Nachani Nankhatai (नाचणी नानखटाई ) – Finger Millet Cookies

Nachani Nankhatai (नाचणी नानखटाई ) - Finger Millet Cookies

Nachani Nankhatai (नाचणी नानखटाई ) – Finger Millet Cookies

नाचणी नानखटाई मराठी

Traditional Indian Cookies are made from All Purpose flour (Maida), Sugar and Ghee(Clarified butter). We have been baking Nankhatai by following this recipe since my childhood. Those days, we used to take rolled Nankhatai to a nearby bakery for baking. That lovely aroma of freshly baked Nankhatai is too tempting. Any kind of cookies that you get in the market can’t beat it. I generally add Ghee Residue (Ghee sediments – Tupachi beri) in the dough that makes cookies more delicious. Of course, you can make Nankhatai without adding Ghee residue. This is a variation of standard Nankhatai where I use Nachani (Finger Millet) and wheat flour instead of All purpose flour. It makes Nankhatai healthy. It is necessary to add Wheat flour for binding as Nachani flour is not sticky (does not have gluten).

Ingredients (Makes 45-48 cookies) (1 cup = 250 ml)

Nachani (Finger Millet / Ragi) flour 2 cups

Wheat Flour 2 cups

Powdered sugar 2 cups (Add more if you like cookies more sweet)

Pure Ghee (Clarified butter) 1.5 cups (if you add ghee residue about a cup then reduce ghee to ¾ cup)

Salt a pinch

Baking Soda a pinch

Cardamom Powder ¼ teaspoon

Dry fruits as per choice

Instructions

1. Beat Ghee till it’s light and fluffy.

2. Mix powdered sugar and beat again for 5 minutes.

3. Add Nachani Flour, Wheat Flour, Salt, Baking Soda and Ghee Residue and mix well.

4. Add Cardamom powder and mix well.

5. Let the dough rest for 30 minutes.

6. Knead the dough for 2 minutes. If the dough is too dry and you are not able to roll cookies; add some more Ghee (one teaspoon at a time) and mix the dough.

7. Make small flattened round shaped or any other shaped cookies; place dry fruits on each cookie if you like.

8. Bake in Pre-heated oven for 15-20 minutes on 200 degrees.

9. The top of Nankhatai turns light brown when baked.

10. Store Nankhatai in air tight container.

Note

1. Set the timer as per settings of your oven as the heating differs from oven to oven.

2. You can bake Nankhatai in a pan also. It may take 20-25 minutes to bake Nankhatai in a pan.

 

Nachani Nankhatai (नाचणी नानखटाई ) – Finger Millet Cookies
Nachani Nankhatai (नाचणी नानखटाई ) – Finger Millet Cookies

====================================================================================

नाचणी नानखटाई / नानकटाई स्वादिष्ट बिस्किटं

सगळ्यांची आवडती नानखटाई बिस्कीटं बनवायला सोपी असतात. माझ्या लहानपणापासून आम्ही ही रेसिपी वापरून मैद्याची नानखटाई बनवतोयतेव्हा घरी ओव्हन नव्हता. म्हणून जवळच्या बेकरीत बिस्कीटं भाजायला घेऊन जायचो. ताज्या भाजलेल्या बिस्किटांचा तो दरवळ एवढा छान असायचा की बिस्कीटं खाण्यासाठी घरी जाईपर्यंत धीर धरणं फार कठीण होऊन जात असे. बाजारात मिळणाऱ्या कितीही महागड्या बिस्किटांना त्या नानखटाईची सर नाही.

ह्या नानखटाई मध्ये मी नाचणी आणि गव्हाचे पीठ समप्रमाणात घालते. नाचणीला चिकटपणा नसतो त्यामुळे गव्हाचे पीठ घालावं लागतं. ही नानखटाई नेहमीच्या नानखटाई पेक्षा पौष्टिक आहे.

मी नानखटाई बनवताना तुपाची बेरी (Ghee Residue / Ghee Sediments) घालते. तुम्हाला नको असेल तर तुम्ही फक्त तूप घालू शकता. साजूक तुपाची नानखटाई अप्रतिम लागते.

साहित्य (४५४८ नानखटाई साठी) (१ कप = २५० मिली)

नाचणीचं पीठ २ कप

गव्हाचं पीठ २ कप

पिठीसाखर २ कप

साजूक तूप दीड कप (तुपाची बेरी १ कप घालायची असेल तर तूप पाऊण कप घाला)

बेकिंग सोडा १ चिमूट

मीठ १ चिमूट

वेलची पूड पाव टीस्पून

सुका मेवा आवडीनुसार

कृती

. तूप हलकं होईपर्यंत फेटून घ्या.

. त्यात पिठीसाखर घालून पुन्हा ५ मिनिटं फेटून घ्या.

. त्यात नाचणीचं पीठ, गव्हाचं पीठ, तुपाची बेरी, बेकिंग सोडा, मीठ घालून चांगलं मळून घ्या.

. वेलची पूड घालून पीठ एकजीव करा.

. पीठ अर्धा तास झाकून ठेवा.

. पीठ जरा मळून घ्या. पीठ खूप सुकं असेल आणि गोळे बनवता येत नसतील तर थोडं तूप (१ टीस्पून) घालून मिक्स करा.

. पिठाचे छोटे गोळे बनवून हव्या त्या आकाराची बिस्किटं बनवा. वर सुका मेवा लावा.

. प्रीहिटेड ओव्हन मध्ये २०० डिग्री ला १५२० मिनिटं बेक करा.

. बिस्किटं वरून लालसर होईपर्यंत भाजा.

१०नानखटाई हवाबंद डब्यात ठेवा.

टीप

. ओव्हन चा टायमर तुमच्या ओव्हन च्या सेटिंग प्रमाणे लावा. प्रत्येक ओव्हन चं तापमान वेगवेगळं असतं.

. ओव्हन नसेल तर तुम्ही कढईत / पातेल्यात ही बेक करू शकता. त्यासाठी कढईत / पातेल्यात वाळू / मिठाचा थर द्या. त्यावर एक स्टॅन्ड ठेवून ५१० मिनिटं कढई / पातेलं गरम करून घ्या (प्रीहीट). स्टॅण्डवर बिस्किटांची ताटली ठेवा आणि झाकण लावून मंद आचेवर भाजा. भाजायला २०२५ मिनिटं लागतील. मधे मधे चेक करा.

Nachani Nankhatai (नाचणी नानखटाई ) – Finger Millet Cookies
Nachani Nankhatai (नाचणी नानखटाई ) – Finger Millet Cookies

 

Be the first to comment

Your comments / feedback will help improve the recipes