Raisins Almond Eggless Cake (बेदाणे बदामाचा स्वादिष्ट एगलेस केक)

Raisins Almond Eggless Cake (बेदाणे बदामाचा स्वादिष्ट एगलेस केक)

Raisins Almond Eggless Cake (बेदाणे बदामाचा स्वादिष्ट एगलेस केक)

बेदाणे बदामाचा स्वादिष्ट एगलेस केक मराठी

I’ve been baking cake with Dates. Wanted to try something different. So I created this cake recipe that uses Raisins. This cake turned out to be soft, fluffy and very delicious; also the texture and colour were perfect. It’s an easy recipe.

Ingredients (1 cup = 250 ml)

Maida (All Purpose Flour) 1.5 cup

Raisins (Khishmish) 1 cup

Milk ¼ cup (approx)

Sugar ¾ cup (I used Demerara sugar to get nice dark colour of cake; you can use normal granulated sugar)

Butter / Oil ½ cup

Baking soda 1.5 teaspoon

Almonds 20-25

Cinnamon Powder ¼ teaspoon

Salt a pinch

Instructions

1. Wash Raisins. Put them in a bowl and Pour in 3 cups boiling water and soak for 30 minutes.

2. Sieve Flour, Baking soda and Salt together 2-3 times

3. Boil Almonds in water for 3-4 minutes and allow to cool. Peel almonds and cut them in thin slices OR make thin slices of raw almonds without boiling and peeling.

4. Drain Raisins. Grind Raisins and sugar together in a smooth paste

5. Transfer the contents into a big bowl

6. Add Butter / Oil; mix well

7. Preheat oven on 200 degrees; Grease the cake tin

8. Add 2 spoons Flour at a time and mix. Add little milk to make the mixture of right consistency. If raisins sugar paste is not very thick, you will need very little milk. (Cake mixture consistency)

9. After all Flour is added, add almond slices; leaving aside a few slices. Add Cinnamon powder

10. Transfer the batter to greased cake tin, spread the remaining almond slices on top and bake in oven for 30-35 min.

11. If the knife comes out clean; cake is baked. Leave it to cool for 10-15 min. Cut pieces of desired shape

12. Serve this rich, creamy and delicious Raisins Almond cake.

Tips for Making this a Vegan Recipe

1. Use Refined Oil instead of Butter.

2. Use Almond Milk instead of Dairy Milk.

Raisins Almond Cake
Raisins ALmond Cake

===================================================================================

बेदाणे बदामाचा स्वादिष्ट एगलेस केक

खजुराचा केक मी नेहमीच करते. मला वाटत होतं बेदाण्याचा केक छान होईल. म्हणून स्वतःच रेसिपी तयार केली आणि केक केला. केक खूप स्वादिष्ट, रीच आणि क्रिमी झाला. मुलांच्या खाऊच्या डब्यात, मधल्या वेळेला खायला छान पर्याय आहे. ओव्हन नसेल तर तुम्ही कढई मध्ये मीठ / वाळू चालून त्यावर जाळी ठेवा. त्यावर केकची ताटली ठेवून झाकण ठेवून केक भाजू शकता

साहित्य (१ कप = २५० मिली )

मैदा दीड  कप

बेदाणे (किशमिश) १ कप

दूध अंदाजे पाव कप

साखर पाऊण कप (मी ब्राऊन साखर वापरते; साधी साखर ही वापरू शकता)

बटर / तेल अर्धा कप (ह्या केक मध्ये तेल घातलं तरी चालते)

बेकिंग सोडा दीड टीस्पून

बदाम २०२५ (किंवा कुठलाही सुका मेवा)

दालचिनी पूड पाव टीस्पून

मीठ चिमूटभर

कृती

. बेदाणे धुवून एका वाडग्यात घाला. त्यात ३ कप उकळतं पाणी घाला आणि अर्धा तास झाकून ठेवा

. मैदा, बेकिंग सोडा आणि मीठ एकत्र २३ वेळा चाळून घ्या.

. बदाम ३४ मिनिटं पाण्यात उकळून थंड करा. सालं काढून टाकून बदामाचे काप करा

. बेदाण्यातलं पाणी काढून टाका. बेदाणे आणि साखर  मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट करून घ्या

. बेदाण्याची  पेस्ट एका वाडग्यात काढून त्यात बटर / तेल घालून मिक्स करा.

. ओव्हन १८० डिग्री सेंटीग्रेड वर प्री हीट करा. केकच्या ट्रे ला तूप लावून ठेवा

. २ चमचे मैदा मिश्रणात घालून मिक्स करा.मिश्रण फार दाट असेल तर थोडं दूध घाला

. सगळा मैदा मिक्स केल्यावर मिश्रणात बदामाचे काप (थोडे काप सजावटीसाठी ठेवा), दालचिनी पूड घालून मिक्स करा.

. मिश्रण केकच्या ट्रे मध्ये घाला. वरून बदामाचे काप घाला.

१०. ओव्हन मध्ये ३०३५ मिनिटं बेक करा.

११. बेदाणे  बदामाचा स्वादिष्ट, रिच आणि क्रिमी केक तयार आहे. आवडीनुसार कापून खायला द्या

टीप

. प्रत्येक ओव्हन च टेम्परेचर सेटिंग वेगवेगळं असतं. तुमच्या ओव्हन च्या अंदाजानुसार बेकिंग ची वेळ सेट करा.

Raisins Almond Eggless Cake (बेदाणे बदामाचा स्वादिष्ट एगलेस केक)
Raisins Almond Eggless Cake (बेदाणे बदामाचा स्वादिष्ट एगलेस केक)

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes