Dalimbi Usal (डाळींबी उसळ ) – Val Usal / Field Beans Usal – No Onion Garlic Recipe
Usal is a subji with gravy generally made from sprouts. Dalimbi Usal is a Maharashtrian delicacy. It is made from beans and not from pomegranate as the name may suggest. There are two types of Val – Sweet ones and Bitter ones. This is made from the bitter ones. Jaggery is added to reduce the bitterness of Val. Fairly easy recipe after you remove the skin from the sprouted beans. Most Maharashtrians like this Usal.
Ingredients (Serves 3) (1 cup = 250 ml)
Kadu Val (Bitter Field beans) 1 cup
Crushed Jaggery 1 tablespoon
Goda Masala (Spice Powder) ½ teaspoon
Curry leaves 5-6
Green Chili Paste ½ teaspoon or Slit Green Chilies 4-5
Fresh scraped coconut 3 teaspoon
Chopped coriander 2 teaspoon
Kokum 3-4
Salt to taste
Oil 1 teaspoon
Mustard seeds ¼ teaspoon
Cumin Seeds ¼ teaspoon
Asafoetida (Hing) a pinch
Turmeric ¼ teaspoon
Instructions
1. Wash and Soak Val in water for 8 hours.
2. Drain the water and wrap Val tightly in a dry cloth and keep it in a covered pan for 16-18 hours for them to sprout.
3. Add water to sprouted Val so that it becomes easy to remove the skin (dark brown cover on Val).
4. Remove skin from sprouted Val. Now they are ready to be used.
5. In a pan, heat oil on medium flame. Add Mustard seeds, wait till splutter; add cumin seeds, wait till splutter. Add Asafoetida (hing), Curry leaves and Green chili paste / Green chilies.
6. Add Val, Turmeric and saute. Cover and cook for 2 minutes.
7. Add water little more than what is required to cover the Val. Add Kokum. Cook covered till Val are soft. You can also use pressure cooker to cook Val but there is a possibility of overcooking in pressure cooker. Hence I prefer to cook without pressure cooker.
8. Add Jaggery, Goda Masala, Salt, Coconut and Coriander.
9. Cook till Jaggery dissolves. Usal should not be watery. Reduce further if there is too much water.
10. Dalimbi Usal is ready. Serve hot with Chapati or Bhakri Or Rice.
11. If you mix Dalimbi nUsal with curd while eating, it tastes awesome.
==================================================================================
डाळींबी उसळ – महाराष्ट्रीयन स्पेशालिटी – कांदा लसूण विरहित चविष्ट उसळ
वाल दोन प्रकारचे असतात – गोडे वाल (पावटे) आणि कडवे (कडू) वाल. डाळींबी उसळ कडू (कडवे) वालाची करतात. काही जणांना ही उसळ अतिशय आवडते तर काही जणांना अजिबात आवडत नाही. जराशी कडवट चव असलेली पण चविष्ट अशी ही उसळ करायला सोपी आहे (वाल सोलून झाल्यावर). कांदा लसूण नाही; वाटण नाही; अशी ही ब्राह्मणी पद्धतीची उसळ. पूर्वीच्या काळी लग्न, मुंजीच्या जेवणावळीत हमखास असणारी उसळ.
साहित्य (३ जणांसाठी) (१ कप = २५० मिली )
कडू वाल १ कप
चिरलेला गूळ १ टेबलस्पून (चवीनुसार कमी / जास्त करा )
गोड मसाला अर्धा टीस्पून
कढीपत्ता ५–६ पानं
ठेचलेली हिरवी मिरची अर्धा टीस्पून किंवा उभी चीर दिलेल्या हिरव्या मिरच्या ४–५
ताजा खवलेला नारळ ३ टीस्पून
चिरलेली कोथिंबीर २ टीस्पून
कोकम ३–४
मीठ चवीनुसार
तेल १ टीस्पून
मोहरी पाव टीस्पून
जिरं पाव टीस्पून
हिंग १ चिमूट
हळद पाव टीस्पून
कृती
१. कडू (कडवे)वाल धुवून ८ तास पाण्यात भिजवून ठेवा. ८ तासानंतर पाणी उसपून टाका आणि एका एका चाळणीत घालून झाकून ठेवा. १६–१८ तासानंतर छान मोड येतील.
२. वालात पाणी घालून थोडा वेळ ठेवा म्हणजे त्याची सालं सोलायला सोपं होईल.
३. वालाची सालं सोलून घ्या. सालं काढलेले वाल परत थोडा वेळ पाण्यात ठेवा.
४. तेल गरम करून मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरची घालून फोडणी करा.
५. त्यात वाल, हळद घालून परतून घ्या. नंतर पाणी न घालता झाकण ठेवून २ मिनिटं वाफवून घ्या.
६. कोकम घाला. वाल बुडतील त्यापेक्षा थोडं जास्त पाणी घालून उकळी आणा. झाकण ठेवून वाल शिजवा. फार मऊ करू नका. हवं असेल तर भाजी प्रेशर कुकर मध्ये शिजवू शकता. पण त्यात ती जास्त शिजण्याची शक्यता असते. म्हणून जरा लक्ष देऊन शिजवा.
७. वाल शिजल्यावर त्यात गूळ, गोड मसाला, नारळ, कोथिंबीर घाला गूळ वितळेपर्यंत शिजवा.
८. रस जेवढा हवा असेल तसं पाणी घाला / आटवा. ह्या उसळीला फार रस नसतो.
९. गरमागरम डाळिंबी उसळ पोळी / भाकरीसोबत खायला द्या. आम्ही ह्या भाजीत थोडं दही मिसळून खातो (तळ कोकणातली पद्धत). अप्रतिम लागते.
Your comments / feedback will help improve the recipes