Suran (Yam / Jimikand) Halwa (सुरणाचा हलवा) – Yam Halwa

Suran (Yam / Jimikand) Halwa (सुरणाचा हलवा) - Yam Halwa

Suran (Yam / Jimikand) Halwa (सुरणाचा हलवा) – Yam Halwa

सुरणाचा हलवा मराठी

This recipe was told to me by my Aunty (Mavshi/Mousi). She is an excellent cook and she used to create innovative recipes till few years back. Now she is old but she still remembers most of the recipes. So when I meet her, I keep asking her about her cooking experiments. She told me ingredients of this recipe that she used to use. Based on that, I created this recipe with some modifications. This Halwa turned out to be very delicious. You don’t need Mava / Khoya / condensed milk for this; yet the taste is rich and creamy. One can also have this for Upwas (Fasting day). Suran is high carbohydrate, protein, vitamins, antioxidants, minerals, dietary fibres rich vegetable. So you have a new healthy dessert.

Ingredients (Serves 6)

Suran / Yam / Jimikand about 400-500 gms (Try to buy White Yam)

Fresh Scraped Coconut ¾ cup

Sugar / Crushed Jaggery ½ cup (adjust as per taste)

Lemon juice ½ teaspoon

Pure Ghee (Clarified butter) 2 teaspoons

Salt a pinch

Buttermilk 1 cup

Cardamom Powder ¼ teaspoon

Dry fruits as required

Instructions

1. Wash, peel and grate Suran . Mix Buttermilk with water and Dip grated Suran in that water. Leave it for 15-20 minutes.

2. In a pan heat 1 teaspoon of pure Ghee on medium flame.

3. Squeeze out water from grated Suran and add Suran to the pan. Sauté for 2 minutes.

4. Cook covered, on low flame, for 5-6 minutes or till suran is little soft, stirring well every 2 minutes. Do not add water. Sometimes Suran cooks much faster; so be watchful.

5. Add Fresh scraped coconut, sugar / jaggery and salt. Mix well. Cook till sugar / jaggery melts. Add lemon Juice.

6. Keep cooking on low flame till you get required consistency of Halwa.

7. Add Cardamom Powder and dry fruits. Mix.

8. Add 1 teaspoon pure ghee and Mix. Delicious Suran Halwa is ready.

9. You can Serve it hot or cold. Store it in refrigerator.

Suran (Yam / Jimikand) Halwa (सुरणाचा हलवा) – Yam Halwa
Suran (Yam / Jimikand) Halwa (सुरणाचा हलवा) – Yam Halwa

Note: Your palms may start itching after you cut Suran. Rub some kokum or tamarind to your palms; rub properly; leave for 2-3 minutes and then wash your hands using soap. Itching will stop.

    ==================================================================================

सुरणाचा हलवा (नाविन्यपूर्ण पौष्टिक गोड पदार्थ)

ही माझ्या मावशीने सांगितलेली रेसिपी आहे. माझी मावशी अगदी सुगरण आहे. तिला आता वयपरत्वे फार काही करता येत नाही पण सगळ्या रेसिपीज अजून आठवतात. आम्ही भेटतो तेव्हा मी तिला तिच्या रेसिपीज बद्दल विचारत असते. तिनी मला ह्या रेसिपीचं साहित्य सांगितलं जे ती वापरायची. त्यावरून मी ही रेसिपी बनवली माझ्या अंदाजाने थोडे बदल करून. हलवा फारच चविष्ट झाला. ह्याला मावा / दूध काही लागत नाही. तरीही हलवा रीच आणि क्रिमी बनतो. सुरण हा अतिशय पौष्टिक असतो. हा हलवा गूळ घालून बनवला तर छान पौष्टिक होतो. आणि हा हलवा उपासालाही चालतो.  

साहित्य (६ जणांसाठी)

सुरण ४००५०० ग्राम (शक्यतो पांढरा सुरण घ्या; त्याला खाज कमी असते)

ताजा खवलेला नारळ पाऊण कप

साखर / चिरलेला गूळ अर्धा कप (जरुरीप्रमाणे कमी / जास्त करा)

लिंबाचा रस अर्धा चमचा

साजूक तूप २ चमचे

मीठ चिमूटभर

ताक १ कप

वेलची पूड पाव चमचा

सुका मेवा आवडीनुसार

कृती

. सुरण स्वच्छ धुवून सालं काढून टाका. सुरण किसून घ्या. पाण्यात ताक मिक्स करून त्यात किसलेला सुरण घाला. सगळा कीस बुडेल एवढं पाणी घाला१५२० मिनिटं ठेवून द्या.

. एका कढईत १ चमचा साजूक तूप गरम करा. सुरणाचा कीस पिळून घेऊन तुपात घाला. ३ मिनिटं परता.

. झाकण ठेवून ५६ मिनिटं वाफ काढा. सुरण जरा मऊ झाला पाहिजे. पाणी घालू नकाकधी कधी सुरण पटकन शिजतो. त्यामुळे जरा लक्ष द्या.

. आता कढईत नारळ आणि साखर / गूळ घालून मिक्स करा आणि मंद आचेवर शिजवा. मधे मधे ढवळत राहा. साखर / गूळ वितळेपर्यंत ढवळत राहा.

. आता लिंबाचा रस घाला. हलवा हवा तेवढा घट्ट होईपर्यंत मंद आचेवर शिजवाझाकण ठेवू नका.

. वेलची पूड, सुके मेवे घाला. मिक्स करा.

. १ चमचा साजूक तूप घालून मिक्स करा. चविष्ट सुरणाचा हलवा तयार आहे.

. गरम / गार सर्व्ह करा. हा हलवा फ्रीज मध्ये ठेवावा लागतो

टीप

. कधी कधी सुरणामुळे हाताला खाज सुटते. अशा वेळी हाताला कोकम / चिंच चोळून २३ मिनिटं ठेवा आणि नंतर साबण लावून हात धुवून टाका. हाताची खाज बंद होईल.

Suran (Yam / Jimikand) Halwa (सुरणाचा हलवा) – Yam Halwa
Suran (Yam / Jimikand) Halwa (सुरणाचा हलवा) – Yam Halwa

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes