Ratalyacha Kees (रताळ्याचा कीस) – Tasty and healthy snack using Sweet Potato

Ratalyacha Kees (रताळ्याचा कीस) - Sweet Potato Snack
Ratalyacha Kees (रताळ्याचा कीस)

Ratalyacha Kees (रताळ्याचा कीस) – Tasty and healthy snack using Sweet Potato

रताळ्याचा कीस मराठी

Quick, Healthy and tasty Snack/ breakfast dish. One can also eat this for Upwas (Fasting day). Sweet Potato is very nutritious, has good amount of Vitamin A, Potassium and fiber. Those who generally don’t like sweet potato will also like this preparation.

Ingredients (Serves 4)

Sweet potato ½ kilogram

Roasted Peanut coarse powder 2 tablespoon or more if you like

Green Chili paste 1 teaspoon

Fresh Scraped Coconut 1 tablespoon

Coriander leaves chopped 1 teaspoon

Lemon juice ½ teaspoon

Sugar ½ teaspoon

Pure Ghee / Clarified Butter) 3 teaspoons

Cumin Seeds ¼ teaspoon

Salt to taste

Instructions

1. Wash sweet potatoes and grate them along with the skin.

Grated Sweet Potato

2. In a pan heat 2 teaspoon of pure ghee / clarified butter on medium flame.

3. Add cumin seeds, wait till sputters.

4. Add green chili paste.

5. Add grated sweet potatoes and cover the pan.

6. Cook, on low flame, for 5 – 6 minutes (till sweet potatoes are cooked), stirring well every 2 minutes. Sometimes sweet potatoes cook much faster ; so be watchful.

7. Add salt, sugar, lemon juice, scraped coconut, peanut powder and chopped coriander

Add all ingredients to cooked Sweet Potato

8. Mix well, add 1 teaspoon pure ghee / clarified butter while mixing.

Serve hot.

Note:

1. Use Sweet potatoes immediately after grating. If you keep it for a while, it will turn black.

2. Other option is you dip grated sweet potato in water and squeeze water before using it. But sometimes the Kees may become soggy and sticky. It depends on the type of sweet potatoes. So best is to make it immediately after grating.

Ratalyacha Kees (रताळ्याचा कीस) - Sweet Potato Snack
Ratalyacha Kees (रताळ्याचा कीस)
Ratalyacha Kees (रताळ्याचा कीस) - Sweet Potato Snack
Ratalyacha Kees (रताळ्याचा कीस)

===================================================================================

रताळ्याचा कीस

उपवासासाठी स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ हवा असेल तर रताळ्याचा कीस नक्की करून बघा. मी बरेचदा सकाळच्या नाश्त्यासाठी बनवते. अगदी सोपा आणि पटकन होणारा पदार्थ आहेज्यांना रताळी आवडत नाहीत ते हा कीस आवडीने खातील.

साहित्य (४ जणांसाठी)

रताळी  अर्धा किलो 

शेंगदाण्याचं कूट २ टेबलस्पून

ठेचलेली हिरवी मिरची १ टीस्पून

ताजा खवलेला नारळ १ टेबलस्पून

चिरलेली कोथिंबीर १ टेबलस्पून

लिंबाचा रस अर्धा टीस्पून

साखर अर्धा चमचा (चवीनुसार कमी / जास्त करा )

साजूक तूप टीस्पून

जिरं पाव टीस्पून

मीठ चवीनुसार

कृती

. रताळी स्वच्छ धुवून किसून घ्या. सालं काढू नका

Grated Sweet Potato (किसलेली रताळी)

. एका कढईत २ चमचा साजूक तूप गरम करून त्यात जिरं आणि हिरवी मिरची घाला.

. रताळ्याचा कीस कढईत घाला.

. मंद आचेवर झाकण ठेवून ५६ मिनिटं शिजवा. पाणी घालू नका. ३ मिनिटांनी परता. कधीकधी  रताळी फार लवकर शिजतात.   म्हणून लक्ष ठेवा. फार शिजवू नका. रताळी  जरा मऊ झाला की पुरे.

. मीठ, साखर, लिंबाचा रस, शेंगदाण्याचं कूट, खवलेला नारळ, कोथिंबीर  घाला आणि मिक्स करा.

Add all ingredients to cooked Sweet Potato (शिजलेल्या किसात सर्व साहित्य घाला)

. १ चमचा तूप घाला आणि चांगलं मिक्स करा.

. गरमागरम रताळ्याचा  कीस खायला द्या.

टीप

. रताळ्याचा कीस लगेच वापरला नाही तर काळा पडतो. म्हणून शक्यतो रताळी किसून लगेच फोडणीला टाका.

. काही कारणासाठी कीस थोडा वेळ ठेवायला लागला तर पाण्यात बुडवून ठेवा. फोडणीला टाकताना कीस पिळून पाणी काढून टाका.

Ratalyacha Kees (रताळ्याचा कीस) - Sweet Potato Snack
Ratalyacha Kees (रताळ्याचा कीस)
Ratalyacha Kees (रताळ्याचा कीस) - Sweet Potato Snack
Ratalyacha Kees (रताळ्याचा कीस)

1 Trackback / Pingback

  1. Ratalyacha kees Recipe -

Your comments / feedback will help improve the recipes