Sabudana Khichadi (साबुदाणा खिचडी – मायक्रोवेव्ह रेसिपी) – Snack using Sago / Tapioca Perls – Microwave Recipe

Sabudana Khichadi / Khichdi (साबुदाणा खिचडी मायक्रोवेव्ह रेसिपी) – Snack using Sago / Tapioca Perls – Microwave Recipe

साबुदाणा खिचडी- मायक्रोवेव्ह रेसिपी मराठी

This is an all time favorite preparation in Western India. Many people find it difficult to make. Sometimes it becomes soggy, sometimes it is dry. You need to keep stirring it regularly to avoid forming lumps. You need to add more ghee (clarified butter) to avoid it sticking to the pan. To overcome all these problems, check this recipe where I make it in microwave. It just needs 1.5 teaspoon of ghee and Khichadi comes out with nice texture. No problem of sticking khichadi to the pan. Try this method; you will like it.

Ingredients (Serves 6) (1 cup = 250 ml)

Sabudana (Sago / Tapioca Pearls) 2 cups

Potato medium size 2

Roasted Groundnut powder 2-3 tablespoon (add more if you like)

Pure Ghee (Clarified Butter) 1.5 teaspoons

Sugar ½ – 1 teaspoon

Fresh scraped Coconut 2 tablespoon

Chopped Coriander leaves 1 teaspoon

Lemon juice ½ teaspoon

Green Chilly Paste 1 teaspoon

Cumin Seeds (Jeera) ¼ teaspoon

Salt to taste

Instructions

1. Wash Sabudana and soak in water for 6 hours. Add just enough water in the bowl to cover Sabudana. This is an important step in this recipe. If water is too much, Khichadi will be soggy and will have lumps. If water is less, Khichadi will be dry.

Soaked Sabudana (भिजवलेला साबुदाणा)

2. Since the soaked sabudana will be lumpy, loosen it by hand.

3. Mix roasted groundnut powder, Salt and Sugar with sabudana.

Add Roasted Peanut powder, salt and sugar to soaked Sabudana (साबुदाण्यात शेंगदाण्याचं कूट, मीठ, साखर घाला)

4. Wash potato, chop it into medium thin slices. I don’t peel potatoes; If you want, you can peel and then chop.

5. In a small pan, heat ½ teaspoon of pure ghee on medium flame.

6. Add Cumin Seeds, wait till sputters.

7. Add green chilly paste and potato pieces.

Add potato slices and chilly paste to the pan (मिरची आणि बटाट्याच्या काचऱ्या फोडणीत घाला)

8. Cook covered on low flame; stirring after every 2 minutes.

9. Mix Sabudana mixture along with cooked potato in a microwave safe bowl with lid.

10. Cook covered in microwave on high for 2 minutes, take the bowl out of microwave; stir the mixture.

11. Cook covered for about 6 minutes on high power or till Sabudana is uniformly transparent and soft. Stop the microwave and stir, every 1 minute to avoid formation of lumps.

13. When cooked, add fresh scraped coconut, chopped coriander, lemon juice and 1 teaspoon of pure ghee and mix well.

14. Cook covered in microwave for 1 minute on high power. Khichadi is now ready.

15. Serve hot. In Konkan, Khichadi is also served with Curd.

Note

1. In some places in Konkan, Sabudana Khichadi is made using Coconut Oil instead of Pure Ghee. That also tastes nice.

2. If you don’t have microwave, you can use a Wok / Deep Frying Pan. You will require more ghee if you cook this way. After cooking for about 4 minutes in covered Wok, cook without the lid till Sabudana is transparent. Keep stirring regularly to avoid lumps.

3. Sometimes even after following all instructions properly, Sabudana does not get soft. This means that Sabudana is not proper. In such a case, sprinkle ¼ cup of water on Khichadi and cook covered in Microwave on high power for 2-3 minutes. Sabudana will be soft.

==================================================================================

साबुदाणा खिचडी मायक्रोवेव्ह रेसिपी मराठी

साबुदाणा खिचडी बहुतेक सर्वांना आवडते. पण नवशिक्या गृहिणींना परफेक्ट खिचडी बनवणं जमत नाही. कधी खिचडीचा गोळा होतो; कधी अगदी सुकी होतो. असं असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा. मी खिचडी मायक्रोवेव्ह मध्ये बनवते. अगदी कमी तूप लागतं आणि पातेल्याला अजिबात चिकटत नाही. अगदी सहज छान मऊ मोकळी खिचडी होते. मायक्रोवेव्ह वापरत नसाल तर पारंपारिक पद्धतीने खिचडी बनवा. पण मायक्रोवेव्ह वापरणं वाईट असतंवगैरे कमेंट्स नकोत.

खिचडीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साबुदाणा भिजवणे. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. मी नेहमी मिळणार मोठा साबुदाणा वापरते नायलॉन साबुदाणा वापरत नाही. साबुदाणा धुवून, साबुदाणा बुडेल एवढं पाणी घालून ६ तास भिजवून ठेवते. पाणी कमी नको आणि जास्त नको. एकदा साबुदाणा व्यवस्थित भिजला की खिचडी छान होते.

पण कधी कधी साबुदाणा कितीही शिजवला तरी पारदर्शक होत नाही; फक्त नरम होतो. अशा वेळी खिचडी आणखी न शिजवता तशीच खावी

साहित्य (६ जणांसाठी) (१ कप = २५० मिली )

साबुदाणा २ कप

बटाटे २ मध्यम

भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट २३ टेबलस्पून (तुम्हाला आवडत असेल तर जास्त घाला)

साजूक तूप दीड चमचा

साखर अर्धाएक  चमचा

ताजा खवलेला नारळ २ टेबलस्पून

चिरलेली कोथिंबीर १ चमचा

लिंबाचा रस अर्धा चमचा

ठेचलेली हिरवी मिरची १ चमचा

जिरं पाव चमचा

मीठ चवीनुसार

कृती

. साबुदाणा धुवून बुडेल एवढं पाणी घालून ६ तास भिजवून ठेवा.

. भिजवलेला साबुदाणा हाताने मोकळा करा व त्यात शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि साखर घालून एकत्र करा.

Soaked Sabudana (भिजवलेला साबुदाणा)
Add Roasted Peanut powder, salt and sugar to soaked Sabudana (साबुदाण्यात शेंगदाण्याचं कूट, मीठ, साखर घाला)

. बटाटे धुवून पातळ काचऱ्या करून घ्या. मी बटाट्याची सालं काढत नाही. तुम्हाला हवं असेल तर सालं काढून टाका आणि काचऱ्या कापा.

. एका कढईत अर्धा चमचा साजूक तूप गरम करून त्यात जिरं घाला. जिरं तडतडलं की हिरवी मिरची आणि बटाट्याच्या काचऱ्या घाला. पाणी न घालता झाकण ठेवून वाफ काढा आणि काचऱ्या मंद आचेवर शिजवून घ्या. किंचित मीठ घालून एकत्र करा.

Add potato slices and chilly paste to the pan (मिरची आणि बटाट्याच्या काचऱ्या फोडणीत घाला)

. एका झाकणासहित मायक्रोवेव्ह च्या भांड्यात साबुदाण्याचे मिश्रण आणि शिजलेल्या बटाट्याचं मिश्रण एकत्र करा.

. झाकण लावून मायक्रोवेव्ह मध्ये २ मिनिटं हाय पॉवर वर शिजवा.

. भांडं बाहेर काढून मिश्रण ढवळून घ्या.

. परत मायक्रोवेव्ह मध्ये ठेवून ६ मिनिटं (किंवा साबुदाणे नरम आणि पारदर्शक होईपर्यंत) झाकण ठेवून शिजवा. दर १ मिनिटानी मिश्रण ढवळा.

. शेवटी नारळ, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि १ चमचा साजूक तूप घालून मिक्स करा आणि  मायक्रोवेव्ह मध्ये झाकण ठेवून १ मिनिट शिजवा.

१०. मऊ, मोकळी, चविष्ट साबुदाणा खिचडी तयार आहे. गरमगरम खिचडी   खायला द्या. कोकणात साबुदाणा खिचडीवर दही घालून खायची पद्धत आहे. छान लागते.

टीप

. कोकणात काही ठिकाणी साजूक तुपाऐवजी खोबरेल तेल वापरून खिचडी बनवतात. तशी खिचडी ही छान लागते

. मायक्रोवेव्ह वापरायचा नसेल तर गॅसवर कढईत  खिचडी करू शकता. त्याला तूप जास्त लागते. ४ मिनिटं झाकण ठेवून शिजवल्यानंतर पुढे झाकण न ठेवता शिजवा. मिनिटा मिनिटाला ढवळत रहा

. कधी कधी सगळी कृती व्यवस्थित करून ही साबुदाणे घट्ट उरतात (हे साबुदाणे बरोबर नसतात). अशा वेळी एक पाण्याचा हबका मारून झाकण ठेवून २३ मिनिटं मायक्रोवेव्ह मध्ये शिजवावे. साबुदाणे नरम होतील.

 

2 Comments

Your comments / feedback will help improve the recipes