुडिंग) – Finger Millet Pudding using Millet Four (No Refined Sugar) – My Innovative Recipe

नाचणी पुडिंग मराठी

Nachachi Satva is a traditional Goan recipe that is made using Finger Millet Extracts. This recipe is my innovation over Nachani Satva that does not discard the nutritious fibre from Finger Millet. That makes this Pudding more nutritious than Nachani Satva. Since you don’t need to take out Millet extracts, the recipe becomes very easy.

This pudding is mild sweet and delicious. The main ingredients are Nachani / Ragi / Finger Millet flour, fresh coconut and Jaggery. It’s a healthy sweet / snack without Refined Sugar.

Ingredients (1 cup = 250 ml) (Serves 6)

Nachani Flour (Finger Millet / Ragi) ¾ cup

Fresh Scraped Coconut ¾ cup

Jaggery Crushed 1 cup (adjust as per taste)

Cardamom Powder ¼ teaspoon

Cashew Nuts 2 tablespoons chopped

Pure Ghee (Clarified Butter) 1 teaspoon

Salt 2-3 pinch

Instructions

1. Using a grinder, Grind fresh coconut into a fine paste. Add some water while grinding. Measure the coconut paste using a measuring cup.

2. In a thick bottom pan add Nachani Flour. Add coconut paste. We need 3 times the liquid to mix with Nachani Flour – we need 2.25 cups of coconut paste + water. Add it to the pan. Mix together to ensure no lumps are formed. Add Jaggery and salt.

3. Cook on low flame for 15-20 minutes stirring continuously. If the mixture is too thick, add some water. Consistency should be like chocolate sauce. When mixture is cooked, it will be glossy.

4. To check if the mixture is cooked, take out ¼ teaspoon of the mixture in a spoon and leave it to cool. Upon cooling if the mixture leaves the spoon without sticking to it, it’s cooked. Else cook it for some more time.

5. Mix chopped cashew nuts and cardamom powder.

6. Grease a flat plate / tin (about 8 inch diameter) with pure ghee.

7. Add the remaining pure ghee to the mixture, mix and spread the mixture in the plate / tin to form a thick layer.

8. Leave it to cool to room temperature. Refrigerate for 2-3 hours.

9. Delicious and Nutritious Nachani Pudding is ready. Cut into pieces and serve it cold as dessert or a tea time snack.

10. You can store this in refrigerator for 3-4 days.

Nachani - Ragi Pudding (नाचणी पुडिंग)
Nachani – Ragi Pudding (नाचणी पुडिंग)
Nachani - Ragi Pudding (नाचणी पुडिंग)
Nachani – Ragi Pudding (नाचणी पुडिंग)

 

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

नाचणी पुडिंग माझी नाविन्यपूर्ण रेसिपी – Nachani Satva made more healthy and easy

नाचणी सत्व ही गोव्याची पारंपरिक रेसिपी आहे ज्यात नाचणीचं सत्व काढून गोड वड्या करतात. ही माझी रेसिपी नाचणीचं सत्व न काढता केलेली आहे . नाचणीचं सत्व काढताना नाचणीची सालं टाकून देतात. म्हणजे सगळा चोथा – fibre – टाकून देतात. माझ्या ह्या रेसिपीत मी नाचणीचं पीठ वापरते त्यामुळे fibre वापरला जातो. आणि कृती ही सोपी होते. नारळाचं दूध न घालता मी नारळ बारीक वाटून घालते त्यामुळे तिथेही वेळ आणि मेहनत वाचते. हे पुडिंग अतिशय स्वादिष्ट, बेताचं गोड आणि पौष्टिक असतं.

साहित्य (१ कप = २५० मिली) (६ जणांसाठी)

नाचणी पीठ पाऊण कप

ताजा खवलेला नारळ पाऊण कप

चिरलेला गूळ १ कप (चवीनुसार कमी / जास्त करा)

वेलची पूड पाव टीस्पून

काजूचे तुकडे २ टेबलस्पून

साजूक तूप १ टीस्पून

मीठ २३ चिमूट

कृती

. खवलेला नारळ थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. वाटलेला नारळ कपाने मोजून ठेवा.

. एका जाड बुडाच्या कढईत नाचणीचं पीठ घाला. पिठाच्या ३ पट नारळ+पाणी घालायचं आहे. म्हणजे सव्वा दोन कप नारळ+पाणी लागेल. तेवढं मोजून कढईत घालून मिश्रण एकजीव करा. गुठळी असेल तर मोडून घ्या. आता कढईत गूळ आणि मीठ घाला.

. मिश्रण मंद आचेवर सतत ढवळून शिजवत राहा. मिश्रण फार दाट झालं तर थोडं पाणी घाला. मिश्रण चॉकोलेट सॉस एवढं पातळ हवं. मिश्रण शिजल्यावर तुकतुकीत होईल.

. मिश्रण शिजलं का ते पाहण्यासाठी पाव टीस्पून मिश्रण चमच्यात काढून घ्या आणि थंड करा. थंड झाल्यावर मिश्रण चमच्याला न चिकटता निघालं तर मिश्रण शिजलंय नाहीतर आणखी काही वेळ मिश्रण शिजवा.

. मिश्रणात काजूचे तुकडे आणि वेलची पूड घाला.

. एका ताटलीला / डब्याला (साधारण ८ इंच व्यासाचा) साजूक तूप लावून घ्या.

. उरलेलं साजूक तूप मिश्रणात घालून ढवळून घ्या आणि मिश्रण ताटलीत / डब्यात काढून नीट पसरून घ्या.

. मिश्रण थंड झालं की २३ तास फ्रिजमध्ये ठेवा.

. स्वादिष्ट आणि पौष्टिक नाचणी पुडिंग तयार आहे. आवडीनुसार तुकडे करून थंडगार नाचणी पुडिंग डेझर्ट किंवा चहासोबत नाश्ता म्हणून खायला द्या.

१०. नाचणी पुडिंग फ्रिजमध्ये ३४ दिवस चांगलं राहतं.

Nachani - Ragi Pudding (नाचणी पुडिंग)
Nachani – Ragi Pudding (नाचणी पुडिंग)
Nachani - Ragi Pudding (नाचणी पुडिंग)
Nachani – Ragi Pudding (नाचणी पुडिंग)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes