Moong Ani Saatuchi Gulpapdi (मूग आणि सातूची गुळपापडी ) – Green Gram and Saatu / Sattu Burfi – No white sugar – My Innovative recipe

Moong Ani Saatuchi Gulpapdi (मूग आणि सातूची गुळपापडी )
Moong Ani Saatuchi Gulpapdi (मूग आणि सातूची गुळपापडी )

Moong Ani Saatuchi Gulpapdi (मूग आणि सातूची गुळपापडी ) – Green Gram and Saatu / Sattu Burfi – No white sugar – My Innovative recipe

मूग आणि सातूची गुळपापडी मराठी

Gulpapdi is an all time favorite Indian Snack. It’s traditionally made using Wheat flour, Jaggery and Ghee (Clarified Butter). This is a healthier version of Gulpapdi where I use Whole Moong Flour and Saatu / Sattu flour instead of Whole wheat flour. Saatu / Sattu flour is easily available in India. It is either made using roasted Bengal Gram (Chana) or by mixing Roasted Bengal Gram and Wheat. Sometimes Barley is also added to Saatu / Sattu. I generally use the later variant. But you can use any. The Gulpapdi made this way is very delicious and healthy. It is super tempting anytime snack.

Ingredients (1 cup = 250 ml)

Whole Moong (Green Gram) flour 1.5 cups

Saatu / Sattu Flour 1.5 cups

Jaggery Crushed/grated 2.5 cups

Pure Ghee (Clarified Butter) 1.25 cup – Use at room temperature

Dink (Edible Gum) 2 tablespoon

Sunth (Dry Ginger) Powder 2 tablespoon

Milk 2 tablespoon

Cardamom (Eliachy) Powder ¼ teaspoon

Instructions

1. Roast Dink (edible Gum) in Microwave till it’s puffed. Alternatively in a pan, add 2 tablespoon of Pure Ghee and fry Dink in it. Take it out in a plate.

2. In the same pan, add the remaining Ghee (save 1 teaspoon of Ghee for melting Jaggery) and melt it. Add Whole Moong Flour and Saatu Flour and roast on low flame till the colour changes to light brown and you get nice aroma of roasted flour.

3. Add Sunth (Dry Ginger) powder to the flour and roast it on low flame for 2-3 minutes.

4. Switch off the gas. Add milk to the pan and rigorously milk till the bubbles stop. Take out the roasted flour in a bowl.

5. In the same pan add 1 teaspoon of Ghee and crushed Jaggery. Heat it on low flame till Jaggery melts. Don’t heat further.

6. Pour melted Jaggery over the roasted flour, add fried Dink, Cardamom powder and mix well.

7. Spread the mixture on a greased plate and level it. While the mixture is warm, cut it into desired shape pieces (rectangular or diamond shape). Leave it to cool.

8. When the mixture comes to room temperature, take out the pieces and store in a container with lid.

9. Delicious Moong and Saatu Gulpapdi is ready. Relish it as anytime snack.

10. Gulpapdi can be stored for 3-4 weeks at room temperature. No need to refrigerate.

Note

1. Whole Moong flour is used in this recipe. Not Moongdal (Split Green Gram) flour.

2. If you don’t get Moong flour in the market, get Chhilakewai Moong Dal (Split Green Gram with husk). Dry roast it till light brown and you get nice aroma of roasted gram. After cooling grind it in grinder into fine powder.

3. Amount of Ghee (Clarified Butter) required for the recipe depends on coarseness of the flour. Fine flour needs less Ghee and coarse needs more.

Moong Ani Saatuchi Gulpapdi (मूग आणि सातूची गुळपापडी )
Moong Ani Saatuchi Gulpapdi (मूग आणि सातूची गुळपापडी )
Moong Ani Saatuchi Gulpapdi (मूग आणि सातूची गुळपापडी )
Moong Ani Saatuchi Gulpapdi (मूग आणि सातूची गुळपापडी )

 

==================================================================================

मूग आणि सातूची गुळपापडी माझी स्वतःची नाविन्यपूर्ण रेसिपी

गुळपापडी ही एक सगळ्यांना आवडणारी बर्फी आहे. पारंपरिक गुळपापडी कणिक, गूळ आणि तूप घालून करतात. ह्या माझ्या रेसिपीत मी कणकेऐवजी मुगाचं पीठ (अख्ख्या मुगाचं पीठ) आणि सातूचं पीठ घातलं आहे. सातूचं पीठ बाजारात विकत मिळतं किंवा तुम्ही घरीही करू शकता. सातूचं पीठ प्रकारचं असतं. फक्त डाळं (भाजके चणे जे आपण चिवड्यात घालतो)असलेलं किंवा डाळं आणि गहू असलेलं. कधी कधी त्यात बार्ली (जव) ही घालतात. मी बहुतेक वेळा डाळं, गहू आणि जव असलेलं सातूचं पीठ वापरते. पण तुम्ही दुसरे प्रकारही वापरू शकता.

ही गुळपापडी अतिशय खमंग आणि स्वादिष्ट लागते. चहासोबत खायला, नाश्त्यासोबत खायला किंवा मुलांना शाळेच्या डब्यात द्यायला छान पदार्थ आहे. नक्की करून बघा.

साहित्य (१ कप = २५० मिली )

मुगाचं पीठ दीड कप

सातूचं पीठ दीड कप

चिरलेला गूळ अडीच कप

साजूक तूप सव्वा कप

डिंक २ टेबलस्पून

सुंठ पावडर २ टेबलस्पून

दूध २ टेबलस्पून

वेलची पावडर पाव टीस्पून

कृती

. डिंक मायक्रोवेव्ह मध्ये फुलवून घ्या. त्यासाठी पेपर प्लेट मध्ये डिंक घालून, डिंकाला किंचित तुपाचा हात लावून प्लेट मायक्रोवेव्ह मध्ये ठेवून २३ मिनिटं हाय पॉवर वर गरम करा. डिंक छान कुरकुरीत होईल. गॅसवर डिंक फुलवायचा असेल तर एका कढईत २ टेबलस्पून तूप घालून गरम करा आणि त्यात डिंक घालून मंद आचेवर तळून घ्या. तळलेला डिंक एका ताटलीत काढून ठेवा.

. कढईत बाकीचं तूप (१ टीस्पून तूप वगळून ठेवा) घालून गरम करा. त्यात मुगाचं पीठ आणि सातूचं पीठ घालून मंद आचेवर पीठ खमंग भाजून घ्या. पिठाचा रंग हलका तपकिरी होईल आणि भाजलेल्या पिठाचा खमंग दरवळ येईल.

. कढईतल्या पिठात सुंठ पावडर घालून २३ मिनिटं मंद आचेवर परता.

. गॅस बंद करा. कढईत दूध घालून लगेच नीट ढवळून घ्या. पिठाचे बुडबुडे थांबेपर्यंत ढवळा. पीठ एका परातीत काढून घ्या.

. कढईत १ टीस्पून तूप घालून त्यात गूळ घालून वितळवून घ्या. गूळ वितळला की लगेच गॅस बंद करा.

. वितळलेला गूळ परातीतल्या पीठावर घाला. त्यात डिंक, वेलची पावडर घालून मिश्रण एकजीव करा.

. तूप लावलेल्या ताटलीमध्ये मिश्रण घालून समतल करून घ्या. मिश्रण कोमट असताना सुरीने उभ्या , आडव्या चिरा द्या.

. मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर गुळपापडीचे तुकडे काढून झाकणाच्या डब्यात ठेवा.

. मूग आणि सातूची स्वादिष्ट आणि पौष्टिक गुळपापडी तयार आहे. नाश्त्याला, चहासोबत गुळपापडीचा आस्वाद घ्या.

१०. गुळपापडी फ्रिजबाहेर ३४ आठवडे चांगली राहते.

टीप

. मुगाचे पीठ नसेल तर सालाची मुगाची डाळ सुकीच लालसर रंगावर भाजून घ्या आणि गार झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक पीठ करा.

. पिठाच्या रवाळ / बारीक पणावर तुपाचे प्रमाण ठरते. पीठ रवाळ असेल तर तूप जास्त लागते.

Moong Ani Saatuchi Gulpapdi (मूग आणि सातूची गुळपापडी )
Moong Ani Saatuchi Gulpapdi (मूग आणि सातूची गुळपापडी )
Moong Ani Saatuchi Gulpapdi (मूग आणि सातूची गुळपापडी )
Moong Ani Saatuchi Gulpapdi (मूग आणि सातूची गुळपापडी )

1 Comment

Your comments / feedback will help improve the recipes