Alsi / Javas Chutney (अळशी / जवस चटणी) – Flax Seeds Chutney
Flax seeds (Alsi / Javas) are rich in fibre, a number of vitamins, minerals and provide good amount of protein. They are one of the best sources of heart healthy Omega-3 fatty acids. One should regularly have these in daily diet. This dry chutney has Alsi, Karale Til (Niger seeds / Khurasni), Dry coconut and Garlic. Karale til is not commonly used in many households. It is rich source of Calcium. Karale Til are called Khurasni in Gujrati, Ramtil in Hindi and Niger seeds in English. In case you don’t have these, you can use normal black til (Black Sesame seeds).
This chutney goes well with any Chilla, Ghavan, Roti and curd rice.
Ingredients (1 cup = 250 ml)
Alsi /Javas / Flax Seeds 1 cup
Niger seeds (Karale Til or Khurasni) ½ cup
Dried coconut (Khopra) grated 1 cup
Garlic cloves ½ cup
Red chili Powder 1.5 teaspoon (or as per taste)
Jaggery crushed 1 teaspoon (optional)
Tamarind dry pulp 1 teaspoon Or Amchoor 1 teaspoon
Salt to taste
Instructions
1. Roast Alsi and Karale Til / Khurasni separately till they start sputtering.
2. Roast the grated dried coconut till it is light brown.
3. Peel the garlic cloves.
4. Transfer Karale til to a grinder. Turn the grinder on pulse for three or four seconds. Avoid pulsing it for more than a few seconds, or the seeds may clump together. Attempting to grind too many seeds at once may also result in clumping.
5. Coarse grind roasted Alsi in similar way.
6. On cooling grind the roasted grated coconut in a grinder to get coarse powder.
7. Crush garlic cloves separately into a smooth paste. Add salt, red chili powder, Jaggery and tamarind and mix well.
8. Add Alsi powder, Karale til powder, coconut powder to garlic mixture, grind to form a uniform mixture.
9. Tasty Alsi Chutney is ready. Relish with any Chilla, Ghavan, Roti or Curd Rice.
Note
1. This chutney lasts for 2 to 3 weeks without refrigeration if stored in an air-tight container.
2. For best taste and texture, pound this chutney using mortal and pastel.
==================================================================================
अळशी / जवस चटणी
अळशी / जवस / flax सीड्स हे एक बहुपयोगी धान्य (तेलबिया) आहे. Flax seeds (Alsi / Javas) are rich in fibre, a number of vitamins, minerals and provide good amount of protein. They are one of the best sources of heart healthy Omega-3 fatty acids. प्रत्येकाने रोजच्या जेवणात याचा वापर केला पाहिजे. अळशी वापरून एक चविष्ट चटणी करता येते जी तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता – धिरडं, घावन, पोळी. भाकरी किंवा दही भातासोबत ही. खूप तेल आणि मीठ घातलेल्या लोणच्यांपेक्षा ही चटणी खूपच पौष्टिक आहे. ह्यात कारळे तीळ (खुरासणी / राम तीळ / Niger seeds), सुकं खोबरं आणि लसूण घातलेली आहे. कारळे तिळामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम असतं. कारळे तीळ नसतील तर तुम्ही साधे काळे तीळ किंवा पांढरे तीळ वापरू शकता.
ही चटणी खलबत्त्यात कुटली तर जास्त चविष्ट लागते आणि टेक्सचर ही छान येते.
साहित्य (१ कप = २५० मिली)
अळशी / जवस १ कप
कारळे तीळ अर्धा कप
किसलेलं सुकं खोबरं १ कप
लसूण अर्धा कप
लाल तिखट दीड टीस्पून (चवीप्रमाणे कमी / जास्त करा)
चिरलेला गूळ १ टीस्पून (ऐच्छिक)
चिंच १ टीस्पून / आमचूर १ टीस्पून
मीठ चवीनुसार
कृती
१. कारळे तीळ आणि अळशी वेगवेगळे सुकेच मंद आचेवर भाजून घ्या. तीळ आणि अळशी तडतडेपर्यंत भाजावी म्हणजे खमंग लागते. वेगवेगळ्या ताटल्यात काढून गार करा.
२. सुकं खोबरं मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजून घ्या.
३. लसूण सोलून घ्या.
४. कारळे तीळ आणि अळशी मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. मिक्सर “पल्स” मोड वर फिरवा. जास्त वेळ फिरवलात तर पीठ बारीक आणि तेलकट होईल.
५. सुकं खोबरं मिक्सरवर जाडसर वाटून घ्या.
६. लसूण बारीक वाटून घ्या. त्यात लाल तिखट, गूळ, चिंच आणि मीठ घालून एकजीव करा.
७. अळशी, कारळे आणि खोबरं लसणाच्या मिश्रणात घालून एकत्र करा. एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या म्हणजे चटणी छान एकजीव होईल.
८. अळशीची चविष्ट चटणी तयार आहे. धिरडं, घावन, पोळी, भाकरी किंवा दहिभातासोबत खायला द्या.
टीप
१. ही चटणी हवाबंद डब्यात ठेवून फ्रिजबाहेर २–३ आठवडे चांगली राहते.
२. ही चटणी खलबत्त्यात कुटली तर जास्त चविष्ट लागते आणि टेक्सचर ही छान येते.
How do I get or update with your receipes.
Dear Rekha,\nWrite a comment on any of the recipes on this blog and click on “notify me on new posts”. You will get an intimation when a new recipe is posted on the blog.\nSudha
I would like to get your receipes on mail
There is no facility to provide recipes on mails. \nSudha