Kulith Pithale (कुळथाचे पिठलं / पिठी) – Delicious Maharashtrian curry using Horse Gram Flour
कुळथाचे पिठलं / पिठी मराठी
This is a famous curry from Konkan. Very healthy and quick dish (as always from me). Kulith (Horse Gram in English) is a king of Pulses grown in Konkan. We make very tasty Usal of Kulith. You can find Kulith Usal recipe on my blog. Kulith is roasted and ground to make Kulith Peeth (Flour). Kulith Pithale is made from Kulith Flour. You will find Kulith flour in shops that sell products from Konkan.
Ingredients (Serves 4)
Kulith (Horse Gram) Flour 3 tablespoons
Scraped Fresh Coconut 1 teaspoon
Kokum 4 Nos.
Garlic 10 cloves peeled,diced
Green Chilly Paste ½ teaspoon
Chopped Coriander 1 teaspoon (optional)
Oil 1 teaspoon
Mustard Seeds ¼ teaspoon
Turmeric Powder ¼ teaspoon
Asafoetida a pinch
salt to taste
Instructions
1. Heat oil in a pan on medium flame.
2. Add mustard seed, wait till it sputters. Add Turmeric Powder and Asafoetida.
3. Add garlic pieces and fry till light brown.
4. Add Chilly Paste.
5. Add 1 litre water.
6. Add salt, kokum and bring to boil.
7. Reduce the flame to low.
8. Sprinkle ½ tablespoon of kulith flour. It is preferred to sprinkle using your fingers to avoid lumps.
9. Turn up the heat and let kulith flour mix in, stir to ensure that no lumps are formed.
10. Repeat step 7 to 9 till all the kulith flour is added. Initially the mixture may look watery but as it gets cooked it gets thicker.
11. Cook on low flame for 10 minutes, stir every 2 minutes.
12. The consistency should be like “Dal Fry”, add water if consistency is too thick.
13. Add Scraped coconut, coriander, bring to boil. Switch off the gas.
14. Serve hot with roti (Indian Bread) or rice. Rice with Kulith Pithale and a spoonful of home made Ghee (clarified butter) is relished as heavenly meal by most people in Konkan.
===================================================================================
कुळथाचे पिठलं / पिठी
कोकणातल्या माणसांचा आवडता पदार्थ. हे पिठलं आणि भात / पोळी असेल तर ताटात दुसरं काही नसलं तरी चालतं. अगदी सोपी रेसिपी आहे आणि पिठलं अतिशय चविष्ट लागतं. कुठलंही कुळथाचं पीठ वापरून पिठल्याला खमंग चव येत नाही. त्यासाठी देवगड, मालवण, सावंतवाडी सारख्या तळकोकणातलेच कुळीथ लागतात. रत्नागिरी च्या कुळथाची उसळ छान होते पण पिठलं नाही.
फोटोसाठी मी पिठलं वाटीत घातलं असलं तरी पिठलं भात खायची उत्तम पद्धत म्हणजे जमिनीवर मांडी घालून बसायचं. ताटात एका बाजूला भात दोन कडेला लावून मधे गरमागरम पिठलं घ्यायचं; ताटात मधोमध वाफाळलेला भात घ्यायचा; त्यावर छान साजूक तूप घालायचं आणि थोडा थोडा भात पिठल्यात मिसळून खायचा. अहाहा, रसना अगदी तृप्त होते.
साहित्य (४ जणांसाठी)
कुळीथ पीठ ३ टेबलस्पून
ताजा खवलेला नारळ १ चमचा
कोकम ४ (मध्यम आकाराचे तुकडे करून)
लसूण १० पाकळ्या मध्यम आकाराचे तुकडे करून
चिरलेली कोथिंबीर १ चमचा (ऐच्छिक)
ठेचलेली हिरवी मिरची अर्धा चमचा
तेल १ चमचा
मोहरी पाव चमचा
हिंग चिमूटभर
हळद पाव चमचा
मीठ चवीनुसार
कृती
१. एका कढईत तेल गरम करून मोहरी, हळद, हिंग घालून फोडणी करून घ्या.
२. फोडणीत लसणीचे तुकडे घालून गुलाबी रंगावर परतून घ्या.
३. आता त्यात ठेचलेली मिरची घाला.
४. त्यात १ लिटर पाणी घाला. मीठ आणि कोकम घाला आणि पाण्याला उकळी काढा.
५. आता गॅस बारीक करून अर्धा टेबलस्पून कुळथाचं पीठ हाताच्या बोटांनी उकळत्या पाण्यात भुरभुरवा.
६. गॅस मोठा करून घातलेलं पीठ पाण्यात मिक्स करा. गुठळ्या असतील तर त्या पळीने मोडून घ्या.
७. स्टेप्स ५ आणि ६ सगळं पीठ संपेपर्यंत करत राहा.
८. आता गॅस बारीक करून पिठलं १० मिनिटं शिजवा. मधे मधे ढवळा. पिठल्याचा छान दरवळ यायला लागेल. हे पिठलं आमटीपेक्षा दाट असतं. फार दाट झालं असेल तर थोडे पाणी घाला.
९. नारळ, कोथिंबीर घालून एक उकळी काढा आणि गॅस बंद करा.
१०. गरमागरम पिठलं भाकरी / पोळी किंवा भाताबरोबर खायला घ्या आणि स्वर्गीय जेवणाचा आनंद घ्या.
Your comments / feedback will help improve the recipes