Raw Mango Muramba (मुरंबा) – Raw Mango Jam
Muramba is everyone’s favorite. Children love it. When you are bored of eating subji, having Muramba with Roti is a great option. This is Maharashtrian style Muramba recipe. My mother and grand mother used to make Muramba with this recipe. It’s a very easy recipe; does not require many ingredients. Makes delicious Muramba.
My Tips
1. Use Raw Mangoes that are not very sour. Special mangoes are available in the market for Muramba.
2. Amount of Sugar required for Muramba depends on the sourness of Raw Mangoes. Hence it is better to add less sugar to start with and then add more if required.
3. If you are making Muramba for the first time, you will tend to cook it till you get the required thickness. But Muramba thickens when it cools so mostly you will land up with very thick Muramba. So stop cooking when it is fluid.
4. My mother used to store Muramba at room temperature and it used to last for months. But my experience in last few years is that Muramba gets spoiled after a couple of months. So I would recommend storing it in refrigerator.
Ingredients (1 cup = 250ml)
Peeled and Grated Raw Mangoes 2 cups
Sugar 3- 3.5 cups (adjust as per taste)
Salt ¼ teaspoon
Cloves 8-10
Saffron 5-6 strings (optional)
Instructions
1. In a steel pan, mix grated raw mangoes and sugar and keep covered for 5-6 hours.
2. Cook it on medium flame stirring regularly.
3. After 10 minutes add salt, cloves and saffron.
4. Keep cooking. Taste it to check if sugar is enough. If required, add sugar.
5. Keep cooking till Muramba is sticky. It should be fluid. It thickens when cool so don’t make it too thick.
6. Switch off the gas and allow it to cool completely.
7. Store in bottles (preferably glass bottles).
8. Add some Desi Ghee (Clarified Butter) to Muramba and then have it with Chapati / Roti. It tastes awesome.
==================================================================================
मुरंबा
मुरंबा सगळ्यांचा आवडता प्रकार आहे. जेवणात तोंडीलावणं म्हणून किंवा कधी भाजी खायचा कंटाळा आला तर पोळीसोबत खायला, पावाच्या टोस्टवर लावायला असा कधीही मुरंबा मदतीला येतो. ही कैरीच्या मुरंब्याची पारंपारीक रेसिपी आहे. माझी आई, आजी हीच रेसिपी वापरून मुरंबा करायच्या. कृती अगदी सोपी आहे.
नेहमीप्रमाणे माझ्या टीप्स
१. मुरंब्यासाठी खास कैऱ्या मिळतात त्या वापराव्या. त्या जरा कमी आंबट असतात.
२. मुरंब्यात किती साखर घालायची हे कैरीच्या आंबटपणावर अवलंबून आहे. सुरुवातीला कमी साखर घालून नंतर चव बघून लागेल तशी साखर घालणं हे उत्तम.
३. पहिल्यांदा मुरंबा करत असाल तर तो किती आटवायचा याचा अंदाज येत नाही. नेहमीची चूक म्हणजे मुरंबा जास्त आटवला जातो आणि थंड झाल्यावर तो आणखी घट्ट होतो. मुरंबा शिजवताना चिकट झाला आणि मिश्रण प्रवाही असेल तेव्हा गॅस बंद करावा. म्हणजे थंड झाल्यावर मुरंबा असायला हवा तेवढा घट्ट होतो.
४. माझी आई मुरंबा कधीच फ्रिजमध्ये ठेवत नसे. आणि तो वर्षभर छान राहत असे. पण काही वर्षांपूर्वी मी केलेला मुरंबा बाहेर ठेवून खराब झाला. तेव्हापासून मी मुरंबा फ्रिजमध्ये ठेवते. एका लहान बाटलीत मुरंबा काढून खाण्यासाठी फ्रिजबाहेर ठेवते. तो संपला की परत बाटली भरते.
साहित्य (१ कप = २५० मिली)
सोलून किसलेल्या कैरीचा कीस २ कप
साखर ३ – ३.५ कप (चवीनुसार कमी/ जास्त करा)
लवंग ८–१०
मीठ पाव टीस्पून
केशर ५–६ काड्या (ऐच्छिक)
कृती
१. एका स्टीलच्या पातेल्यात कैरीचा कीस आणि साखर एकत्र करून ५–६ तास झाकून ठेवा.
२. मिश्रण मध्यम आचेवर शिजवा. मध्ये मध्ये ढवळत रहा.
३. १० मिनिटांनंतर मिश्रणात लवंग, केशर आणि मीठ घाला.
४. मिश्रण शिजवत रहा.
५. चव घेऊन बघा. जरूर असल्यास आणि साखर घाला.
६. मिश्रण शिजवत रहा. मिश्रण चिकट व्हायला पाहिजे पण प्रवाही (fluid) असलं पाहिजे. मुरंबा गार झाला की आळतो (घट्ट होतो) म्हणून शिजवताना फार घट्ट करू नका.
७. गॅस बंद करून मुरंबा पूर्ण गार झाला की बरणीत (शक्यतो काचेच्या बरणीत) भरून ठेवा.
८. मुरंबा खाताना त्यात थोडं साजूक तूप घालून खावा. पानात तोंडीलावणं म्हणून किंवा कशाबरोबर ही अप्रतिम लागतो.
Your comments / feedback will help improve the recipes