Matar Usal (मटार उसळ) – Green Peas Subji – No Onion Garlic Recipe

Matar Usal (मटार उसळ)
Matar Usal (मटार उसळ)

Matar Usal (मटार उसळ) – Fresh Green Peas Subji – No Onion Garlic Recipe

मटार उसळ मराठी

This is an easy, quick, non spicy yet tasty recipe of Matar (Green Peas). This recipe is followed in Maharashtrian Brahmin families. This is no onion, garlic recipe that requires a very few ingredients.

Ingredients (serves 4)

Green Peas (Matar) Pods 1 kilogram

Medium size Potato 2

Green Chili Paste ¾ teaspoon Or Slit Green Chilies 3-4

Sugar / Crushed Jaggery ½ – 1 teaspoon (adjust as per taste)

Lemon Juice ½ teaspoon

Scraped Fresh Coconut 2 tablespoon

Chopped Coriander 2 tablespoon

Salt to taste

For Tempering (Tadka)

Oil 1 teaspoon

Mustard Seeds ¼ teaspoon

Cumin Seeds (Jeera) ¼ teaspoon

Turmeric Powder ½ teaspoon

Asafoetida a pinch

Instructions

1. Remove peas from Green Peas pods and wash them.

2. Wash & Chop Potatoes into medium size pieces. I chop them without peeling. If you want, you can peel Potatoes and chop.

3. Heat oil in a pan on medium flame.

4. Add mustard seeds, wait for splutter; add cumin seeds, wait for sputters; add Turmeric Powder.

5. Add Asafoetida and Green Chili Paste / Green Chilies.

6. Turn Gas to low. Add Potato pieces, saute for 2 minutes; cover and cook for 2 minutes.

7. Add peas, saute and cook covered for 2-3 minutes.

8. Add hot water enough to cover half the peas; bring it to boil.

9. Cook covered till peas and potatoes are soft.

10. While cooking add small quantity of water if required.

11. Add scraped coconut, chopped coriander, Sugar/ Jaggery and Salt; bring it to boil. Add Lemon juice. Boil till small amount of water is left in the subji.

12. Serve hot. Goes well with Roti / Rice. I like it with Rice. Mix Matar Usal with Rice; add a spoonful of curd and enjoy. It’s very very yummy.

Matar Usal (मटार उसळ)
Matar Usal (मटार उसळ)
Matar Usal (मटार उसळ)
Matar Usal (मटार उसळ)

 

=================================================================================

मटार उसळ ब्राह्मणी पद्धतीची कांदा लसूण विरहित उसळ

मटारचा सिझन चालू झालाय. आता मटारची उसळ ४ वेळा तरी करायलाच पाहिजे. ब्राह्मणी पद्धतीची मटार उसळ अतिशय चविष्ट लागते. फक्त हिरवी मिरची, मीठ, साखर, लिंबाचा रस आणि तेलाची खमंग फोडणी घालून भाजीला मस्त चव येते. मटार उसळ आणि दही भात !! अहाहा !! अप्रतिम कॉम्बिनेशन !! पु. लं. च्या भाषेत चैनीची परिसीमा…  लिहितानाच तोंडाला पाणी सुटतंय.

काही जणी ह्या उसळीत तांदुळाच्या पिठाचं आळण लावतात. पण मी लावत नाहीमाझ्या मते त्याने उसळीची चव बदलते.

साहित्य (४ जणांसाठी)

मटार च्या शेंगा १ किलो

बटाटे २ मध्यम

वाटलेली हिरवी मिरची पाऊण टीस्पून / उभ्या चीर दिलेल्या हिरव्या मिरच्या ३

लिंबाचा रस अर्धा टीस्पून

ताजा खवलेला नारळ २ टेबलस्पून

चिरलेली कोथिंबीर २ टेबलस्पून

साखर/ चिरलेला गूळ  अर्धा ते एक चमचा (चवीनुसार कमी / जास्त करा)

मीठ चवीनुसार

फोडणीसाठी

तेल १ टीस्पून 

मोहरी पाव टीस्पून

जिरं पाव टीस्पून

हळद अर्धा  टीस्पून

हिंग चिमूटभर

कृती

. मटारचे दाणे काढून धुवून घ्या.

. बटाटे धुवून मध्यम आकाराचे तुकडे चिरून घ्या.    मी बटाट्याची सालं काढत नाही. तुम्हाला हवं असेल तर बटाटे सोलून चिरा.

. एका कढईत  तेल घालून मोहरी, जिरं, हळद, हिंगाची खमंग फोडणी करा. हिरवी मिरची घाला.

. गॅस बारीक करा. बटाट्याचे तुकडे घालून २ मिनिटं परतून घ्या. झाकण ठेवून २ मिनिटं  वाफ काढा. पाणी घालू नका

. मटारचे दाणे घाला. परतून घ्या. झाकण ठेवून २३ मिनिटं  वाफ काढा.

. मटार चे दाणे अर्धे बुडतील एवढं गरम पाणी घाला. मंद आचेवर मटार आणि बटाटे मऊ होईपर्यंत झाकण ठेवून शिजवा. अति  शिजवू नका. लागल्यास थोडे पाणी घाला.

. नारळ, कोथिंबीर, मीठ, साखर/ गूळ  घालून एक उकळी आणा. लिंबाचा रस घाला. भाजीला जेवढा रस हवा असेल त्यानुसार पाणी आटवून घ्या.

. गरमागरम चविष्ट मटार उसळ खायला द्या. भात, पोळी कशासोबत ही छान लागते.

Matar Usal (मटार उसळ)
Matar Usal (मटार उसळ)
Matar Usal (मटार उसळ)
Matar Usal (मटार उसळ)

 

2 Comments

Your comments / feedback will help improve the recipes