Methi Ghavan / Methi Pudla (मेथी घावन) – Rice Crepes with Fenugreek Leaves
This is a Maharashtrian style instant Dosa/ Crepe that does not require any fermentation. Ghavan in Marathi is Chilla that has Rice Flour as Major ingredients – as they call it in Master Chef – Hero of the dish. Sometimes we add other ingredients to it – Methi (Fenugreek Leaves) is one of them. Methi Ghavan requires very few ingredients. This is a quick, tasty and healthy Breakfast / Snack recipe.
Ingredients (1 cup = 250 ml) (Makes 7-8 Ghavan)
Methi (Fenugreek) Leaves washed and chopped ½ cup
Rice Flour 1 cup
Garlic Cloves 7-8 diced in small pieces
Chili Paste ½ teaspoon
Salt to taste
Curd 1 tablespoon
Cumin Seeds ½ teaspoon
Ghee (Clarified Butter) to be used while roasting
Instructions
1. Mix chopped Methi leaves, Rice Atta, Garlic pieces, chili paste, curd, cumin seeds and salt. Add water to make mixture of consistency thiner than dosa / crepe batter.
2. Heat a flat non stick Griddle (Tava). Turn gas to medium flame. Do not sprinkle water as we do for Dosa. Griddle should be hot. Take a cup (small) full of batter and pour it on griddle to form a thin layer.
3. Cover Griddle with a lid and cook on medium flame for 1-2 minutes.
4. Remove the lid. You should not see any wet batter on the front side of Ghavan. If you do, then cook further. Put 2 drops of ghee on front side and spread over Ghavan. It is better not to put ghee on griddle as it gets burnt and wasted. It is always better to spread it on Ghavan.
5. Flip the Ghavan to cook the other side. The side that it on the top, you will see nice mesh (Jaali). This means it’s perfect Ghavan. Now don’t cover it. Spread 2 drops of ghee on the side on top as well. It takes 2 minutes to cook. On the side that is touching the griddle, you should see small light brown patches. Then it’s done. You can lift it a bit from a side and check.
6. Serve with Home made butter and/or Peanut Chutney. Tastes awesome.
==================================================================================
मेथी घावन – पौष्टिक आणि स्वादिष्ट
घावन हा कोकणातला प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. बऱ्याच जणांना आंबोळी आणि घावन एकच आहेत असं वाटतं. पण दोन्ही अगदी वेगळे पदार्थ आहेत. आंबोळी हे उत्तप्यासारखे असतात – तांदूळ, उडीद डाळ भिजवून, वाटून, आंबवून केलेले. तर घावन तांदुळाच्या पिठाचे करतात. घावन हे तांदूळ भिजवून, वाटून ही करू शकता पण पीठ आंबवलेलं नसतं. तांदुळाचं पीठ वापरून अगदी झटपट घावन करता येतात. अगदी पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ आहे.
घावन ७–८ प्रकारे करता येतात. ताजी मेथी घालून केलेले घावन अतिशय स्वादिष्ट लागतात. फक्त चिरलेली मेथी, तांदुळाचं पीठ, थोडं दही, लसूण, हिरवी मिरची, जिरं आणि मीठ घालून पातळ पीठ भिजवायचं. आणि अगदी गरम तापलेल्या तव्यावर हे पीठ ओतायचं.
साहित्य ( ७–८ घावन बनविण्यासाठी ) (१ कप = २५० मिली )
बारीक चिरलेली मेथी अर्धा कप
दही १ टेबलस्पून
तांदुळाचे पीठ १ कप
लसूण ७–८ पाकळ्या
ठेचलेली हिरवी मिरची अर्धा टीस्पून
जिरं अर्धा टीस्पून
मीठ चवीनुसार
तूप घावन भाजताना लावण्यासाठी
कृती
१. लसूण सोलून बारीक तुकडे करून घ्या.
२. एका पातेल्यात तांदुळाचे पीठ, मेथी, लसूण तुकडे, दही,हिरवी मिरची आणि मीठ घाला . पाणी घालून भिजवा. गुठळ्या होऊ देऊ नका . पीठ अगदी पातळ भिजवा (रवा डोसा पिठा सारखे ).
३. एक सपाट नॉन स्टिक तवा गरम करा. वाफ येईपर्यंत गरम झाला पाहिजे.
४. गॅस मोठा असताना एका डावाने पीठ तव्यावर घाला. डाव तव्यापासून थोडा दूर धरून डाव हळू हळू गोल फिरवत पीठ तव्यावर घाला म्हणजे पातळ घावन घातला जाईल . आता गॅस मध्यम करून झाकण ठेऊन १–२ मिनिटे भाजा .
५. झाकण काढून घावन परतून घ्या . वरून थोडे तूप सोडा आणि दुसऱ्या बाजूने झाकण न ठेवता भाजून घ्या
६. गरमागरम घावन चटणी आणि लोण्याबरोबर खावयास द्या . फार चविष्ट लागतात.
Your comments / feedback will help improve the recipes