Ambadicha Cake (अंबाडीचा केक) – Tasty Savory cake made using Roselle Or Gongura Leaves

Ambadicha Cake (अंबाडीचा केक)
Ambadicha Cake (अंबाडीचा केक)

Ambadicha Cake (अंबाडीचा केक) – Tasty Savory cake made using Roselle Or Gongura Leaves – My Innovative Recipe

अंबाडीचा केक मराठी

This is my Innovative recipe that won an award from the Popular Kalniryan Publication. Ambadi or Roselle or Gongura leaves are very Nutritious but not liked by many. Try this tasty savory eggless cake using Ambadi. I’m sure everyone will like it. This is an easy recipe that uses ingredients generally available in the kitchen.

You can relish this cake for breakfast or evening snack or even give it in the tiffin. One can have it by itself or have it along with Sweet Pickle or Chhunda or Tomato Sauce.

This cake can be baked in a pan in case you don’t have an oven.

Ingredients (1 cup = 250 ml)

Finely chopped Ambadi / Roselle / Gongura Leaves 1 cup

Fine Semolina 1 cup

Besan / Gram Flour 2 tablespoon

Curd (Dahi / Yogurt) 2 tablespoon

Crushed Garlic 2 teaspoon

Chili Flakes 1-1.5 teaspoon

Turmeric Powder ¼ teaspoon

Baking soda ¼ teaspoon

Baking powder ½ teaspoon

Oil 2 tablespoon + for greasing the tray

Salt to taste

Instructions

1. Mix Semolina, Chopped Roselle leaves, Gram Flour, Curd, Garlic, Chili Flakes, Turmeric Powder, Salt and Oil together in a bowl.

2. Gradually add water to the mixture and mix to get a batter of Pan cake consistency. Keep the batter covered for 10-15 minutes.

3. Add Baking Soda and Baking Powder to the batter and mix.

4. Grease a baking tray. Pour the mixture in the baking tray. Sprinkle some Chili Flakes. Gently Tap the baking tray on kitchen platform so that the mixture levels and air bubbles are removed.

Ambadicha Cake (अंबाडीचा केक)
Ambadicha Cake (अंबाडीचा केक)

5. Bake at 200 degree centigrade (pre-heated for 10 minutes) for 20-25 minutes till mixture is cooked. Check by piercing a toothpick. The toothpick should come out clean. If not, bake the mixture again for 5-7 minutes.

Ambadicha Cake (अंबाडीचा केक)
Ambadicha Cake (अंबाडीचा केक)

6. On cooling cut in desired shape pieces and serve. One can have it by itself or have it along with Sweet Pickle or Chhunda or Tomato Sauce.

7. If not consumed on the same day, store the cake in refrigerator. Before serving the refrigerated cake, heat it on a hot Griddle along with some oil / butter.

Note

1. If you don’t have an Oven, you can bake the cake in a Pan. It will take 30-25 minutes to bake this cake in pre-heated Pan . Check the cake after 30 minutes by inserting a toothpick. If not done, bake further and check after every 5 minutes.

2. If you don’t have Chili flakes, add crushed dry red chilies.

Ambadicha Cake (अंबाडीचा केक)
Ambadicha Cake (अंबाडीचा केक)
Ambadicha Cake (अंबाडीचा केक)
Ambadicha Cake (अंबाडीचा केक)

 

 

 

 

 

 

 

 

 

==================================================================================

अंबाडीचा केक चविष्ट, पौष्टिक तिखटमिठाचा केक माझी नाविन्यपूर्ण रेसिपी

ही माझी नाविन्यपूर्ण रेसिपी आहे. ह्या रेसिपीला कालनिर्णयचं बक्षीस मिळालं आहे. बऱ्याच जणांना अंबाडीची भाजी आवडत नाही. ती खाल्ली जावी म्हणून हा अंबाडीचा तिखटमिठाचा बिनअंड्याचा – Eggless केक. हा पौष्टिक आणि चविष्ट केक करायला अगदी सोपा आहे आणि नेहमी घरात असणारेच साहित्य ह्यात वापरले आहे.

हा केक तुम्ही ब्रेकफास्ट / नाश्ता म्हणून खाऊ शकता किंवा मुलांना / मोठ्यांना डब्यात सुद्धा देऊ शकता. हा केक असाच खाऊ शकता किंवा कैरीचा कायरस / मेथांबा / छुन्दा / सॉस सोबत खाऊ शकता.

ओव्हन नसेल तर हा केक कढईत किंवा पातेल्यात भाजू शकता.

साहित्य (१ कप = २५० मिली)

बारीक चिरलेली अंबाडीची पानं १ कप
बारीक रवा १ कप
बेसन २ टेबलस्पून
दही २ टेबलस्पून

लसूण ठेचून २ टीस्पून
चिली फ्लेक्स १दीड टीस्पून
हळद पाव टीस्पून
बेकिंग सोडा पाव टीस्पून
बेकिंग पावडर अर्धा टीस्पून
तेल २ टेबलस्पून + बेकिंग ट्रेला लावण्यासाठी

मीठ चवीनुसार

कृती

. एका वाडग्यात रवा, चिरलेली अंबाडीची पानं, बेसन, दही, लसूण, चिली फ्लेक्स,हळद, मीठ, तेल घाला आणि मिसळून घ्या.

. वाडग्यात थोडं थोडं पाणी घालून इडलीच्या पिठासारखं मिश्रण करा आणि १०१५ मिनिटं झाकून ठेवा.

. मिश्रणात बेकिंग सोडा, बेकिंग पावडर घालून मिश्रण एकजीव करा.

. केकच्या ट्रेला तेल लावून त्यात मिश्रण घाला. केकवर थोडे चिली फ्लेक्स भुरभुरवा. ट्रे ओट्यावर हलकेच आपटून घ्या म्हणजे पिठात हवेचे बुडबुडे असतील तर निघून जातील.

Ambadicha Cake (अंबाडीचा केक)
Ambadicha Cake (अंबाडीचा केक)

. ओव्हन २०० डिग्री सेन्टिग्रेड वर १० मिनिटं प्रीहीट करून केक २०२५ मिनिटं भाजून घ्या. टूथपीक घालून चेक करा. टूथपिकला केक चिकटला तर आणखी ५७ मिनिटं भाजा.

Ambadicha Cake (अंबाडीचा केक)
Ambadicha Cake (अंबाडीचा केक)

. केक थंड झाला की आवडीच्या आकाराचे तुकडे कापून खायला द्या. हा केक असाच छान लागतो. कधी कधी मी ह्या केकसोबत कैरीचा कायरस / मेथांबा देते. खूप छान लागतो. ब्रेकफास्ट किंवा नाश्त्यासाठी छान पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ आहे.

. हा केक लगेच संपला नाही तर फ्रिज मध्ये ठेवा. फ्रिजमधला केक खायला द्यायच्या आधी  तव्यावर थोडं तेल/ बटर लावून गरम करा.

टीप

. कढईत/ पातेल्यात केक भाजायचा असेल तर प्री हीटेड कढईत/ पातेल्यात ३०३५ मिनिटं केक मंद आचेवर भाजा. मिनिटानंतर चेक करा. केक भाजला नसेल तर आणखी थोडा वेळ भाजा आणि दर मिनिटांनी चेक करा.

. चिली फ्लेक्स नसतील तर सुक्या लाल मिरच्या जाडसर कुटून घाला.

Ambadicha Cake (अंबाडीचा केक)
Ambadicha Cake (अंबाडीचा केक)
Ambadicha Cake (अंबाडीचा केक)
Ambadicha Cake (अंबाडीचा केक)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes