Kasuri Methichi Bhakari (कसुरी मेथीची खमंग भाकरी / धिरडे) – Kasuri Methi Sweet Chilla / Dried Fenugreek Leaves Pan Cake

Kasuri Methichi Bhakari (कसुरी मेथीची खमंग भाकरी / धिरडे)
Kasuri Methichi Bhakari (कसुरी मेथीची खमंग भाकरी / धिरडे)

Kasuri Methichi Bhakari (कसुरी मेथीची खमंग भाकरी / धिरडे) – Kasuri Methi Sweet Chilla / Dried Fenugreek Leaves Pan Cake

कसुरी मेथीची खमंग भाकरी मराठी

This is my innovation of a traditional Goan / Konkani dish. In the traditional recipe fresh Methi / Fresh Fenugreek are used. In this variation I use Kasuri Methi / Dried Fenugreek Leaves. This gives a slight bitter taste to this sweet Bhakari / Pan Cake to make it super delicious. This is a healthy and quick breakfast / snack dish. It tastes different than the traditional Methi Bhakari But this too is very delicious.

Ingredients (1 cup = 250 ml) (Makes 8-9 Bhakari)

Kasuri Methi (Dried Fenugreek)Leaves 2 tablespoon

Wheat Flour 1.5 cup

Semolina Fine ½ cup

Jaggery crushed 3-4 tablespoon (adjust as per taste)

Green Chili paste 1 teaspoon

Tamarind pulp ½ teaspoon or buttermilk 2-3 tablespoon

Turmeric Powder ¼ teaspoon

White Sesame Seeds 1 tablespoon

Salt to taste

Oil / Butter 2 tablespoon

Instructions

1. Mix all ingredients except oil/ghee in a bowl.

2. Add water as required and mix to get a consistency thicker than Bhajia / Pan Cake batter.

3. Heat a flat non stick or Iron Griddle.

4. Place 2 serving spoonful of batter on the griddle, take little water in the hand and spread the batter evenly by using the fingers.

5. Cover it with a lid and cook on medium flame.

6. After 2-3 minutes, put a few drops of oil/butter on Bhakari and flip it over.

7. Cook both sides to get light brown colour. Serve hot with Ghee (Clarified Butter) / Butter. This delicious Bhakari tastes good without Ghee / butter also.

Note

1. You can add leftover chapati (crush it using grinder) to this batter. Add at least ¼ th measure of wheat flour along with it else the batter won’t have the right consistency.

Kasuri Methichi Bhakari (कसुरी मेथीची खमंग भाकरी / धिरडे)
Kasuri Methichi Bhakari (कसुरी मेथीची खमंग भाकरी / धिरडे)
Kasuri Methichi Bhakari (कसुरी मेथीची खमंग भाकरी / धिरडे)
Kasuri Methichi Bhakari (कसुरी मेथीची खमंग भाकरी / धिरडे)

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

कसुरी मेथीची खमंग भाकरी / धिरडे माझी नाविन्यपूर्ण पाककृती

गोव्याच्या पारंपरिक मेथीच्या भाकरीत ताजी मेथीची पानं घालतात. ह्या माझ्या नाविन्यपूर्ण पाककृतीत मी कसुरी मेथी घालते. गोव्यात धिरड्याला भाकरी म्हणतात. गुळाच्या गोडव्याचा जरा गोड पदार्थ आहे पण ह्यात मिरची सुद्धा घालतात आणि कसुरी मेथीची जरा कडसर चव ही आहे. त्यामुळे अतिशय स्वादिष्ट आणि खमंग होतो हा प्रकार. ह्या भाकरीसोबत खायला चटणी लागत नाही. साजूक तूप किंवा लोण्यासोबत अप्रतिम लागते ही भाकरी. नाश्त्यासाठी करायला हा एक पौष्टिक आणि झटपट होणारा पदार्थ आहे. नक्की करून बघा.

शिळ्या पोळ्या मिक्सरमध्ये फिरवून ह्या पिठात घालू शकता. त्यामुळे भाकरीचं टेक्सचर आणखी छान येतं.

साहित्य (९ भाकऱ्यांसाठी ) (१ कप = २५० मिली )

कसुरी मेथी २ टेबलस्पून

गव्हाचं पीठ दीड कप

बारीक रवा अर्धा कप

बारीक चिरलेला गूळ ३४ टेबलस्पून (चवीप्रमाणे कमी / जास्त करा)

ठेचलेली हिरवी मिरची १ टीस्पून / लाल तिखट अर्धा टीस्पून

चिंचेचा कोळ अर्धा टीस्पून किंवा ताक २३ टेबलस्पून

हळद पाव टीस्पून

तीळ १ टेबलस्पून

मीठ चवीनुसार

तेल / तूप २ टेबलस्पून

कृती

. तेल / तूप वगळून सगळे पदार्थ एका वाडग्यात एकत्र करा.

. थोडे थोडे पाणी घालून इडली च्या पिठासारखं भिजवा .

. एक नॉन स्टिक / लोखंडी तवा गरम करा.

. तव्यावर थोडे पाणी शिंपडून १ डाव पीठ घाला. हातात थोडे पाणी घेऊन पीठ तव्यावर नीट पसरा.

. झाकण ठेऊन २३ मिनिटे मध्यम आंचेवर भाजा.

. तेल/ तुपाचे २३ थेम्ब भाकरी वर पसरा आणि भाकरी परतून दुसऱ्या बाजूने भाजून घ्या.

. गरमागरम स्वादिष्ट भाकरी साजूक तूप किंवा लोण्याबरोबर खायला द्या.

टीप

. ह्या पिठात तुम्ही शिळी पोळीही घालू शकता. पोळीचे तुकडे मिक्सर मध्ये वाटून घ्या आणि पिठात घाला. गव्हाचे पीठ तेव्हढ्या प्रमाणात कमी करा. मात्र फक्त पोळीचा चुरा घालू नका . पाव पट गव्हाचं पीठ आवश्यक आहे नाहीतर पिठाला चिकटपणा येणार नाही.

Kasuri Methichi Bhakari (कसुरी मेथीची खमंग भाकरी / धिरडे)
Kasuri Methichi Bhakari (कसुरी मेथीची खमंग भाकरी / धिरडे)
Kasuri Methichi Bhakari (कसुरी मेथीची खमंग भाकरी / धिरडे)
Kasuri Methichi Bhakari (कसुरी मेथीची खमंग भाकरी / धिरडे)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes